WhatsApp गोपनीयता धोरण
आशय सारणी
WhatsApp कायदेशीर माहिती
तुम्ही युरोपियन प्रदेशामध्ये राहत असल्यास, WhatsApp Ireland Limited ("WhatsApp," "आमचे," "आम्ही," किंवा "आम्हाला") तुम्हाला आमच्या सेवा सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत प्रदान करते. तुम्ही युरोपियन प्रदेशाच्या बाहेर राहत असल्यास, या सेवा तुम्हाला WhatsApp LLC द्वारे प्रदान केल्या जातील.
आम्ही Facebook Companies चा एक भाग आहोत. आमचे गोपनीयता धोरण ("गोपनीयता धोरण") आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही प्रक्रिया करतो त्या माहितीसह आमच्या डेटा पद्धतींचे स्पष्टीकरण देण्यात मदत करते.
उदाहरणार्थ, आमच्या गोपनीयता धोरणामध्ये आम्ही कोणती माहिती संकलित करतो आणि त्याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो याबद्दल सांगितले जाते. तसेच हे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही उचलत असलेल्या पावलांचे स्पष्टीकरण देते - जसे की आमच्या सेवांची उभारणी अशाप्रकारे करणे जेणेकरून पोहोचलेले संदेश आमच्याद्वारे स्टोअर केले जाणार नाहीत आणि आमच्या सेवांवरून तुम्ही कोणाशी संवाद साधावा याचेही नियंत्रण तुमच्याकडे राहते.
निर्दिष्ट केले जात नाही तोपर्यंत हे गोपनीयता धोरण आमच्या सर्व सेवांकरता लागू होते.
कृपया WhatsApp च्या सेवाशर्ती ("अटी") देखील वाचा, ज्यामध्ये तुम्ही वापरत असलेल्या आणि आम्ही आमच्या सेवा प्रदान करत असलेल्या अटींचे वर्णन केले जाते.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
मुख्य अपडेट्स
तुमच्या गोपनीयतेचा आदर करणे आमच्यामध्ये उपजत आहे. आम्ही WhatsApp सूरू केल्यापासून, आमच्या सर्व्हिस या कणखर गोपनीयता तत्त्व लक्षात घेऊनच तयार केल्या आहेत. आमच्या अपडेट केलेल्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणामंध्ये तुम्हाला पुढील गोष्टी आढळतील:
- आम्ही तुमचा डेटा कसा हाताळतो यावरील अतिरिक्त माहिती. आमच्या अपडेट केलेल्या अटी आणि गोपनीयता धोरण आमचा प्रक्रिया करण्याचा कायदेशीर आधार आणि गोपनीयतेशी आमच्या कटिबद्धतेसहित आम्ही तुमच्या डेटावर कशी प्रक्रिया करतो यावरील माहिती प्रदान करतात.
- बिझनेसेससह अधिक चांगले संभाषण. पुष्कळ बिझनेसेस त्यांच्या ग्राहक आणि क्लायंटसह संभाषण करण्यासाठी WhatsApp वर अवलंबून आहेत. आम्ही अशा बिझनेसेससोबत कार्य करतो जे तुमच्यासोबत त्यांचे संभाषण WhatsApp वर चांगल्या प्रकारे स्टोअर करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी Facebook किंवा तृतीय पक्षांचा वापर करतात.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
आम्ही संकलित करत असलेली माहिती
तुम्ही जेव्हा आमच्या सेवा इंस्टॉल करता, ॲक्सेस करता किंवा वापरता तेव्हा, आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारित करणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, सपोर्ट करणे आणि व्यापार करण्यासाठी WhatsApp ला काही माहिती प्राप्त करणे किंवा संकलित करणे आवश्यक आहे. तुम्ही आमच्या सेवा कशा प्रकारे वापरता त्यावर आम्ही कोणत्या प्रकारांची माहिती प्राप्त करतो आणि संकलित करतो ते अवलंबून असते.
आमच्या सेवा डिलिव्हर करण्यासाठी आम्हाला विशिष्ट माहितीची आवश्यकता आहे आणि त्याशिवाय आम्ही तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करू शकणार नाही. उदाहरणार्थ, आमच्या सेवा वापरण्यासाठी एक खाते तयार करण्याकरता तुम्ही तुमचा मोबाईल फोन नंबर देणे आवश्यक आहे.
आमच्या सेवांना तुम्ही वापरत असल्यास पर्यायी फीचर्स आहेत, तशी फीचर्स प्रदान करण्यासाठी आम्हाला अतिरिक्त माहिती संकालित करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला योग्य अशा संकलनांबद्दल सूचित केले जाईल. तुम्ही एखादे फीचर वापरण्यासाठी आवश्यक माहिती प्रदान न करणे निवडले असल्यास, तुम्ही हे फीचर वापण्यासाठी असमर्थ असाल. उदाहरणार्थ, तुम्ही आम्हाला तुमच्या डिव्हाइसवरून तुमचा लोकेशन डेटा संकलित करण्याची परवानगी देत नसल्यास, तुम्ही तुमच्या संपर्कासह तुमचे लोकेशन शेअर करू शकत नाही. परवानगी दोन्ही Android आणि iOS डिव्हाइसवरून तुमच्या सेटिंग्ज मेनूद्वारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात.
तुम्ही प्रदान केलेली माहिती
- तुमच्या खात्याची माहिती. WhatsApp खाते तयार करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल फोन नंबर आणि मूलभूत माहिती (तुमच्या आवडीच्या प्रोफाइल नावासह) प्रदान करणे आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला ही माहिती प्रदान केली नसल्यास, तुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी एखादे खाते तयार करू शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या खात्यात प्रोफाइल फोटो आणि "माझ्याबद्दल" माहिती यासारखी इतर माहिती जोडू शकता.
- तुमचे संदेश. आम्ही तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्याच्या सामान्य कालावधीमध्ये तुमचे संदेश राखून ठेवत नाही. त्याऐवजी, तुमचे संदेश तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केले जातात आणि सामान्यत: आमच्या सर्व्हरवर संग्रहित केले जात नाहीत. एकदा तुमचे संदेश पोहोचल्यावर, ते आमच्या सर्व्हर्सवरून हटविले जातात. खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये आम्ही अशा स्थितींचे वर्णन करतो की आम्ही त्यांना पोहोचवण्याच्या कालावधीत तुमचे मेसेजेस संग्रहित करू शकतो:
- न पोहोचलेले मेसेजेस. मेसेज त्वरित पोहोचवला जाऊ शकत नसल्यास, (उदाहरणार्थ, प्राप्तकर्ता ऑफलाइन असल्यास), आम्ही तो पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही तो आमच्या सर्व्हरवर एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात 30 दिवसांपर्यंत राखून ठेवतो. 30 दिवसानंतरही मेसेज पोहोचला नसल्यास, आम्ही तो हटवतो.
- मीडिया फॉरवर्ड करणे. वापरकर्ता मेसेजमध्ये मीडिया फॉरवर्ड करतो, तेव्हा, आम्ही अतिरिक्त फॉरवर्ड्सच्या अधिक कार्यक्षम पोहोचवण्याला मदत करण्यासाठी आमच्या सर्व्हर्सवर त्या मीडियाला तात्पुरते कूटबद्ध स्वरूपात स्टोअर करतो.
- आम्ही आमच्या सेवांसाठी एंड टू एंड एन्क्रिप्शन देऊ करतो. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे तुमचे मेसेजेस आमच्यापासून आणि तृतीय पक्षाकडून वाचले जाण्यापासून संरक्षित करण्यासाठी त्यांना कूटबद्ध केले जाते. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि WhatsApp वर बिझनेसेस तुमच्याशी कसा संवाद साधतात याबद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमचे कनेक्शन्स. आमच्या सेवांचे वापरकर्ते आणि तुमच्या इतर संपर्कांसह, नियमितपणे तुमच्या ॲड्रेस बुकमधील फोन नंबर्ससह लागू असलेल्या कायद्यांद्वारे परवानगी दिली असल्यास, तुम्ही संपर्क अपलोड फीचर वापरू शकता आणि आम्हाला ते प्रदान करू शकता. तुमचे कोणतेही संपर्क अद्याप आमच्या सेवा वापरत नसल्यास, आम्ही तुमच्यासाठी ही माहिती अशा प्रकारे व्यवस्थापित करू की ते संपर्क आमच्याद्वारे ओळखले जाऊ शकणार नाहीत. येथे आमच्या संपर्क अपलोड फीचरबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करू शकता, सामील होऊ शकता किंवा जोडले जाऊ शकता आणि असे ग्रुप आणि याद्यांचा तुमच्या खाते माहितीशी संबद्ध असू शकतो. तुम्ही तुमच्या ग्रुपला एक नाव देता. तुम्ही ग्रुप प्रोफाइल फोटो किंवा वर्णन प्रदान करू शकता.
