*🚩सकल मराठा समाज मंडळ - खांदा कॉलनी🚩*
(मराठ्यांनी मराठ्यांसाठी उभारलेली चळवळ)
*-: ध्येय्य व उद्देश :-*
१. खांदा कॉलनी मधील मराठा समाज बांधवांचा सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, वैदयकीय, बौद्धिक, धर्मादायी विकास करणे.
२.मराठा बांधवांचे संघटन करून समाजाच्या विशिष्ट चालीरीती, कुलाचार,परंपरा, जीवनशैली व इतिहास यांची माहिती देऊन त्याची जपावणूक करणे
३.मराठा उद्योजकांचे संघटन करून त्यांच्या साठी शासकीय योजनेची माहिती शिबिराद्वारे देऊन मार्गदर्शन करणे.
४.मराठा समाजातील महिलांचे संघटन करून महिलांसाठी विविध कल्याणकारी विकासाच्या योजना राबविणे, महिला हळदी कुंकू इ. महिलांचे कार्यक्रम आयोजित करणे.
५.मराठा समाजातील युवकांना - युवतींना खेळाचे प्रशिक्षण देणे, खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे.
६.मराठा समाजातील थोर महापुरुष यांच्या जयंती , पुण्यतिथी साजऱ्या करणे.
७.मराठा समाज बांधवांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे.
८.मराठा समाजातील गोर - गरीब गरजू यांना मदत करणे.
९.मराठा समाज बांधवांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, चर्चा सत्र आयोजित करणे.
१०. मराठा समाजातील दिग्गज, प्रतिष्ठित नेपुण्य प्रधान व्यक्तीचा समाजातर्फे मानपत्र देऊन सन्मान व गौरव करणे.
११.खांदा कॉलनी मध्ये भव्य - दिव्य मराठा भवन या सामाजिक सभागृहाची स्थापना करणे.
१२.मराठा समाज बांधवांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करणे.
*🚩एक मराठा ,लाख मराठा🚩*