शेवटचे अपडेट: 16 फेब्रुवारी 2024
WhatsApp हा मेसेजेस पाठवण्याचा आणि कॉल करण्याचा एक सोपा, सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग आहे. डीफॉल्टनुसार एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्ट केलेले तुमचे वैयक्तिक मेसेजेसकोणीही, अगदी WhatsApp देखील पाहू शकत नाही.
ही मेसेजिंग मार्गदर्शक तत्त्वे (ही "मार्गदर्शक तत्त्वे") 1:1 चॅट्स, कॉल्स, ग्रुप चॅट्स आणि कम्युनिटीजना लागू होतात. स्टेटस अपडेट्स देखील या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन आहेत.
WhatsApp Messenger ॲप्लिकेशनचा वापर आमच्या सेवाशर्ती आणि या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नियंत्रित केला जातो. WhatsApp Business ॲप्लिकेशन आणि WhatsApp Business प्लॅटफॉर्मसह आमच्या व्यवसाय सेवांचा वापर या मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त WhatsApp Business सेवाशर्ती आणि व्यवसाय धोरणांद्वारे नियंत्रित केला जातो.
मूलभूत खाते, ग्रुप आणि कम्युनिटी प्रोफाइल माहिती तसेच इतर वापरकर्त्यांनी तक्रार नोंदवलेल्या मेसेजेससह WhatsApp वर उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे WhatsApp आमच्या सेवाशर्ती किंवा या मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करू शकते. तुमचे वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित केलेले असतात.
वापरकर्ते WhatsApp संपर्क, ग्रुप्स, कम्युनिटीज, स्टेटस अपडेट्स किंवा या मार्गदर्शक तत्त्वांचे संभाव्य उल्लंघन करणारे विशिष्ट मेसेजेसची तक्रार नोंदवू शकतात. WhatsApp वर तक्रार कशी करायची याबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता. संभाव्य बौद्धिक संपदा उल्लंघनाची तक्रार कशी नोंदवावी यावरील माहितीसाठी, कृपया येथे पहा.
खाते, ग्रुप आणि कम्युनिटी प्रोफाइल माहिती, तसेच या मार्गदर्शक तत्त्वांच्या संभाव्य उल्लंघनासाठी तक्रार नोंदवलेले मेसेजेस यासह आमच्याकडे उपलब्ध माहिती शोधण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्यासाठी WhatsApp स्वयंचलित प्रक्रिया तंत्र आणि मानवी पुनरावलोकन कार्यसंघ दोन्ही वापरू शकते.
स्वयंचलित डेटा प्रोसेसिंग आमच्या पुनरावलोकन प्रक्रियेसाठी केंद्रस्थानी आहे आणि खाते वर्तन किंवा तक्रार नोंदवलेली मेसेज सामग्री या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असलेल्या काही क्षेत्रांसाठी निर्णय स्वयंचलित करते.
ऑटोमेशन आम्हाला योग्य विषय आणि भाषा कौशल्य असलेल्या मानवी पुनरावलोकर्त्यांकडे संभाव्य उल्लंघन करणारी खाती, ग्रुप्स किंवा कम्युनिटीज पाठवून पुनरावलोकनांना प्राधान्य देण्यास आणि जलद करण्यात मदत करते, त्यामुळे आमचे कार्यसंघ प्रथम सर्वात महत्त्वाच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करू शकतात.
खाते, ग्रुप किंवा कम्युनिटीला पुढील पुनरावलोकनाची आवश्यकता असते, तेव्हा आमच्या स्वयंचलित सिस्टीम्स त्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी मानवी पुनरावलोकन कार्यसंघाकडे पाठवतात. आमचे मानवी पुनरावलोकन कार्यसंघ जगभरात स्थित आहेत, सखोल प्रशिक्षण मिळवतात आणि बऱ्याचदा विशिष्ट धोरण क्षेत्र आणि प्रदेशांमध्ये तज्ञ असतात आणि खाते माहिती आणि तक्रार नोंदवलेल्या मेसेजेसचे पुनरावलोकन करण्यास सक्षम असतात. वैयक्तिक मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहेत. आमच्या स्वयंचलित सिस्टीम्स प्रत्येक निर्णयातून शिकतात आणि सुधारणा करतात.
WhatsApp वरील खाती, ग्रुप्स किंवा कम्युनिटीज स्थानिक कायद्याचे उल्लंघन करतात असा सरकारचा विश्वास असतो, तेव्हा ते आमच्याकडे उपलब्ध असलेल्या खात्याच्या माहितीचे पुनरावलोकन करण्याची विनंती करू शकतात. वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित केलेले असतात. आम्हाला WhatsApp खाती प्रतिबंधित करण्यासाठी न्यायालयीन आदेश देखील प्राप्त होऊ शकतात. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आम्ही नेहमी सरकारी विनंतीच्या वैधतेचे आणि पूर्णतेचे मूल्यांकन करतो.
आम्हाला बेकायदेशीर सामग्रीबद्दल किंवा आमच्या अटी आणि धोरणांचे उल्लंघन झाल्याची जाणीव होते, तेव्हा आम्ही खालील गोष्टींसह आणि सामग्री किंवा उल्लंघनाच्या स्वरूपावर अवलंबून कारवाई करू शकतो:
WhatsApp सेवाशर्तीमध्ये प्रतिबिंबित केल्यानुसार आम्ही अतिरिक्त कारवाई करू शकतो.