- स्टेटस माहिती. तुम्ही तुमच्या खात्यावर एखादे स्टेटस समाविष्ट करणे निवडल्यास, तुम्ही आम्हाला ते देऊ शकता. Android, iPhone, किंवा KaiOS वर स्टेटस कसे वापरायचे याबद्दल जाणून घ्या.
- व्यवहार आणि पेमेंट्स डेटा. तुम्ही आमची पेमेंट्स सेवा वापरल्यास किंवा खरेदी किंवा इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली असल्यास, आम्ही पेमेंट खाते आणि व्यवहाराच्या माहितीसह, तुमच्याबद्दलच्या अतिरिक्त माहितीवर प्रक्रिया करतो. व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीच्या समावेशासह पेमेंट खाते आणि व्यवहाराची माहिती (उदाहरणार्थ, तुमच्या पेमेंट पद्धतीबद्दलची माहिती, शिपिंगचे तपशील आणि व्यवहाराची रक्कम) तुम्ही तुमच्या देश किंवा प्रदेशामध्ये उपलब्ध असलेल्या आमच्या पेमेंट सेवांचा वापर केलेला असल्यास, आमच्या गोपनीयता पद्धती लागू पेमेंट्स गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केल्या आहेत.
- ग्राहक मदत समिती आणि इतर संप्रेषणे. तुम्ही ग्राहक मदतीच्या संदर्भात आमच्याशी संपर्क साधता किंवा आमच्याशी संवाद साधता तेव्हा तुम्ही आमच्या सेवांच्या वापराशी संबंधित तुमच्या माहितीसह, तुमच्या संदेशांबाबत, तुम्हाला अत्यंत उपयुक्त वाटणारी कोणतीही इतर माहिती आणि तुम्हाला संपर्क कसा साधावा याबद्दल माहिती आम्हाला प्रदान करता (उदा. एखादा ई-मेल ॲड्रेस). उदाहरणार्थ, तुम्ही आमच्या ॲपच्या कार्यप्रदर्शन किंवा अन्य समस्यांशी संबंधित असलेल्या माहितीसह आम्हाला एखादा ईमेल पाठवू शकता.
स्वयंचलितपणे संकलित केलेली माहिती
- वापर आणि लॉग माहिती. आम्ही आमच्या सेवांवरील सेवेशी-संबंधित, निदान आणि कार्यप्रदर्शन माहिती यासारखी तुमच्या कृतींविषयीची माहिती संकलित करतो. यामध्ये तुमच्या लॉग फायली आणि निदान, क्रॅश, वेबसाईट आणि कार्यप्रदर्शन लॉग आणि अहवाल (तुम्ही आमच्या सेवा कशा वापराल, तुमच्या सेवा सेटिंग्ज, तुम्ही आमच्या सेवांचा वापर करुन इतरांशी कसा संवाद साधता यासह (तुम्ही एखाद्या व्यवसायाशी संवाद साधता त्याच्या समावेशासह) आणि तुमच्या कृतींची आणि संवादाची वेळ, वारंवारता आणि कालावधी यांसह) यासारख्या कृतीविषयी माहिती समाविष्ट आहे. यामध्ये तुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी कधी नोंदणी केली; आमचे मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस, ग्रुप्स (ग्रुपचे नाव, ग्रुप फोटो, ग्रुपविषयी माहिती), पेमेंट्स किंवा व्यवसाय फीचर्स यासारखे तुम्ही वापरत असलेले फीचर्स; प्रोफाईल फोटो; "माझ्याबद्दल" माहिती; तुम्ही ऑनलाईन आहात किंवा नाही; तुम्ही आमची सेवा अंतिम वेळी केव्हा वापरली (तुमचे "अखेरचे पाहिलेले"); आणि तुम्ही "माझ्याबद्दल" ची माहिती अखेरची केव्हा अपडेट केली याबद्दलची माहिती देखील समाविष्ट असते.
- डिव्हाइस आणि कनेक्शन माहिती. तुम्ही आमच्या सेवा इंस्टॉल करता, ॲक्सेस करता किंवा वापरता तेव्हा, आम्ही डिव्हाइस आणि कनेक्शनची-विशिष्ट माहिती संकलित करतो. यामध्ये हार्डवेअर मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टमची माहिती, बॅटरी पातळी, सिग्नल सामर्थ्य, ॲपची आवृत्ती, ब्राउझर माहिती, मोबाइल नेटवर्क, फोन नंबर, मोबाइल ऑपरेटर किंवा आयएसपीसह कनेक्शन माहिती, भाषा आणि वेळ क्षेत्र, आयपी पत्ता, डिव्हाइस ऑपरेशन माहिती, आणि अभिज्ञापक (समान डिव्हाइस किंवा खात्याशी संबंधित असलेल्या Facebook कंपनी प्रॉडक्ट्स च्या विशिष्ट अभिज्ञापकांसह) यांचा समावेश असतो.
- स्थान माहिती. तुम्ही स्थानाशी संबंधित फीचर्स वापरणे निवडता तेव्हा आम्ही तुमच्या परवानगीसह तुमच्या डिव्हाइसवरून अचूक स्थान माहिती संकलित करतो आणि वापरतो, जसे की तुम्ही तुमच्या संपर्कांसह तुमचे स्थान शेअर करण्याचा निर्णय घेता किंवा जवळपासची स्थाने किंवा इतरांनी तुमच्यासह शेअर केलेली स्थाने पाहता. स्थान शेअर करणे यासारख्या स्थान-संबंधित माहितीशी संबंधित असलेल्या काही सेटिंग्ज येथे आहेत, ज्या तुम्ही तुमच्या डिव्हाइस सेटिंग्ज किंवा ॲप-मधील सेटिंग्जमध्ये शोधू शकता. तुम्ही आमची स्थान-संबंधित फीचर्स वापरत नसले तरीही आम्ही तुमच्या सामान्य स्थानाचा (उदा. शहर आणि देश) अंदाज लावण्यासाठी आयपी पत्ते आणि फोन नंबर क्षेत्र कोड यासारख्या इतर माहितीचा वापर करतो . आम्ही तुमची स्थान माहिती निदान आणि समस्यानिवारणाच्या उद्देश्यांसाठी देखील वापरतो.
- कुकीज. वेब-आधारित असलेल्या आमच्या सेवा प्रदान करणे, तुमचे अनुभव सुधारित करणे, आमच्या सेवा कशा वापरल्या जात आहेत हे समजून घेणे आणि त्या सानुकूलित करणे यांच्या समावेशासह, आम्ही आमच्या सेवा संचालित आणि प्रदान करण्यासाठी कुकीजचा वापर करतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या सेवा वेब आणि डेस्कटॉप आणि इतर वेब-आधारित सेवा पुरवण्यासाठी कुकीजचा वापर करतो. आमच्या मदत केंद्र लेखांमधील कोणते लेख सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत हे समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार आमच्या सेवांशी निगडित संबंधित माहिती तुम्हाला दाखविण्यासाठी देखील आम्ही कुकीज वापरू शकतो. याव्यतिरिक्त, आम्ही तुमची भाषा प्राधान्ये यासारख्या तुमच्या निवडी लक्षात ठेवण्यासाठी, सुरक्षित अनुभव प्रदान करण्यासाठी आणि अन्यथा तुमच्यासाठी आमच्या सेवा सानुकूलित करण्यासाठी देखील कुकीज वापरू शकतो. आम्ही तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी कुकिजचा वापर कसा करतो याबद्दल अधिक जाणून घ्या.
