रिमोट पद्धतीने संपर्कात राहा
तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या जवळ नसलात तरी त्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी ग्रुप्स, व्हॉइस कॉल्स, आणि व्हिडिओ कॉल्स अशा WhatsApp फीचर्सचा वापर करा.
WhatsApp तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यास मदत करते. मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांच्या कायम संपर्कात राहण्यासाठी, आरोग्य सुरक्षेविषयी प्रसारित केलेली अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी आणि माहिती जबाबदारीने शेअर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धती वापरू शकता. तुम्ही WhatsApp चे नवीन वापरकर्ते असल्यास किंवा थोडी उजळणी करायची असल्यास, सुरुवात कशी करायची याची ही मार्गदर्शिका आहे.
तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या जवळ नसलात तरी त्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी ग्रुप्स, व्हॉइस कॉल्स, आणि व्हिडिओ कॉल्स अशा WhatsApp फीचर्सचा वापर करा.
स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील संस्था याबाबतीत काय करत आहेत याची माहिती ठेवा. नवीन माहिती आणि मार्गदर्शक सूचना यांसाठी जागतिक आरोग्य संघटना किंवा तुमच्या देशातील आरोग्य मंत्रालय अशा विश्वसनीय स्रोतांची मदत घ्या.
कोरोना व्हायसरबद्दल तुम्हाला मिळणारी सर्वच माहिती बरोबर असेल असे नाही, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या मेसेजेसबद्दल सतर्क राहा. फॅक्ट चेकर्स, किंवा+1 (727) 2912606या नंबरवर उपलब्ध असलेला आंतरराष्ट्रीय सत्यता तपासणी नेटवर्क (IFCN) चा चॅटबॉट, यासारख्या विश्वसनीय आणि अधिकृत स्त्रोतांसोबत वस्तुस्थिती सत्यापित करून घ्या. एखादी माहिती सत्य आहे याबद्दल खात्री नसल्यास, तीफॉरवर्ड करू नका.
या समस्येला तोंड देताना सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नेतृत्वाला मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र काळजीचे वातावरण असताना WhatsApp चा वापर करून कशाप्रकारे तुमच्या कम्युनिटीतील लोकांना माहिती देता येईल आणि त्यांच्या संपर्कात राहाता येईल हे जाणून घ्या.
कशाप्रकारे रुग्णांच्या संपर्कात राहाता येईल, कम्युनिटीला माहिती कशी देता येईल, रिमोट मीटिंग्ज कशा घेता येतील, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे कशी देता येतील आणि इतर बऱ्याच गोष्टींसंबंधी अधिक जाणून घ्या.
WhatsApp चा वापर करून तुमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात कसे राहता येईल, मजकूर आणि व्हॉइस मेसेजेसच्या साहाय्याने त्यांना कसे शिकवता येईल, त्यांना असाइनमेंट्स कशा पाठवता येतील तसेच त्यांच्याकडून असाइनमेंट्स कशा मिळवता येतील आणि इतर बऱ्याच गोष्टी जाणून घ्या.
तुमच्या संस्थेची ओळख करून द्या, तुमच्या कम्युनिटीतील लोकांच्या संपर्कात राहा, अचूक माहिती वेळेवर शेअर करा, तुमच्या टीमच्या संपर्कात राहा, लोकांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे मिळतील याची काळजी घ्या आणि इतर बरेच काही करा.
तुमच्या ग्राहकांच्या संपर्कात कसे राहावे, सध्याचे कामाचे तास त्यांना कसे कळवावेत, पिकअप आणि डिलिव्हरीचे प्रभावी व्यवस्थापन कसे करावे, इन्व्हेंटरी विषयी अद्ययावत माहिती नियमितपणे कशी पुरवावी इत्यादी गोष्टी जाणून घ्या.
या कठीण काळामध्येही लोक WhatsApp च्या मदतीने एकमेकांना कशी मदत करत आहेत ते पहा :
पाकिस्तानमध्ये WhatsApp ग्रुपने देशातील दारिद्र्याच्या खाईत पडू शकतील अशा अतिसंवेदनशील लोकांना मदत करण्यासाठी २१० लाख रुपये जमा केले : येथे लेख वाचा >
इटलीतील बरेच महापौर WhatsApp च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतात : येथे लेख वाचा >
इटलीतील नेपल्स येथील शाळा बंद असूनही शिक्षण मात्र अजूनही सुरू आहे. WhatsApp च्या मदतीने घरोघरी असाइनमेंट्स पाठवल्या जातात : येथे लेख वाचा >
हॉंग कॉंग मधील एका व्यक्तीने कम्युनिटीला एकत्रित आणून स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी WhatsApp चा आधार घेतला आहे : येथे लेख वाचा >
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जॉर्डनमधील रोजगार सशक्तीकरण कार्यक्रम स्त्रियांना नोकरी शोधण्यास प्रवृत्त करण्यासाठी WhatsApp वापरत आहे : येथे लेख वाचा >
पॅरिसमधील वैद्यकीय व्यावसायिक WhatsApp ग्रुपच्या मदतीने हॉस्पिटल्सच्या क्षमतांबाबत अद्ययावत माहिती मिळवत आहेत : येथे लेख वाचा >
भारतातील कोइंबतूर येथील शासकीय अधिकारी WhatsApp च्या मदतीने बैठकी घेत आहेत : येथे लेख वाचा >
सीरियामधील निर्वासित छावणीमधील शिक्षक पालकांबरोबर WhatsApp द्वारे व्हिडिओ लेसन शेअर करतात : लेख येथे वाचा >
भारतातील पूर्वाश्रमीचे वेठबिगारी मजूर त्यांच्या साथीदारांमध्ये कोरोना व्हायरसविषयी जागरूकता वाढवण्यासाठी WhatsApp ग्रुप्स वापरत आहेत : येथे लेख वाचा >
फ्लोरियानोपोलिस, ब्राझिल येथील रुग्ण WhatsApp च्या मदतीने डॉक्टरची अपॉइंटमेंट घेत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत : येथे लेख वाचा >