बागुलबूवा म्हणजे आपल्या मनातील एक प्रकारची भिती.
लहानपणा पासून ऐकत आलेल्या आणि आत्ताही कानांवर पडत असणाऱ्या वेगवेगळ्या भुतांच्या गोष्टींची भिती.
आमचा हेतु अंधश्रद्धा पसरविण्याचा अजीबात नाही, आम्ही भुतांच्या असण्यावर कोणताही दावाही करत नाही.
खर तर भुत आहे का नाही, हा जरा वादग्रस्तच मुद्दा. पण या मुद्याला काहीकाळ बाजूला ठेवून, भुतांच्या गोष्टींचा आस्वाद घेतला तर? एक रोमांच अनुभवण्यासाठी आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडलेल्या त्या भितीला आपण जाग केलं तर? त्यासाठीच खरतर बागुलबूवा चा जन्म झाला आहे.
एखाद्या वाईट गोष्टी पासून माणसाने लांब रहाव यासाठी बागुलबूवा नामक भितीचा आणि भुताचा जन्म झालेला आहे. चला तर मग, आपण याच भितीचा इथे आनंद घेवूया...