१. ॲप डाउनलोड करा आणि लॉंच करा: Google Play स्टोअर किंवा Apple App Store वरून WhatsApp Messenger मोफत डाउनलोड करा. ॲप उघडण्यासाठी, तुमच्या होम स्क्रीनवरील WhatsApp आयकॉनवर टॅप करा.
२. सेवाशर्तींचे पुनरावलोकन करा: सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण वाचा व त्यानंतर सेवाशर्तींचा स्वीकार करण्यासाठी, सहमत आहे आणि पुढे चालू ठेवा वर टॅप करा.
३. नोंदणी करा: तुमच्या देशाचा कंट्री कोड टाकण्यासाठी ड्रॉप-डाउन लिस्टमधून तुमचा देश निवडा आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय फोन नंबर फॉरमॅट मध्ये तुमचा फोन नंबर एंटर करा. पूर्ण झाले किंवा पुढे वर टॅप करा, त्यानंतर एसएमएस किंवा फोन कॉलवरून तुमचा ६ अंकी नोंदणी कोड मिळवण्यासाठी ठीक आहे वर टॅप करा. नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुमचा ६ अंकी नोंदणी कोड एंटर करा. Android, iPhone, किंवा KaiOS वर तुमच्या फोन नंबरची नोंदणी कशी करावी हे जाणून घ्या.
४. तुमचे प्रोफाइल सेट करा: तुमच्या नव्या प्रोफाइलमध्ये तुमचे नाव एंटर करा आणि त्यानंतर पुढे वर टॅप करा. तुम्ही प्रोफाइल फोटोदेखील ठेवू शकता.
५. संपर्क आणि फोटो ॲक्सेस करण्यास अनुमती द्या: तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून WhatsApp वर संपर्क जोडले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या फोनवरील फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स देखील ॲक्सेस करण्याची अनुमती देऊ शकता.
६. चॅट सुरू करा: किंवा वर टॅप करा, त्यानंतर सुरुवात करण्यासाठी संपर्क शोधा. मजकुरासाठी असलेल्या जागेत तुमचा मेसेज लिहा. फोटोज आणि व्हिडिओज पाठवण्यासाठी, मजकूरासाठी असलेल्या जागेच्या शेजारील किंवा वर टॅप करा. नवा फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा निवडा किंवा तुमच्या फोनवर असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी गॅलरी किंवा फोटो आणि व्हिडिओ लायब्ररी निवडा. नंतर किंवा वर टॅप करा.
७. ग्रुप तयार करा: तुम्ही कमाल २५६ सदस्यांचा ग्रुप तयार करू शकता. किंवा वर टॅप करा, नंतर नवीन ग्रुप वर टॅप करा. ग्रुपमध्ये जोडण्यासाठी संपर्क शोधा किंवा निवडा, नंतर पुढे वर टॅप करा. ग्रुपचे नाव एंटर करा आणि किंवा तयार करा वर टॅप करा.
गोपनीयता आणि सुरक्षा फीचर्स कस्टमाइझ करणे
WhatsApp ने तुमची गोपनीयता आणि सुरक्षा कस्टमाइझ करणे सोपे केले आहे. आमच्या गोपनीयता पेज वर अधिक जाणून घ्या.
तुम्हाला मिळालेल्या माहितीची सत्यता तपासून पाहा
तुम्हाला मिळणारी सर्वच माहिती अचूक असेल असे नाही त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या मेसेजेसचा खरेपणा तपासून पाहा. तुम्हाला मिळालेला मेसेज कोणी पाठवला आहे याबद्दल खात्री नसल्यास, त्या मेसेजमधील माहिती विश्वसनीय सत्यता पडताळणाऱ्या संस्थांच्या साहाय्याने पुन्हा तपासून घेण्यास आम्ही प्रोत्साहन देतो. चुकीच्या माहितीचा प्रसार कसा रोखावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
फॉरवर्ड केलेले मेसेजेस
चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी, तुमच्या मेसेज फॉरवर्ड करण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. फॉरवर्ड केलेले लेबल मेसेजेस वर असल्याने कोणता मेसेज फॉरवर्ड केलेला मेसेज आहे हे ओळखणे सोपे जाते. जेव्हा एक मेसेज एका वापरकर्त्याकडून दुसऱ्या वापरकर्त्याकडे अनेक वेळा फॉरवर्ड केला जातो, तेव्हा अशा मेसेजेसवर दुहेरी बाणाचा आयकॉन दाखवला जातो. मेसेज फॉरवर्ड करण्यावरील मर्यादांविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.