शेवटचे अपडेट: 16 फेब्रुवारी 2024
WhatsApp चॅनल्स हे WhatsApp मधील एक पर्यायी, एकमार्गी प्रसारण वैशिष्ट्य आहे, जे खाजगी मेसेजिंगपासून वेगळे असून, लोकांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोक आणि संस्थांकडून माहितीचे अनुसरण करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. चॅनल ॲडमीननी खालील मार्गदर्शक तत्त्वे (ही "चॅनेल्स मार्गदर्शक तत्त्वे") लक्षात ठेवली पाहिजेत जेणेकरून त्यांची अपडेट्स सामान्य प्रेक्षकांसाठी योग्य असतील. WhatsApp चॅनेल्स वापरून, तुम्ही या चॅनेल्स मार्गदर्शक तत्त्वांशी आणि आमच्याशी सहमत आहात WhatsApp चॅनल्ससाठी पूरक सेवाशर्ती.
चॅनल ॲडमिननी त्यांच्या फॉलोअर्सचा आदर केला पाहिजे आणि खूप जास्त किंवा कमी-गुणवत्तेची अपडेट्स पाठवणे टाळले पाहिजे ज्यामुळे प्राप्तकर्ते त्यांचे चॅनल अनफॉलो करू शकतात. चॅनल ॲडमिननी त्यांच्या चॅनलसाठी शीर्षक प्रदान केले पाहिजे जे चॅनल सामग्री प्रतिबिंबित करते आणि वापरकर्त्यांना त्यांनी कोणत्या चॅनल्सना फॉलो करायचे याबद्दल माहितीपूर्ण निवड करण्यात मदत करते.
खालील चॅनेल्स मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या चॅनेलवर WhatsApp कारवाई करू शकते:
WhatsApp या चॅनेलच्या मार्गदर्शक तत्त्वांचा गैरवापर शोधण्यासाठी स्वयंचलित साधने, मानवी पुनरावलोकन आणि वापरकर्ता अहवाल वापरून कारवाई करू शकते. आम्ही वापरकर्त्यांना या चॅनेल्स मार्गदर्शक तत्त्वांचे संभाव्य उल्लंघन करणाऱ्या चॅनेलमधील कोणत्याही चॅनेल किंवा विशिष्ट अपटे्सना अहवाल देण्यासाठी प्रोत्साहित करतो. WhatsApp वर चॅनलची तक्रार कशी करावी याबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता. संभाव्य बौद्धिक संपदा उल्लंघनाची तक्रार कशी नोंदवावी यावरील माहितीसाठी, कृपया येथे पहा.
स्वयंचलित प्रक्रिया करणे
स्वयंचलित डेटा प्रोसेसिंग हे आमच्या पुनरावलोकन प्रक्रियेत केंद्रस्थानी असते आणि चॅनेलच्या आशयाने या चॅनल्स मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होण्याची शक्यता असलेल्या काही क्षेत्रांसाठी आपोआप निर्णय घेतले जातात.
ऑटोमेशन आम्हाला संभाव्य उल्लंघन करणाऱ्या चॅनल्सना विषयातील योग्य तज्ञांकडे आणि भाषा कौशल्य असलेल्या मानवी समीक्षकांकडे पाठवून पुनरावलोकनाला प्राधान्य देण्यास मदत करते, त्यामुळे आमचे कार्यसंघ सर्वात महत्त्वाच्या प्रकरणांवर प्रथम लक्ष केंद्रित करू शकतात.
मानवी पुनरावलोकन कार्यसंघ
एखाद्या चॅनेलला पुढील पुनरावलोकनाची आवश्यकता असते, तेव्हा आमच्या स्वयंचलित सिस्टीम्स त्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी मानवी पुनरावलोकन कार्यसंघाकडे पाठवतात. आमचे मानवी पुनरावलोकन कार्यसंघ जगभरात स्थित आहेत, सखोल प्रशिक्षण मिळवतात आणि बऱ्याचदा विशिष्ट धोरण क्षेत्र आणि प्रदेशांमध्ये तज्ञ असतात. आमच्या स्वयंचलित सिस्टीम्स प्रत्येक निर्णयातून शिकतात आणि सुधारणा करतात.