तृतीय पक्षाची माहिती
- तुमच्याबद्दल इतरांनी प्रदान केलेली माहिती. आम्ही इतर वापरकर्त्यांकडून तुमच्याबद्दल माहिती प्राप्त करतो. उदाहरणार्थ, तुम्ही ओळखत असलेले इतर वापरकर्ते आमच्या सेवा वापरतात तेव्हा ते तुमचा फोन नंबर, नाव आणि इतर माहिती (जसे की त्यांच्या मोबाइल ॲड्रेस बुकवरील माहिती) यासारखी माहिती जशी तुम्ही त्यांना प्रदान केली असेल त्याप्रमाणे आम्हाला प्रदान करतात. ते तुम्हाला संदेश देखील पाठवू शकतात, तुमच्याशी संबधित असलेल्या ग्रुप्सवर संदेश पाठवू शकतात किंवा तुम्हाला कॉल करू शकतात. या प्रत्येक वापरकर्त्याकडे आम्हाला कोणताही माहिती प्रदान करण्यापूर्वी तुमची माहिती संकलित करणे, वापरणे आणि शेअर करण्याचे कायदेशीर अधिकार असणे आम्हाला आवश्यक आहे.
तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्वसाधारणपणे कोणताही वापरकर्ता तुमच्या चॅट्स किंवा संदेशांचे स्क्रीनशॉट्स कॅप्चर करू शकतो किंवा त्यांच्यासह केलेल्या तुमच्या कॉलची रेकॉर्डिंग करू शकतो आणि ते तो WhatsApp वर किंवा इतर कोणालाही पाठवू शकतो किंवा दुसर्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना पोस्ट करू शकतो. - वापरकर्ता तक्रारी. ज्याप्रमाणे तुम्ही इतर वापरकर्त्यांची तक्रार नोंदवू शकता, त्याचप्रमाणे इतर वापरकर्ते किंवा तृतीय पक्ष देखील त्याच्यासह किंवा आमच्या सेवांवरील इतरांसह तुमच्या परस्पर संवादांबद्दल आणि तुमच्या संदेशाबद्दल आमच्याकडे तक्रार नोंदवणे निवडू शकतात; उदाहरणार्थ, आमच्या अटी किंवा धोरणांच्या संभाव्य उल्लंघनाची तक्रार नोंदवणे. जेव्हा तक्रार नोंदवली जाते, तेव्हा आम्ही तक्रार नोदवणारा वापरकर्ता आणि तक्रार नोंदवलेल्या वापरकर्ता दोघांची माहिती संकलित करतो. वापरकर्ता तक्रार नोंदवतो तेव्हा काय होते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया ''प्रगत सुरक्षा आणि सुरक्षा फीचर्स'' येथे पहा.
- WhatsApp वरील बिझनेस. आमची सेवा वापरुन तुम्ही ज्या बिझनेसेसशी संवाद साधता ते आम्हाला तुम्ही त्यांच्याशी केलेल्या परस्परसंवादाविषयी माहिती प्रदान करू शकतात. आम्हाला कोणतीही माहिती प्रदान करताना लागू असलेल्या कायद्यासह त्यानुसार वागण्यासाठी या बिझनेसेसपैकी प्रत्येकाची आवश्यकता आहे. तुम्ही WhatsApp वर बिझनेससह संदेश पाठवता तेव्हा हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की तुम्ही शेअर केलेली सामुग्री त्या बिझनेसमधील इतर बर्याच लोकांना दिसू शकते. याव्यतिरिक्त, काही बिझनेसेस तृतीय-पक्ष सेवा प्रदात्यांसह (ज्यात Facebook समाविष्ट असू शकते) त्यांच्या ग्राहकांशी त्यांचे संप्रेषण व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी कार्य करत असतील. उदाहरणार्थ, एखादा बिझनेस अशा तृतीय-पक्षाच्या सेवा प्रदात्याला त्याच्या बिझनेससाठी पाठविण्यासाठी, संग्रहित करण्यासाठी, वाचण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याच्या संप्रेषणांमध्ये ॲक्सेस देऊ शकतो.
एखादा बिझनेस तुमची माहिती तृतीय पक्ष किंवा Facebook सह कशी शेअर करेल यासह तुमच्या माहितीवर कशी प्रक्रिया करतो हे समजून घेण्यासाठी, तुम्ही बिझनेसच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन केले पाहिजे किंवा बिझनेसशी थेट संपर्क साधला पाहिजे. - तृतीय-पक्ष सेवा प्रदाते. आम्ही आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, सपोर्ट करणे आणि व्यापार करण्यात मदत करण्यासाठी तृतीय-पक्ष सेवा प्रदाते आणि अन्य Facebook Companies सह कार्य करतो. उदाहरणार्थ, आम्ही त्यांच्यासह आमच्या अॅप्सचे वितरण करणे; आमच्या तांत्रिक आणि भौतिक पायाभूत सुविधा, पोहोचवणे आणि इतर सिस्टीम्स प्रदान करणे; अभियांत्रिकी सपोर्ट, सायबरसुरक्षा सपोर्ट आणि ऑपरेशनल सपोर्ट प्रदान करणे; स्थान, नकाशा आणि ठिकाणांची माहिती पुरवणे; प्रक्रियेचे पेमेंट्स; लोक आमच्या सेवा कशा वापरतात हे समजून घेण्यासाठी आम्हाला मदत करणे; आमच्या सेवा बाजारात आणणे; आमच्या सेवा वापरुन बिझनेसेसशी संपर्क साधण्यास मदत करणे; आमच्यासाठी सर्वेक्षण आणि संशोधन पूर्ण करणे; सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडता याची खात्री करणे; आणि ग्राहक सेवेसह मदत करणे यासाठी कार्य करतो. या कंपन्या आम्हाला विशिष्ट परिस्थितीमध्ये तुमच्याबद्दल माहिती प्रदान करू शकतात; उदाहरणार्थ, App Store आम्हाला सेवा समस्यांचे निदान आणि निराकरण करण्यात मदत करण्यासाठी अहवाल देखील प्रदान करू शकतात.
खालील "इतर Facebook Companies सह आम्ही कसे कार्य करतो'' विभागांतर्गत WhatsApp इतर Facebook Companies सह माहिती कशी संकलित आणि शेअर करते याबद्दल अधिक माहिती प्रदान केली जाते. तुम्ही आमच्या मदत केंद्रामध्ये आम्ही Facebook Companies सह कसे कार्य करतो याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. - तृतीय-पक्ष सेवा. आम्ही तुम्हाला आमच्या सेवा तृतीय-पक्ष सेवा आणि Facebook कंपनी प्रॉडक्ट्स यांच्या संबंधात वापरण्याची परवानगी देतो. तुम्ही आमच्या सेवा अशा तृतीय-पक्षाच्या सेवा किंवा Facebook कंपनी प्रॉडक्ट्ससह वापरल्या असल्यास, आम्ही त्यांच्याकडून तुमच्याबद्दल माहिती प्राप्त करू शकतो; उदाहरणार्थ, तुम्ही आमच्या सेवांवरील तुमच्या WhatsApp संपर्क, ग्रुप किंवा ब्रॉडकास्ट लिस्टसह एखादा बातमी लेख शेअर करण्यासाठी एखाद्या बातमी सेवेवरील WhatsApp शेअर बटण वापरले असल्यास किंवा तुम्ही मोबाईल कॅरीयरच्या किंवा डिव्हाइस प्रदात्याच्या आमच्या सेवांच्या जाहिरातीद्वारे आमच्या सेवांमध्ये ॲक्सेस करणे निवडले असल्यास. कृपया हे लक्षात घ्या की तुम्ही तृतीय-पक्ष सेवा किंवा Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वापरता, तेव्हा त्यांच्या स्वत: च्या अटी आणि गोपनीयता धोरणे तुमच्या त्या सेवांच्या आणि उत्पादनांच्या वापराला नियंत्रित करतात.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
आम्ही माहिती कशा प्रकारे वापरतो
आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारित करणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, सपोर्ट करणे आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली (तुम्ही निवडलेल्या आणि लागू असलेल्या कायद्याच्या अधीन) माहिती वापरतो. कसे ते येथे दिले आहे :
- आमच्या सेवा. आम्ही आमच्या सेवा ऑपरेट करण्यासाठी आणि प्रदान करण्यासाठी आमच्याकडे असलेली माहिती वापरत आहोत, ज्यामध्ये ग्राहक मदत समिती प्रदान करणे, खरेदी किंवा व्यवहार पूर्ण करणे; आणि आमच्या सेवा सुधारणे, निराकरण करणे आणि सानुकूलित करणे समाविष्ट आहे. लोक आमच्या सेवा कशा वापरतात हे समजून घेण्यासाठी; आमच्या सेवांचे मूल्यांकन आणि सुधारित करण्यासाठी; नवीन सेवा आणि फीचर्सचे संशोधन, विकास आणि चाचणी घेण्यासाठी; आणि समस्या निवारण क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली माहिती वापरतो. तुम्ही जेव्हा आमच्याशी संपर्क साधता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी देखील आम्ही तुमची माहिती वापरतो.
