Explore New Horizon.....👪 With KKDP TOURS experts In Customised Tourism 9637799332
Channel | 8 followers
🏝 *स्वाद मालवणी तळकोंकण चा*🏖
🙏निसर्गरम्य देवबाग.. मालवण.🙏
एखाद्या रम्य पहाटे ईश्वराला पडलेलं सुखद स्वप्न म्हणजेच देवबाग. मालवण-तारकर्ली-देवबाग गाव हा सलग १० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा. त्यात देवबाग म्हणजे मालवणचे भूषण. मालवण शहरापासून ९ ते १० किमी अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. नावाप्रमाणेच सुंदर असे हे गाव. या गावच्या एका बजूला अथांग अरबी समुद्र तर दुसर्या बाजूला कर्ली नदीचे पात्र. यांच्या संगमाचे स्थान( भोगवे बीच जे आमच्या पासून 20/25 मि. आहे) आवर्जुन बघण्यासारखे आहे. पांढरीशुभ्र वाळू आणि माडा-पोफळीच्या हिरव्यागार बागायती. दक्षिणेला असलेली खाडी आणि समुद्राचा लोभस संगम मनाला भुरळ पाडतो. तसेच सूनामी आयलंड वरील बोटिंगची मजा तर फारच वेगळी. जे आमच्या कडून फक्त १० मि.वर आहे. गावच्या सभोवती तिन्ही बाजूला खारेपाणी असूनसुद्धा गावात मात्र गोड पाणी आहे. हाही एक चमत्कारच म्हटला पाहिजे. सूर्योदय आणि सूर्यास्त एकाच जागी बसून पाहण्याजोगे हे ठिकाण.बर्याच वेळा फोटो काढण्याच्या नादात त्या क्षणांचा अनुभव घ्यायचा राहून जातो. देवबागच्या संगमाकडे भोगवे बीच. देवबागपासून ९ किलोमीटरवर सिंधुदुर्ग किल्ला आणि चिवला बीच. देवबागच्या या निसर्गसंपन्नतेमुळे येथे नेहमीच पर्यटकांची रिघ लागलेली असते. मग येताय ना ? येवा कोकण आपलाच आसा"!!