1. WhatsApp Business ॲप डाउनलोड करून लाँच करा: WhatsApp Business ॲप Google Play स्टोअर आणि Apple App स्टोअर वर मोफत डाउनलोड करता येते. तुमच्या होम स्क्रीनवरील WhatsApp Business आयकॉनवर टॅप करा.
2. सेवाशर्ती पुन्हा तपासा: WhatsApp Business सेवाशर्ती वाचा, आणि नंतर सेवाशर्तींचा स्वीकार करण्यासाठी, सहमती आहे आणि पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
3. नोंदणी करा: तुमचा कंट्री कोड जोडण्यासाठी ड्रॉप डाऊन लिस्ट मधून तुमचा देश निवडा, नंतर तुमचा फोन नंबर आंतरराष्ट्रीय फोन नंबर फॉरमॅट नुसार एंटर करा. पूर्ण झाले किंवा पुढे वर टॅप करा आणि नंतर एसएमएस किंवा फोन कॉलवरून तुमचा ६ अंकी नोंदणी कोड मिळवण्यासाठी ठीक आहे वर टॅप करा. नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुमचा ६ अंकी नोंदणी कोड एंटर करा. तुमच्या फोन नंबरची नोंदणी करण्यासाठी या लेखात अधिक जाणून घ्या.
4. तुमच्या संपर्क आणि फोटोंना ॲक्सेस करण्याची अनुमती द्या: तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मधून WhatsApp Business ॲप मध्ये संपर्क जोडता येऊ शकतात. तुम्ही तुमच्या फोनवरील फोटो, व्हिडिओज आणि फाइल्स हे देखील ॲक्सेस करण्याची अनुमती देऊ शकता.
5. खाते तयार करा: तुमच्या बिझनेसचे नाव भरा, बिझनेस कॅटेगरी निवडा आणि प्रोफाइल फोटो निवडा.
6. तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार करा: एक्सप्लोर करा > बिझनेस प्रोफाइल वर टॅप करा. इथे तुम्ही तुमच्या बिझनेसचा पत्ता, बिझनेसबद्दल माहिती, कामाचे तास आणि यासारखी इतर बिझनेस संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती जोडू शकता.
7. चॅट सुरू करा. तुमचे बिझनेस प्रोफाइल आता सेट झाले आहे. किंवा वर टॅप करा आणि मेसेज करण्यासाठी संपर्क शोधा किंवा निवडा. मजकुरासाठी असलेल्या जागेत तुमचा मेसेज एंटर करा. नंतर, किंवा वर टॅप करा.
WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस उत्तमरीत्या चालवण्यात मदत करणारी अनेक टूल्स आहेत. ही टूल्स एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्या चॅट स्क्रीनवर जा. Android वर अधिक पर्याय किंवा iPhone वर सेटिंग्ज वर टॅप करा. नंतर, बिझनेस टूल्स वर टॅप करा.