- सुरक्षितता, सुरक्षा आणि एकात्मता. सुरक्षितता, सुरक्षा आणि एकात्मता हे आमच्या सेवांचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. आम्ही खाते आणि क्रियाकलापांची पडताळणी करण्यासाठी; हानिकारक आचरणाचा सामना करण्यासाठी, वापरकर्त्यांना वाईट अनुभवांपासून आणि स्पॅमपासून संरक्षण देण्यासाठी; आणि संशयास्पद क्रियाकलाप किंवा आमच्या अटी आणि धोरणांचे उल्लंघन तपासून आमच्या सर्व्हिसेसवरील किंवा बाहेरील सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडतेस प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या सर्व्हिसेस कायदेशीररित्या वापरल्या जात आहेत हे निश्चित करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली माहिती वापरतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील " कायदा, आमचे अधिकार आणि संरक्षण" विभाग माहिती पहा.
- आमच्या सेवा आणि Facebook Companies विषयीचे संप्रेषण. आमच्या सेवेबद्दल तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि आमच्या अटी आणि धोरणे आणि इतर महत्त्वपूर्ण अपडेट्सविषयी तुम्हाला माहिती करून देण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली माहिती वापरतो. आम्ही आमच्या सर्व्हिसेस आणि Facebook Companies च्या सर्व्हिसेससाठी तुम्हाला विपणन प्रदान करू शकतो. कृपया अधिक माहितीसाठी "तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर कसा करता" विभाग पहा.
- कोणत्याही तृतीय-पक्षांच्या जाहिरातींचे बॅनर नाहीत. आम्ही अद्याप तृतीय पक्षाच्या जाहिरातींच्या बॅनरला आमच्या सेवांवर अनुमती दिलेली नाही. त्यांचा परिचय करून देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, परंतु जर आम्ही तसे केल्यास, आम्ही हे गोपनीयता धोरण अपडेट करू.
- बिझनेसमधील सुसंवाद. आम्ही तुम्हाला आणि बिझनेसेस सारख्या तृतीय पक्षांना WhatsApp वरील बिझनेसेससाठी कॅटलॉग यासारख्या आमच्या सेवांचा वापर करुन एकमेकांशी संप्रेषण करणे आणि संवाद साधण्यासाठी सक्षम करतो जिथे तुम्ही प्रॉडक्ट्स आणि सेवा ब्राऊझ करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. बिझनेसेस तुम्हाला व्यवहार, भेट आणि शिपिंग नोटिफिकेशन्स; प्रॉडक्ट आणि सेवा अपडेट्स; आणि विपणन पाठवू शकतात. उदाहरणार्थ, आगामी प्रवासासाठी तुम्हाला फ्लाईट स्टेटस बद्दलची माहिती, तुमच्या एखाद्या खरेदीची पावती किंवा डिलिव्हरी कधी पूर्ण होईल याची सूचना मिळू शकेल. तुम्हाला बिझनेसमधून प्राप्त होणार्या संदेशामध्ये तुम्हाला स्वारस्य असलेल्या एखाद्या गोष्टीची ऑफर असू शकते. तुम्हाला स्पॅमचा अनुभव मिळावा अशी आमची इच्छा नाही; तुमच्या सर्व संदेशांसह तुम्ही या संप्रेषणांना व्यवस्थापित करू शकता आणि आम्ही तुमच्या निवडींचा आदर करतो.
- मेसेजिंग मेटाडेटा. मेसेजिंग मेटाडेटामध्ये अशी माहिती समाविष्ट असते की ज्यावर आम्ही तुमचे संदेश पोहोचवण्यासाठी किंवा कॉल्स पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया करतो आणि त्यामध्ये तुमचा वापरकर्ता आयडी आणि तुम्ही संदेश पाठविता त्यावेळेची माहिती समाविष्ट असते. आम्ही संप्रेषण प्रसारित करण्यासाठी, आमच्या सेवा ऑपरेट करण्यासाठी(सामान्य रहदारीचे व्यवस्थापन करणे आणि अपयशाला प्रतिबंध घालणे, शोधणे, तपास करणे आणि उपाय करणे यांचा समावेश आहे), आमच्या सेवांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी (ज्यामध्ये त्यांची उपलब्धता, सत्यता, अखंडता आणि गोपनीयता आणि विशेषतः सुरक्षा घटना, स्पॅम, उल्लंघन, मालवेयरवर प्रतिबंध घालणे, शोधणे, तपास करणे आणि उपाय करणे आणि सेवांचा अनधिकृत वापर करणे किंवा त्यावर ॲक्सेस करणे यांचा समावेश आहे), बिलिंगसाठी(लागू असल्यानुसार) आणि लागू कायद्यांतर्गत कायदेशीर कर्तव्य पाळण्यासाठी मेसेजिंग मेटाडेटा वापरतो.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
तुम्ही आणि आम्ही शेअर करत असलेली माहिती
तुम्ही आमच्या सेवांचा वापर करता आणि त्याद्वारे संवाद साधता तेव्हा तुम्ही तुमची माहिती शेअर करता आणि आम्ही आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारित करणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, सपोर्ट करणे आणि व्यवहार करण्यास आम्हाला मदत करण्यासाठी तुमची माहिती शेअर करतो.
- ज्यांच्याशी तुम्ही संवाद साधणे निवडले आहे त्यांना तुमची माहिती पाठवा. तुम्ही आमच्या सेवांचा वापर करता आणि त्याद्वारे संवाद साधता तेव्हा तुम्ही तुमची माहिती (संदेशासह) शेअर करता.
- तुमच्या खात्याशी संबंधित असलेली माहिती. तुमचा फोन नंबर, प्रोफाइल नाव आणि फोटो, "माझ्याबद्दल" माहिती, अखेरचे पाहिलेले माहिती आणि संदेशाच्या पावत्या आमच्या सेवा वापरणार्या कोणाकरताही उपलब्ध आहेत, तरीही बिझनेस, तुम्ही कोणाशी संवाद साधता यासह, इतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेली विशिष्ट माहिती व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या सेवा सेटिंग्ज कॉन्फिगर करू शकता.
- तुमचे संपर्क आणि इतर. वापरकर्ते बिझनेस, ज्यांच्याशी तुम्ही संवाद साधता त्यांच्यासह आमच्या सेवांवरील किंवा बाहेरील इतरांसह तुमची माहिती (तुमचा फोन नंबर किंवा संदेशासह) संचयित किंवा पुन्हा शेअर देखील करू शकतात. तुम्ही आमच्या सेवांवर कोणाशी संवाद साधता आणि विशिष्ट माहिती शेअर करता हे व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही आमच्या सेवा सेटिंग्ज आणि "ब्लॉक" फीचरचा वापर करू शकता.
- WhatsApp वरील बिझनेस. आम्ही बिझनेसेसना त्यांच्या आमच्या सेवांच्या वापरासंबंधीचे मेट्रिक्स त्यांना प्रदान करणे यासारख्या विशिष्ट सेवा आणि फीचर्स ऑफर करतो.
- तृतीय-पक्ष सेवा प्रदाते. आम्ही आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, सपोर्ट करणे आणि व्यापार करण्यात मदत करण्यासाठी तृतीय-पक्ष सेवा प्रदाते आणि अन्य Facebook Companies सह कार्य करतो. तांत्रिक पायाभूत सुविधा, पोहोचवणे आणि इतर सिस्टम पुरविणे; आमच्या सेवांना बाजारात आणणे; आमच्यासाठी सर्वेक्षण आणि संशोधन पूर्ण करणे; वापरकर्त्यांची आणि इतरांची सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडतेचे रक्षण करणे; आणि ग्राहक सेवेला मदत करणे यासारख्या आमच्या सेवांना सपोर्ट देण्यासाठी आम्ही या कंपन्यांसह कार्य करतो. आम्ही या क्षमतेसह तृतीय-पक्ष सेवा प्रदाते आणि इतर Facebook Companies सह माहिती शेअर करतो, तेव्हा आम्हाला त्यांनी आमच्या सूचना आणि अटीनुसार तुमची माहिती आमच्या वतीने वापरणे आवश्यक आहे. Facebook Companies आम्हाला आमच्या सेवा ऑपरेट करण्यात आणि प्रदान करण्यात कशी मदत करतात याबद्दलच्या अधिक माहितीसाठी, खालील "Facebook Companies सह आम्ही कसे कार्य करतो" हे पहा. तुम्ही आमच्या मदत केंद्रामध्ये आम्ही Facebook Companies सह कसे कार्य करतो याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.
