*शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर स्थापित*
(दि.9 ऑगस्ट 1989)
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती*
*संघटनेची वैचारिक भूमिका*
● *पंचसूत्री* ●
*1] शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे.*
*2] वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे.*
*3] धर्माची विधायक, कठोर, कृतिशील आणि कालसुसंगत चिकित्सा करणे.*
*4] संत आणि समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा मूल्य आशय कृतिशील करणे.*
*5] व्यापक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडून घेणे.*
*ही पंचसूत्री संघटनेचा वैचारिक पाया आहे. या विचारसूत्रांच्या आधारे संघटना काम करते.*