WhatsApp हा जगातील कोणाशीही बोलण्याचा जलद, सोपा आणि विश्वासार्ह मार्ग आहे. १८० हून अधिक देशांमधील २०० कोटींपेक्षा अधिक लोक त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारासोबत केव्हाही आणि कुठेही संपर्कात राहता यावे, यासाठी WhatsApp वापरतात. WhatsApp हे फक्त विनामूल्य नसून, एकापेक्षा अधिक मोबाइल डिव्हाइसवर आणि कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांमध्येदेखील उपलब्ध आहे, ज्यामुळे ते वापरणे आणखी सुलभ व विश्वासार्ह बनते. तुमचे आवडते क्षण शेअर करण्याचा, महत्त्वाची माहिती पाठवण्याचा किंवा मित्राला भेटण्याचा हा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. WhatsApp हे लोकांना ते जगात कुठेही असले तरी कनेक्ट करण्यात आणि शेअर करण्यात मदत करते.
WhatsApp ला रोजगाराच्या समान संधी देणारा आणि सकारात्मक कृतीशील सेवायोजक असण्याचा अभिमान आहे. आम्ही वंश, धर्म, रंग, राष्ट्रीय मूळ, लिंग (गर्भारपण, प्रसूती, लैंगिक आरोग्याशी संबंधित निर्णय किंवा त्याच्याशी निगडित वैद्यकीय स्थिती यासकट), लैंगिक पसंती, लिंग ओळख, लिंग अभिव्यक्ती, वय, संरक्षित व्हेटरनचा दर्जा असणे, दिव्यांग व्यक्ती हा दर्जा असणे, आनुवंशिकीय माहिती, राजकीय मते किंवा कृती अथवा इतर संबंधित आणि कायद्याने संरक्षित वैशिष्ट्ये या गोष्टींवर आधारित भेदभाव करत नाही. तुम्ही आमची इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी सूचना येथे पाहू शकता. लागू पडणाऱ्या संघीय, राज्य व स्थानिक कायद्यांशी सुसंगत राहून आम्ही गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या पात्र उमेदवारांचादेखील विचार करतो. फेसबुक, फेसबुकचे कर्मचारी आणि इतर लोक यांची आवश्यक किंवा मान्य असलेल्या कायद्यानुसार सुरक्षा आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तुमच्या माहितीचा उपयोग केला जाऊ शकतो. आपण फेसबुकच्या पे ट्रान्स्परन्सी पॉलिसी आणि इक्वल अपॉर्च्युनिटी इज द लॉ सूचना त्यांच्या संबंधित लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता. तसेच, WhatsApp कायद्यानुसार आवश्यक असलेल्या काही ठिकाणी ई-व्हेरिफाय कार्यक्रमात सहभागी होते.
WhatsApp आपल्या भरती प्रक्रियेत दिव्यांग उमेदवारांना उचित सूट देण्यास प्रतिबद्ध आहे. जर तुम्हाला विकलांगतेमुळे काही मदतीची किंवा सूट मिळण्याची आवश्यकता असेल, तर कृपया accommodations-ext@fb.com वर संपर्क करा.