- तृतीय-पक्ष सेवा. तुम्ही किंवा इतर कोणीही आमच्या सेवांमध्ये एकत्रित असलेल्या तृतीय-पक्ष सेवा किंवा इतर Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वापरतात तेव्हा, त्या तृतीय-पक्ष सेवा तुम्ही किंवा इतर कोणीही त्यांच्यासह काय शेअर करता याबद्दल माहिती प्राप्त करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही आमच्या सेवांसह एकत्रित केलेली डेटा बॅकअप सेवा वापरली असल्यास (जसे की iCloud किंवा Google ड्राइव्ह), ते तुमच्या WhatsApp संदेश यासारखी तुम्ही त्यांच्यासह शेअर केलेली माहिती प्राप्त करतील. तुम्ही तृतीय-पक्षाच्या सेवेसह किंवा आमच्या सेवांद्वारे लिंक केलेल्या इतर Facebook कंपनी प्रॉडक्टसह संवाद साधत असल्यास, जसे की तुम्ही तृतीय-पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरुन सामुग्री प्ले करण्यासाठी एप्लिकेशन प्लेअर वापरता तेव्हा, तुमचा IP पत्ता आणि तुम्ही WhatsApp वापरकर्ते आहात हे तथ्य आणि तुमच्याबद्दलची माहिती, तृतीय-पक्षाला किंवा Facebook कंपनी प्रॉडक्टला प्रदान केली जाऊ शकते. कृपया हे लक्षात घ्या की तुम्ही तृतीय-पक्ष सेवा किंवा इतर Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वापरता, तेव्हा त्यांच्या स्वत: च्या अटी आणि गोपनीयता धोरणे तुमच्या त्या सेवांच्या आणि उत्पादनांच्या वापराला नियंत्रित करतात.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
आम्ही इतर Facebook Companies सह कसे कार्य करतो
Facebook Companies चा एक भाग म्हणून, WhatsApp Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वरील सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी, इतर Facebook Companies कडून माहिती प्राप्त करते आणि त्यांच्याबरोबर शेअर करते, उदा. स्पॅम, धमक्या, गैरवर्तन किंवा उल्लंघनाच्या क्रियाकलापांचा सामना करणे.
WhatsApp देखील आमच्या सर्व्हिसेस ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारित करणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, सपोर्ट करणे आणि बाजारपेठेत आणण्यात आमची मदत करण्यासाठी आमच्या वतीने कार्य करणार्या इतर Facebook Companies सोबत कार्य करते आणि माहिती शेअर करते. यामध्ये पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सिस्टमच्या तरतुदीचा समावेश होतो, उदा. तुम्हाला जगभरात जलद आणि विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉल प्रदान करणे; पायाभूत सुविधा आणि पोहोचवण्याची सिस्टीम सुधारणे; आमच्या सर्व्हिसेस कशा वापरल्या जातात हे समजून घेणे; तुम्हाला बिझनेसेससह जोडले जाण्यासाठी मार्ग प्रदान करण्यात आम्हाला मदत करणे; आणि सिस्टम सुरक्षित करणे. आम्हाला Facebook Companies कडून सर्व्हिसेस प्राप्त होतात तेव्हा, आम्ही त्यांच्याबरोबर शेअर केलेली माहिती WhatsApp च्या वतीने आणि आमच्या सूचनांनुसार वापरली जाते. या आधारावर WhatsApp शेअर करत असलेली कोणतीही माहिती Facebook Companies च्या स्वत: च्या उद्देश्यासाठी वापरली जाऊ शकत नाही.
आम्ही Facebook Companies. सह WhatsApp कसे कार्य करते याबद्दल आमच्या मदत केंद्रामध्ये पुढील माहिती सेट केली आहे.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
डेटा प्रक्रियेसाठी आमचा कायदेशीर आधार
लागू डेटा संरक्षण कायद्याअंतर्गत, डेटावर प्रक्रिया करण्यासाठी कंपन्यांकडे कायदेशीर आधार असणे आवश्यक आहे. या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केलेल्या विविध उद्देश्यांसाठी तुमच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कायदेशीर आधारांवर अवलंबून आहोत. खाली स्पष्ट केल्याप्रमाणे, परिस्थितीनुसार, आम्ही त्याच उद्देश्यासाठी तुमच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कायदेशीर आधारांवर अवलंबून राहू शकतो. खाली दिलेल्या प्रत्येक कायदेशीर आधारासाठी, आम्ही आमच्या प्रक्रियेच्या उद्देश्यांचे (आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का करतो) आणि आमच्या प्रक्रिया ऑपरेशन्सचे (आम्ही तुमच्या डेटावर कशी प्रक्रिया करतो, उदा. आम्ही तुमच्याकडून माहिती संकलित करतो आणि तुमचे खाते तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो) वर्णन करतो. आम्ही प्रत्येक उद्देश्यासाठी प्रक्रिया केलेल्या तुमच्या डेटाच्या कॅटेगरीजच्या सूची देखील बनवतो.
आम्ही कोणते कायदेशीर आधार वापरतो त्यावर आधारीत तुमच्याकडे देखील तुमच्यासाठी विशिष्ट अधिकार उपलब्ध आहेत आणि आम्ही ते खाली स्पष्ट केले आहेत. कोणताही कायदेशीर आधार लागू होत असला तरी तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की, तुमच्याकडे तुमच्या डेटामध्ये ॲक्सेस करण्याची विनंती करण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा आणि तो मिटविण्याचा अधिकार आहे. तुमच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, खालील "तुम्ही तुमच्या अधिकारांचा कसा वापर करता" विभाग पहा.
"आम्ही संकलित केलेली माहिती" विभागामध्ये वर्णन केलेली माहिती आम्ही संकलित करतो, वापरतो आणि शेअर करतो :
- आमच्या अटींच्या "आमच्या सेवा" विभागात वर्णन केल्यानुसार मेसेजिंग आणि संप्रेषण सेवा ऑपरेट करणे आणि प्रदान करणे आवश्यक आहे. येथे अधिक जाणून घ्या;
- जेथे लागू असेल (संमती कायदेशीरपणे आवश्यक असेल त्यासह), तुम्ही तुमची संमती दिली असल्यास, तुम्ही ती कधीही मागे घेऊ शकता. येथे अधिक जाणून घ्या;
- आम्हाला कायदा अंमलबजावणीकडून आलेल्या कायदेशीर विनंतीला प्रतिसाद देण्याची आवश्यकता असेल तेव्हा, अशा कायदेशीर कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. येथे अधिक जाणून घ्या;
- जेव्हा आणि आवश्यक असल्यानुसार तुमच्या किंवा इतरांच्या महत्त्वाच्या हितांचे संरक्षण करणे, जसे की एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिथे तुमच्या किंवा कोणीतरी दुसर्याच्या जिवाला धोका असतो. येथे अधिक जाणून घ्या;
- आमच्या (किंवा इतरांच्या) कायदेशीर हितांसाठी, आमच्या वापरकर्त्यांना आणि भागीदारांना एक नाविन्यपूर्ण, संबधित, सुरक्षित, आणि फायदेशीर सेवा प्रदान करणे आवश्यक आहे, जोपर्यंत त्या हितांना तुमची हिते किंवा मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याद्वारे अधोरेखीत केले जात नाही तोपर्यंत व्यक्तिगत डेटाचे संरक्षण करणे आवश्यक आहे; उदाहरणार्थ, हानिकारक किंवा बेकायदेशीर क्रियाकलापाकरता आमच्या सेवांचा वापर करण्याला प्रतिबंधित करणे. येथे अधिक जाणून घ्या;
- जेथे ते सार्वजनिक हितासाठी आवश्यक आहे. येथे अधिक जाणून घ्या.
