चला मराठी गझलवर बोलू ... Chala Marathi Gazalvar Bolu...
Channel | 15 followers
चला मराठी गझलवर बोलू. तिच्या सौंदर्यावर बोलू. तिच्या रुपरंगांवर बोलू. रूपगंधावर बोलू. तिचा एल्गार पाहू. तिचा झंझावात पाहू. आदरणीय गुरूवर्य सुरेश भटांना अनुभवू. त्यांची व विजा घेऊन आलेल्या पिढ्यांची मराठी गझल पाहू. मन एवढं मोठं करू की मराठी गझलच्या अगदी परस्पर विरोधी मतप्रवाहांनाही इथे स्थान देऊ. योग्य भाषेतील गझलबाबतच्या विचारांचा सन्मान करू. चुकीच्या भाषेला तिची दिशा दाखवू. कारण आपण मराठी गझलबाबत बोलत आहोत.
हे चॅनेल धूलिवंदन दिनी , दि. २५.०३.२०२४ रोजी दुपारी १२.३० वा. श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील यांनी निर्माण केले आहे.
महत्वाचे :
या चॅनेलला श्री. कैलास चोपडे यांनी सर्वप्रथम फॉलो केले आहे .
चॅनेलचा लोगो आदरणीय शिक्षक श्री. नीळकंठ पावसकर यांनी तयार केला आहे.