मित्रांनो वर्तमानपत्र नोंदणीसाठी 1867 चा जुना कायदा रद्द होऊन आता मार्च 2024 पासून नवीन कायद्यान्वये ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक जणांना नवीन प्रक्रियेबद्दल माहिती नाही तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्याने बऱ्याचशा बाबी मध्ये वारंवार बदल केले जातात. नवीन प्रणाली पत्रकार मित्रांसाठी अतिशय उपयुक्त असून आता कुणीही आपले स्वतःचे वर्तमानपत्र साप्ताहिक दैनिक पाक्षिक वार्षिक सुरू करू शकते. सुटसुटीत आणि सुलभ प्रक्रिया असल्यामुळे जास्त वेळ जात नाही. यासंबंधीची सर्व माहिती आणि घडामोडी या चॅनलला तुम्हाला दररोज वाचायला मिळतील. आपण हे चॅनल आपल्या परिसरातील पत्रकार मित्रांसोबत शेअर करू शकता. आपल्याला जर नवीन वर्तमानपत्र नोंदणी करायची असेल तर आपण 98 22 66 87 86 या क्रमांकावर सुद्धा पर्सनल संदेश पाठवून माहिती घेऊ शकता. पूर्वी वर्तमानपत्र नोंदणीसाठी शासकीय फीस भरावी लागत नव्हती नवीन कायद्यामध्ये शासकीय फिश एक हजार रुपये इतकी भरावी लागते.