आम्ही तुमचा डेटा आणि तसे करण्यासाठी आमच्या कायदेशीर आधारांवर प्रक्रिया करीत असलेल्या मार्ग आणि उद्देश्याबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
आम्ही तुमच्या माहितीवर कशी प्रक्रिया करतो :
अटींनुसार सेवांची तरतूद
आम्ही तुमच्यासह आमचा करार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यानुसार आमच्याकडे असलेल्या तुमच्याबद्दलच्या ("आम्ही संकलित केलेली माहिती " विभागामध्ये वर्णन केल्यानुसार) डेटावर प्रक्रिया करतो (अटी नुसार). आम्ही प्रक्रिया करतो त्या डेटाच्या कॅटेगरीज तुम्ही प्रदान करण्यासाठी निवडलेल्या डेटावर आणि तुम्ही आमच्या सेवा (ज्या आम्ही स्वयंचलितपणे संकलित करतो त्या माहितीला निश्चित करतात) कशा वापरता यावर अवलंबून असतील. आमच्या करारात्मक सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेले प्रक्रिया हेतू:
आम्ही तुमच्या डेटावर का आणि कशी प्रक्रिया करतो :
- आमच्या अटींच्या ''आमच्या सर्व्हिसेस'' विभागामध्ये वर्ण केल्यानुसार आमच्या सर्व्हिसेसना ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारित करणे, सानुकूलित करणे आणि सपोर्ट करण्यासाठी ज्यामध्ये तुमच्या बिझनेसेससह इतर WhatsApp वापरकर्त्यांशी संपर्क आणि संवाद साधण्यासाठी तुम्हाला प्रदान करण्याचे मार्ग समाविष्ट आहेत. यामध्ये WhatsApp खाते तयार करण्यासाठी तुमच्याकडून माहिती संकलित करणे, WhatsApp द्वारे पोहचण्यायोग्य असलेल्या बिझनेसशी तुम्हाला जोडणे, आमच्या सर्व्हिसेसच्या तुमच्या वापराचे विश्लेषण करणे, एखाद्या समस्येला उत्तर म्हणून ग्राहक मदत समिती पुरविणे किंवा तुम्ही तुमचे खाते बंद करणे निवडले असल्यास, तुमचा डेटा हटविणे हे समाविष्ट आहे.
- आम्ही संप्रेषण प्रसारित करण्यासाठी; सामान्य रहदारीचे व्यवस्थापन करणे आणि अपयशाला प्रतिबंध घालणे, शोधणे, तपास करणे आणि उपाय करणे यांचा समावेशासह सर्व्हिसेस ऑपरेट करणे; आणि लागू असेल त्यानुसार, बिलिंगसाठी मेसेजिंग मेटाडेटाचा वापर करतो.
- एकाधिक खाती वापरुन स्पॅमर्सवर उदाहरण म्हणून कारवाई करून आमच्या सेवांची सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडता सुनिश्चित करणे. यामध्ये तुम्ही एखादे खाते तयार करता तेव्हा तुम्ही प्रदान केलेल्या डेटाची पडताळणी करणे किंवा आमच्या सर्व्हिसेस बेकायदेशीरपणे वापरण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी तुमच्या संबंधित असलेल्या संशयास्पद क्रियाकलापाचे विश्लेषण करणे समाविष्ट असू शकते.
- आमच्या सर्व्हिसेची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ज्यामध्ये त्यांची उपलब्धता, सत्यता, अखंडता आणि गोपनीयता आणि विशेषतः सुरक्षा घटना, उल्लंघन, मालवेयरवर आणि स्पॅमसारख्या आमच्या सर्व्हिसेसच्या उपलब्धतेवर नकारात्मक परिणाम करू शकणार्या घटकांवर प्रतिबंध घालणे, शोधणे, तपास करणे आणि उपाय करणे किंवा सर्व्हिसेस किंवा वापरकर्ता डिव्हाइसचा अनधिकृत ॲक्सेस किंवा वापर सक्षम करणे समाविष्ट आहे, आम्ही मेसेजिंग मेटाडेटाचा वापर करतो.
अधिक जाणून घेण्यासाठी, WhatsApp सुरक्षा येथे जा. - "आमच्या ग्लोबल ऑपरेशन्स" अंतर्गत स्पष्ट केलेल्या युनायटेड स्टेट्स आणि अन्य देश किंवा प्रांतांसह, तृतीय देशांमध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर करणे किंवा त्याला प्रसारित करणे किंवा त्यावर प्रक्रिया करणे.
- तुम्हाला एखाद्या अपडेटबद्दल सूचना पाठविणे किंवा जेव्हा तुम्ही आमच्याशी संपर्क साधता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देणे यासारख्या सेवांशी संबंधित समस्यांवर तुमच्याशी संप्रेषण करणे.
- वापरलेल्या डेटा कॅटेगरीज : आम्ही या उद्देश्यासाठी या गोपनीयता धोरणाच्या "तुम्ही प्रदान केलेली माहिती," विभागामध्ये वर्णन केलेली माहिती वापरतो.
यापैकी प्रत्येक उद्दिष्ट आम्ही माहिती कशी वापरतो आणि आमची ग्लोबल ऑपरेशन्स या अंतर्गत अधिक तपशिलवारपणे स्पष्ट केले आहे. आम्ही जीडीपीआर अंतर्गत तुमच्यासह आमचे करारात्मक संबध पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यानुसार आम्हाला तुम्ही प्रदान केलेल्या डेटावर प्रक्रिया करतो तेव्हा, तुमच्याकडे तुमचा डेटा पोर्ट करण्याचा अधिकार असेल. तुमच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, गोपनीयता धोरणाच्या "तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर कसा करता" विभागावर जा.
तुमच्या डेटावर प्रक्रिया करताना आम्ही काही विशिष्ट घटनांमध्ये अवलंबून असतो ते इतर कायदेशीर आधार खाली नमूद केले आहेत:
तुमची संमती
तुम्ही आम्हाला तसे करण्याची संमती देता तेव्हा आम्ही खाली वर्णन केलेल्या उद्देश्यांसाठी डेटावर प्रक्रिया करतो. आम्ही तुमच्या संमतीवर अवलंबून आहोत :
आम्ही तुमच्या डेटावर का आणि कशी प्रक्रिया करतो :
तुम्ही सक्षम केलेल्या डिव्हाइस-आधारित सेटिंग्जद्वारे (जसे की तुमचे स्थान, कॅमेरा किंवा फोटोंमध्ये ॲक्सेस करणे) प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला माहिती संकलित करण्याची आणि वापरण्याची अनुमती देता, तुम्ही सेटिंग्ज सक्षम करता तेव्हा आम्ही वर्णन केलेल्या सेवा प्रदान करू शकू; उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या संपर्कांसह तुमचे स्थान शेअर करण्यासाठी आमचे स्थान फीचर वापरत असल्यास तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान शेअर करणे किंवा तुम्ही तुमच्या संपर्कांसह छायाचित्रे किंवा मीडिया शेअर करणे निवडले असल्यास, तुमच्या कॅमेरा किंवा फोटो गॅलरीमध्ये ॲक्सेस करणे.
- * वापरलेल्या डेटा कॅटेगरीज *: आम्ही या उद्देश्यासाठी डिव्हाइस माहिती (तुमचे स्थान, फोटो आणि मीडिया यासारखा डिव्हाइसवरील डेटा) वापरतो.
आम्ही तुमच्या संमतीवर आधारित डेटावर प्रक्रिया करतो तेव्हा संमती मागे घेण्यापूर्वी अशा संमतीवर आधारित प्रक्रियेच्या कायदेशीरपणावर परिणाम न करता कोणत्याही वेळी तुमची संमती परत घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुमच्याकडे तुम्ही आम्हाला प्रदान केलेला डेटा पोर्ट करण्याचा देखील अधिकार आहे आणि आम्ही तुमच्या संमतीवर आधारित प्रक्रिया करतो. तुमच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइस-आधारित सेटिंग्ज, तुमच्या ॲप-मधील स्थान नियंत्रण यासारख्या ॲप-आधारित सेटिंग्ज आणि या गोपनीयता धोरणाच्या "तुम्ही तुमच्या अधिकारांचा कसा वापर करता" विभागाला भेट द्या.