स्थानिक कायद्याचे उल्लंघन
WhatsApp आम्ही ज्या देशांत काम करतो तेथील अधिकाऱ्यांच्या वैध कायदेशीर आदेशांचे पुनरावलोकन करतो आणि त्यांना प्रतिसाद देतो. आम्हाला WhatsApp चॅनेल्स प्रतिबंधित करण्यासाठी न्यायालयाचे आदेश देखील प्राप्त होऊ शकतात. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आम्ही नेहमी सरकारी विनंतीच्या वैधतेचे आणि पूर्णतेचे मूल्यांकन करतो.
आम्हाला बेकायदेशीर कंटेन्ट किंवा आमच्या अटी आणि धोरणांचे उल्लंघन आढळते, तेव्हा आम्ही खालील गोष्टींसह आणि कंटेन्ट किंवा उल्लंघनाच्या स्वरूपावर अवलंबून कारवाई करू शकतो:
बेकायदेशीर सामग्रीसह आमच्या अटी आणि धोरणांचे उल्लंघन करणारी सामग्री ॲडमीन(न्स) वारंवार पोस्ट केल्यास WhatsApp चॅनेल्स निलंबित करेल. चॅनल निलंबित करण्याचा निर्णय उल्लंघन करणाऱ्या सामग्रीचे प्रमाण, स्वरूप आणि तीव्रता आणि ओळखता येत असल्यास, वापरकर्त्याचा हेतू यावर अवलंबून असेल.
WhatsApp चॅनल्ससाठी पुरवणी सेवाशर्तींमध्ये प्रतिबिंबित केल्यानुसार आम्ही अतिरिक्त कारवाई करू शकतो.
चॅनल्स अंमलबजावणी: वर वर्णन केल्याप्रमाणे, या चॅनल्स मार्गदर्शक तत्त्वांसह ते चॅनेल्स आमच्या अटी किंवा धोरणांच्या विरोधात असल्याचे आम्ही निर्धारित केल्यावर आम्ही चॅनल्सवर कारवाई करू शकतो. आम्ही घेतलेल्या निर्णयाशी तुम्ही असहमत असल्यास, तुम्ही तुमच्या चॅनेल माहिती पृष्ठावरून त्या निर्णयावर अपील करू शकता. तुम्ही WhatsApp समर्थनाद्वारे येथे अपील देखील सबमिट करू शकता. आमचा निर्णय चुकून घेतला गेला होता हे आम्ही निर्धारित केल्यास, आम्ही अंमलबजावणी उलट करू.
खाते अक्षम केले: या चॅनेल्स मार्गदर्शक तत्त्वांचे किंवा सेवाशर्तीच्या उल्लंघनासाठी आम्ही तुमचे खाते अक्षम केल्यास, तुम्ही त्या निर्णयावर येथे वर्णन केल्याप्रमाणे अपील करू शकता.
आम्ही चॅनल्सवर घेतलेल्या सामग्रीच्या निर्णयाशी तुम्ही असहमत असल्यास आणि EU मधील वापरकर्ता असल्यास, समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही प्रमाणित न्यायालयाबाहेरील-विवाद-निपटारा संस्थेकडे तो निर्णय उपस्थित करू शकता.
वापरकर्ता रिपोर्ट्स: तुम्ही इतरांनी पोस्ट केलेल्या सामग्रीची तक्रार केल्यास परंतु ती सामग्री आमच्या अटी किंवा धोरणांच्या विरोधात जात नाही, असे आम्हाला आढळल्यास, आम्ही तुम्हाला कळवू. आम्ही घेतलेल्या निर्णयाशी तुम्ही असहमत असल्यास, तुम्ही त्या निर्णयावर अपील करू शकता. आमचा निर्णय चुकून घेतला गेला होता हे आम्ही निर्धारित केल्यास, आम्ही अंमलबजावणी उलट करू.