Welcome to AgroWorld! 🌱
बांधिलकी शेती-मातीशी! ध्यास ... कृषी आणि ग्रामविकासाचा! इथे आपल्याला मिळेल शेतकऱ्यांच्या हिताचं सारं काही. अगदी नवी माहिती - ताज्या अपडेट्सपासून हाय-टेक शेतीच्या मंत्रापर्यंत सारं काही. कधी रूटीन बातम्या तर कधी तुमच्या कामाच्या बातम्या, योजना असं बरंच काही. भविष्यात शेतकऱ्यांना एकत्र आणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेलं नेटवर्क आपल्याला उभं करायचं आहे. ऑनलाईन भक्कम बाजारपेठ निर्माण करायची आहे. शेतकरी ते ग्राहक अशी दलाल, कमिशन, एजंट मुक्त अशी मजबूत साखळी निर्माण करायची आहे. ॲग्रोवर्ल्डचा परिचय तर आपणास असेलच. 2014 पासून शेती आणि शेतकरी हितात उभी असलेली ही संस्था. संस्थेतर्फे ॲग्रोवर्ल्ड फार्म हे दर्जेदार मराठी कृषी मासिक चालविले जाते. संस्थेने आजवर उत्तर महाराष्ट्रात 21 कृषी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले आहे. खान्देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन (Agri Expo) अर्थात कृषी मेला ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला जातो. ॲग्रोवर्ल्ड मार्ट हे संस्थेचे नवे प्रस्तावित व्हेंचर असणार आहे. ॲग्रोवर्ल्डचे AgroWorld News हे यु ट्यूब चॅनेलही आहे.
Welcome to AgroWorld!
Established in 2014, we're a Maharashtra-based institution dedicated to empowering farmers and fostering rural development.
Our Motto: Thirst for Agriculture and Rural Development
What you'll find here:
Valuable agricultural information & updates
Farming tips & best practices
Market insights & trends
Rural development initiatives
Exclusive AgroWorld content
We operate across Maharashtra with offices in:
Jalgaon (Head Office)
Pune
Sambhajinagar
Nashik
Join us and together, let's cultivate a brighter future for agriculture!
#AgroWorld #Farming #RuralDevelopment #Maharashtra