कायदेशीर कर्तव्यांचे पालन
आम्ही तुमच्या डेटावर का आणि कशी प्रक्रिया करतो :
आम्ही एखाद्या कायदेशीर कर्तव्याचे पालन करतो तेव्हा डेटावर प्रक्रिया करण्यासाठी, उदाहरणार्थ, येथे तुमचे नाव, प्रोफाइल चित्र किंवा आयपी पत्ता यासारख्या एखाद्या विशिष्ट डेटासाठी वैध कायदेशीर विनंती मिळाली असल्यास, जसे की एखाद्या तपासणीसंदर्भात डेटा प्रदान करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश. आम्ही कायदेशीर कर्तव्याच्या अनुशंगाने डेटा उघड करू.
तुमच्या किंवा इतर दुसर्या व्यक्तीच्या महत्त्वपूर्ण हितांचे संरक्षण
आम्ही तुमच्या डेटावर का आणि कशी प्रक्रिया करतो :
तुमच्या किंवा इतर दुसर्या एखाद्या व्यक्तीच्या महत्वाच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी डेटावर प्रक्रिया करणे. आम्ही या प्रक्रियेसाठी ज्या महत्त्वपूर्ण हितांवर अवलंबून आहोत त्यामध्ये तुमचे किंवा इतरांचे जीवन, शारीरिक अखंडता किंवा सुरक्षिततेचे संरक्षण समाविष्ट आहे आणि हानीकारक आचरणाचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही यावर अवलंबून आहोत, उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही हानीकारक आचरणाची तक्रारीचा किंवा कोणाला मदतीची आवश्यकता आहे त्याचा तपास करतो. यामध्ये एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत डेटासह कायद्याची अंमलबजावणी करुन सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्याचा समावेश असू शकतो जिथे अशी विनंती केली जाते आणि एखाद्या व्यक्तीचे जीवन किंवा सुरक्षा संरक्षित करणे आवश्यक असते उदाहरणार्थ, जिथे हल्ला करणे यासारख्या एखाद्या हानिकारक वर्तनाचा धोका असतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असतो.
कायदेशीर हिते
आम्ही आमची कायदेशीर हिते किंवा तृतीय पक्षाची कायदेशीर हितांवर अवलंबुन असतो, जिथे ते तुमची हिते किंवा मुलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य ("कायदेशीर हिते") यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण नसतात :
आम्ही तुमच्या डेटावर का आणि कशी प्रक्रिया करतो :
आम्ही नियंत्रक म्हणून ज्या डेटावर प्रक्रिया करतो त्यासाठी मापन, विश्लेषण आणि इतर बिझनेस सेवा प्रदान करण्यासाठी.
- यावर अवलंबून असलेली कायदेशीर हिते :
- आमचे बिजनेसेस आणि इतर भागीदारांना अचूक आणि विश्वसनीय एकत्रित अहवाल प्रदान करणे, कार्यप्रदर्शनावरील अचूक मूल्ये आणि आकडेवारीची खात्री करणे आणि आमच्या सेवांचा वापर करताना आमच्या भागीदारांना मूल्य निदर्शनास आणून देणे; आणि
- बिझनेसेस आणि इतर भागीदारांच्या हितांमध्ये त्यांच्या ग्राहकांना समजून घेणे आणि त्यांचे बिझनेस सुधारित करण्यात मदत करणे आणि आमचे मूल्यनिर्धारण मॉडेल प्रमाणित करणे आणि त्यांच्या सेवा आणि संदेशांचा प्रभावीपणा आणि वितरणाचे मूल्यांकन करणे आणि आमच्या सेवांवर लोक त्यांच्याशी कसे संवाद साधतात हे समजून घेणे.
- वापरलेल्या डेटा कॅटेगरीज : आम्ही या उद्देश्यांसाठी या गोपनीयता धोरणाच्या "तुम्ही प्रदान केलेली माहिती," "स्वयंचलितपणे संकलित केलेली माहिती" आणि "तृतीय-पक्षाची माहिती विभागांमध्ये वर्णन केलेली माहिती वापरतो.
तुम्हाला विपणन संप्रेषणे प्रदान करणे.
कायद्याची अंमलबजावणी करण्यासह इतरांबरोबर माहिती शेअर करणे आणि कायदेशीर विनंत्यांना प्रतिसाद देणे. अधिक माहितीसाठी कायदा, आमचे अधिकार आणि संरक्षण अंतर्गत आमचे गोपनीयता धोरण पहा.
- यावर अवलंबून असलेली कायदेशीर हिते :
- फसवेगिरी, Facebook कंपनी प्रॉडक्ट्स चा अनधिकृत वापर, आमच्या अटी आणि धोरणांचे उल्लंघन किंवा इतर हानिकारक किंवा बेकायदेशीर क्रियाकलापांना प्रतिबंध करणे आणि त्यावर उपाय करणे.
- अन्वेषण किंवा नियामक चौकशीचा एक भाग यासह, स्वत: चे, आमचे वापरकर्ते किंवा इतरांचे संरक्षण करणे (आमचे अधिकार, मालमत्ता किंवा उत्पादनांसह); किंवा मृत्यू किंवा शारीरिक हानी टाळणे.
- वापरलेल्या डेटा कॅटेगरीज : आम्ही या उद्देश्यासाठी या गोपनीयता धोरणाच्या "तुम्ही प्रदान केलेली माहिती," "स्वयंचलितपणे संकलित केलेली माहिती" आणि "तृतीय-पक्षाची माहिती विभागांमध्ये वर्णन केलेली माहिती वापरतो.
सुरक्षा आणि सुरक्षितता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी Facebook Companies सोबत माहिती शेअर करणे. अधिक माहितीसाठी "आम्ही इतर Facebook Companies सह कसे कार्य करतो" ते पहा.
अशा प्रक्रियेवर आक्षेप घेणे आणि त्यांच्यावर निर्बंध आणण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे; तुमच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, गोपनीयता धोरणाच्या "तुम्ही तुमच्या अधिकारांचा कसा वापर करता" विभागावर जा.
सार्वजनिक हितासाठी केली जाणारी कार्ये
आम्ही तुमच्या डेटावर का आणि कशी प्रक्रिया करतो :
संशोधन करण्याकरिता आणि "आम्ही माहितीचा वापर कसा करतो " विभागांतर्गत अधिक तपशीलवारपणे वर्णन केल्यानुसार सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी, जिथे लागू कायद्याद्वारे (उदा. युरोपियन युनियन कायद्यानुसार) पुढे निर्दिष्ट केल्यानुसार, सार्वजनिक हितासाठी हे आवश्यक आहे.
आम्ही या आधारावर प्रक्रिया करणे हाती घेतल्यावर, आम्ही पारदर्शक, योग्य रितीने कार्य करत आहोत, याची खात्री करण्यासाठी काही पावले उचलू.
आम्ही सार्वजनिक हितासाठी केलेल्या कार्यासाठी आवश्यकता असल्यानुसार तुमच्या डेटावर प्रक्रिया करतो, तेव्हा आमच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा आणि त्यावर निर्बंध आणण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. तुमच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, गोपनीयता धोरणाच्या "तुम्ही तुमच्या अधिकारांचा कसा वापर करता" विभागावर जा.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
तुम्ही तुमच्या अधिकारांचा कसा वापर करता
लागू डेटा संरक्षण कायद्यांतर्गत, तुम्हाला तुमच्या माहितीवर ॲक्सेस करणे, सुधारित करणे, पोर्ट करणे आणि मिटविण्याचा अधिकार आहे, तसेच तुमच्या माहितीवरील विशिष्ट प्रक्रियेला प्रतिबंधित करण्याचा आणि त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार देखील आहे.
यामध्ये थेट विपणनासाठी तुमच्या माहितीवरील आमच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा अधिकार आणि जिथे आम्ही सार्वजनिक हितासाठी कार्य करतो किंवा आमच्या किंवा तृतीय पक्षाच्या कायदेशीर हितांचे अनुसरण करताना तुमच्या माहितीवरील आमच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा अधिकार समाविष्ट आहे. एखाद्या आक्षेपाचे मूल्यांकन करताना आम्ही यासह विविध घटकांचा विचार करू: आमच्या वापरकर्त्यांच्या वाजवी अपेक्षा; तुमच्यासाठी, आमच्यासाठी, अन्य वापरर्त्यांसाठी किंवा तृतीय पक्षांसाठी असलेले लाभ आणि जोखमी; आणि कमी आक्रमक असलेले आणि प्रमाणात नसलेल्या प्रयत्नाची आवश्यकता नसलेले समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्य उपलब्ध असलेली साधने. तुमचा आक्षेप कायम ठेवला जाईल आणि जोपर्यंत प्रक्रिया सक्तीच्या कायदेशीर कारणास्तव आधारित नसेल किंवा कायदेशीर कारणांसाठी आवश्यक नसेल तोपर्यंत आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया करणे थांबवू.
