शेतकरी समाजातील एक असा घटक आहे जो प्रगती पासून सतत दूर राहिला आहे. आज शेतकऱ्यांना शेती मालाचा भाव ठरवायचा झाला तर ते त्यांच्या हातात नाही. परिस्थिती, वेळ, साधन या गोष्टी सोबत तडजोड त्याला करावी लागते. व्यापारी जो भाव ठरवेल त्या भावाला माल विकावा लागतो. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.
शेतकऱ्याच्या अडचणीवर मात कारता येईल अशी एक वेबसाईट बाजारात आली आहे. तीचे नाव आहे कृषिक्रांती (www.krushikranti.com )
या वेबसाइटचा वापर करून शेतकरी आपल्या कृषी मालाची मोफत जाहिरात करू शकतो व आपल्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवू शकतो. धान्य, फळ, भाज्या, जमीन, शेती उपयुक्त साहित्य अशा अनेक गोष्टींच्या जाहिरात आता शेतकरी करू शकतो आणि पाहिजे ती सामग्री मिळवू अथवा विकू शकतो.
या वेबसाईटचा वापर फक्त शेतकऱ्यानाच होणार आहे असेही नाही. शेतमालाचा व्यवहार करणारे व्यापारी, शेतीपूरक साहित्याचे विक्रेते, दलाल देखील या वेबसाईटचा वापर करू शकतात. जर शेतकरी जाहिरात करत असेल तर याचा फायदा हा व्यापारी वर्गालाही होईल. जसे कि व्यापाऱ्याकडे कोणत्या मालाचा जर तुटवडा असेल तर तो वेबसासाईटवर जाहिरात पाहून तो शेतमाल असलेल्या शेतकऱ्या सोबत संपर्क साधून त्याची गरज भागवू शकतो.
अशा पद्धतीने या वेबसाईटचा फायदा फक्त शेतकऱ्यानाच नाही तर व्यापाऱ्याना व सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना पण होईल. किरकोळ शेतमालाचे विक्रेते सुद्धा आपल्या शेतमालाची जाहिरात वेबसाईटवर करू शकतात. जेणे करून शेतकऱ्याच्या गरजेच्या वस्तू त्याचे भाव व त्याची प्रतवारी शेतकरी वेबसाईटवर पाहून ठरवू शकतो .व नंतर संपर्क साधून व्यवहार करू शकतो.
शेतकऱ्यानी, व्यापाऱ्यानी व विक्रेत्यांनी फक्त शेतीमालाच्या जाहिरातीसाठी वेबसाईटवर याव अस नाही तर (कृषी विषयक माहिती) नावाची संकल्पना देखील शेतकऱ्यासाठी सुरु केली आहे जेथे तज्ञ मंडळी आपले मत मांडतील व ते सर्वांना वाचण्यास उपलब्ध होतील. तसेच बाजारभाव या विभागामध्ये महाराष्ट्रातील सर्व पिकांचे बाजारभाव. रोजच्या रोज पाहायला मिळतील.
हि वेबसाइट विनामूल्य आहे. जी तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील पाहू शकता.