कोरोना व्हायरसच्या (COVID-19) जागतिक साथीमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp ची कशी मदत होऊ शकते
शिक्षक वर्ग
तुम्ही शालेय शिक्षक असाल किंवा कॉलेज प्रोफेसर, जर शाळा-कॉलेज बंद असल्याने शिक्षणात खंड पडत असेल, तर WhatsApp च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा विचार करा.*
तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधत असताना कृपया WhatsApp चा वापर जबाबदारीने करा. फक्त तुम्हाला माहीत असलेल्या आणि ज्यांना तुमच्याकडून मेसेजेस प्राप्त करायचे आहेत अशा वापरकर्त्यांशीच संवाद साधा. ग्राहकांना तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह करण्यास सांगा आणि ग्रुप्समध्ये ऑटोमेटेड किंवा प्रचारात्मक मेसेजेस पाठवणे टाळा. या सोप्या सर्वोत्तम पद्धतींंचा वापर न केल्यामुळे इतर वापरकर्त्यांकडून तक्रारी केल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे खाते बॅन केले जाऊ शकते.
तुम्ही WhatsApp चे नवीन वापरकर्ते असल्यास, सुरुवात कशी करायची याविषयी क्रमाक्रमाने मार्गदर्शन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .
तुमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहा
तुमच्याकडे विद्यार्थ्यांचा फोन नंबर नसताना, विद्यार्थ्यांना तुमच्याशी WhatsApp चॅट सुरू करता यावे म्हणून, युनिव्हर्सल लिंक तयार करा. ही लिंक ईमेलमधून, तुमच्या Facebook पेजवर किंवा सार्वजनिक नसलेल्या इतर चॅनेलवर शेअर करा.
WhatsApp वर शिकवा
टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेजेस च्या माध्यमातून धडे शेअर करा. प्रत्येक वर्गासाठी ग्रुप तयार करा आणि विद्यार्थी समोर असताना तुम्ही ज्याप्रकारे चर्चेस प्रोत्साहन देता त्याचप्रकारे चर्चा घडवून आणा.
विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स पाठवा, त्यांच्याकडून असाइनमेंट्स मिळवा
अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी गृहपाठ देण्यासाठी ब्रॉडकास्ट लिस्ट वापरा. ज्या संपर्कांनी तुम्हाला त्यांच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये जोडले आहे, त्याच संपर्कांना तुमचा ब्रॉडकास्ट मेसेज मिळू शकेल. विद्यार्थी त्यांच्या असाइनमेंट्स पूर्ण करतील तशी त्यांचे प्रतिसाद फक्त तुमच्याकडे येतील.
तुमच्या विद्यार्थ्यांसाठी दूरवरून उपलब्ध राहा
ग्रुप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स मधून विद्यार्थ्यांना वर्गात मिळतो तसा शिकण्याचा रिअल टाइम अनुभव द्या.
तुमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मग्न ठेवा
तुम्ही दिवसाची तयारी कशी करत आहात हे तुमच्या विद्यार्थ्यांना कळावे यासाठी स्टेटस अपडेट पोस्ट करा.
तुमच्या कॉम्प्यूटरवरून मेसेजेस पाठवा
तुमच्या डेस्कटॉपवरून, मोठ्या संख्येने येणाऱ्या WhatsApp मेसेजेसचे त्वरित आणि कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी WhatsApp Web वापरा.
*WhatsApp चा वापर, लागू असलेले कायदे आणि आमच्या सेवा वापरण्यासाठी असलेल्या किमान वयाच्या अटीचा अंतर्भाव असलेल्या WhatsApp सेवाशर्तीयांचे पालन करून व्हावा. किमान वयाची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थांना किंवा इतरांना WhatsApp वापरण्यास, किंवा विद्यार्थ्यांना WhatsApp चा अनिवार्य वापर करायला लावण्यास प्रोत्साहन देऊ नका.