तुम्ही आमच्या माहितीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊ शकता आणि आम्ही तुमची माहिती वापरण्याचे मार्ग मर्यादित करण्यासाठी तुमच्या पर्यायांबद्दल येथे जाऊन अधिक जाणून घेऊ शकता. जिथे आम्ही तुमची माहिती थेट विपणनासाठी वापरतो, तुम्ही अशा संप्रेषणांमधील सदस्यता रद्द करण्याची लिंक वापरून किंवा आमच्या ॲप-मधील "ब्लॉक" फीचर वापरुन तुम्ही नेहमीच फीचर मार्केटींग संदेशावर आक्षेप घेऊ शकता आणि निवड रद्द करू शकता.
आमची इन-अॅप खाते माहिती साठी विनंती करा फीचर (सेटिंग्ज > खाते अंतर्गत उपलब्ध) वापरून तुम्ही तुमची माहितीवर अॅक्सेस किंवा पोर्ट करू शकता. "तुमची माहिती व्यवस्थापित करणे आणि ती राखून ठेवणे" विभागामध्ये वर्णन केल्यानुसार अॅपमधील तुमची माहिती सुधारित, अपडेट आणि पुसून टाकण्यासाठी तुम्ही साधनांमध्ये ॲक्सेस करू शकता.
आम्ही तुमच्या संमतीवर आधारित तुम्ही आम्हाला प्रदान केलेल्या डेटावर प्रक्रिया करतो, तेव्हा तुम्ही ती मागे घेण्यापूर्वी संमतीवर आधारित प्रक्रियेच्या कायदेशीरपणावर परिणाम न करता कोणत्याही वेळी तुमची संमती मागे घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुमची संमती मागे घेण्यासाठी, तुमच्या डिव्हाइस-आधारित किंवा अॅप-मधील सेटिंग्जला भेट द्या.
तुमच्याकडे WhatsApp च्या मुख्य पर्यवेक्षी प्राधिकरण, आयरिश डेटा संरक्षण आयोग किंवा इतर कोणत्याही सक्षम डेटा संरक्षण पर्यवेक्षी प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
तुमची माहिती व्यवस्थापित करणे आणि राखून ठेवणे
आम्ही या गोपनीयता धोरणात ओळखल्या गेलेल्या उद्देश्यांसाठी आवश्यक माहिती संग्रहित करतो, ज्यामध्ये आमच्या सेवा प्रदान करणे किंवा कायदेशीर उद्दिष्टांचे पालन करणे, आमच्या अटींचे उल्लंघन करणे, अंमलबजावणी करणे आणि प्रतिबंधित करणे किंवा आमच्या अधिकारांचे संरक्षण करणे किंवा संरक्षण देणे, मालमत्ता आणि वापरकर्ते यासारख्या इतर कायदेशीर कर्तव्यांचा समावेश आहे. माहितीचे स्वरूप, ती का संकलित केली आणि त्यावर प्रक्रिया केली, संबधित कायदेशीर किंवा ऑपरेशनल धारणा आवश्यकता आणि कायदेशीर कर्तव्य यासारख्या घटकांवर आधारीत संग्रहण कालावधी केस-बाय-केस आधारावर निश्चित केले जातात.
कायदेशीर कर्तव्ये आणि समस्या. उदाहरणार्थ, आम्ही तुमची माहिती कायदेशीर कारणास्तव राखून ठेवतो जसे की आमच्याकडे डेटा राखून ठेवणे, अंमलबजावणी करणे आणि आमच्या अटींचे उल्लंघन करण्याला प्रतिबंध करणे किंवा आवश्यक असल्यास अधिकार, मालमत्ता आणि वापरकर्त्यांचे संरक्षण करण्याची कायदेशीर कर्तव्ये आहेत. आमचा "कायदा, आमचे अधिकार आणि संरक्षण" विभाग यावरील अधिक माहिती प्रदान करतो.
कार्यात्मक धारणेच्या आवश्यकता. उदाहरणार्थ, आमच्या सेवा प्रदान करताना आम्ही तुमचे संदेश राखून ठेवत नाही (वर सेट केलेल्या मर्यादित परिस्थितीशिवाय), आणि म्हणून एकदा तुमचे संदेश पोहचवले गेल्यावर ते आमच्या सर्व्हरवरून हटविले जातात. संदेश त्वरित पोहोचवले जाऊ शकत नसल्यास, आम्ही त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्याला आमच्या सर्व्हरवर 30 दिवसांपर्यंत कूटबद्ध स्वरूपात राखून ठेवतो, त्यानंतर ते हटविले जातात.
मेसेजिंग मेटाडेटा हटविणे. संप्रेषण प्रसारित करणे, आमच्या सेवा ऑपरेट करणे, आमच्या सेवांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, बिलिंगसाठी (लागू असल्यानुसार), किंवा लागू कायद्यांतर्गत कायदेशीर कर्तव्ये पाळण्यासाठी आवश्यक नसते तेव्हा मेसेजिंग मेटाडेटा हटविला जाईल किंवा अज्ञात ठेवला जाईल.
पुढे तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थापित करायची असल्यास, बदलायची असल्यास किंवा हटवायची असल्यास तुम्ही पुढील साधनांनी तसे करू शकता :
- सेवा सेटिंग्ज. इतर वापरकर्त्यांना उपलब्ध असलेली विशिष्ट माहिती व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या सेवा सेटिंग्ज बदलू शकतात. तुम्ही तुमचे संपर्क, ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट व्यवस्थापित करू शकता किंवा तुम्ही आमच्या सेवेवर ज्यांच्याशी संवाद साधता त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी आमचे “ब्लॉक करा” फीचर वापरा.
- तुमचा मोबाईल फोन नंबर, प्रोफाइल नाव आणि फोटो आणि ''माझ्याबद्दल'' माहिती बदलणे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलला असल्यास, तुम्ही तो आमच्या अॅप-मधील नंबर बदला फीचर वापरून अपडेट करणे आणि तुमचे खाते तुमच्या नवीन मोबाईल फोन नंबरवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे प्रोफाईल नाव, प्रोफाइल फोटो आणि "माझ्याबद्दल" माहिती देखील कधीही बदलू शकता.
- तुमचे WhatsApp खाते हटवणे. तुम्ही आमच्या ॲप-मधील माझे खाते हटवा फीचर वापरून तुमचे WhatsApp खाते कधीही हटवू शकता. तुम्ही तुमच्या खात्याची हटविण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर ते खाते पुढे वापरले जाऊ शकत नाही (म्हणजे तुम्ही लॉग इन करू शकत नाहीत किंवा पुन्हा नोंदणी करू शकत नाही).
तुम्ही तुमचे खाते हटविता तेव्हा तुमच्या माहितीचे काय होते?
तुम्ही तुमचे WhatsApp खाते हटविता, तेव्हा आम्ही आमच्याकडे तुमच्याबद्दल असलेली माहिती हटवितो, काही मर्यादित परिस्थितीमध्येच खालील सूचीबद्ध केलेल्या माहितीव्यतीरिक्त काही माहिती आम्ही राखून ठेवतो.
हटवलेली माहिती. तुमचे न पोहोचलेले संदेश, तुमची खाते माहिती आणि प्रोफाइल फोटो आमच्या सर्व्हर्सवरुन हटविले गेले आहेत. तुम्हाला सर्व WhatsApp ग्रुपमधून काढले जाईल. हे लक्षात ठेवा की तुमची WhatsApp ची माहिती हटविण्यासाठी, हटविण्याची प्रक्रिया सुरू केल्यापासून 90 दिवसांचा कालावधी लागतो. तुमच्या माहितीच्या प्रती 90 दिवसांनंतरही बॅकअप स्टोरेजमध्ये मर्यादित काळासाठी राहू शकतात ज्या आम्ही आपत्तीच्या घटनेत, सॉफ्टवेअर त्रुटी किंवा इतर डेटा नष्ट होण्याच्या घटनेत गमावलेला डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी आम्ही वापरतो.
आम्ही राखून ठेवलेली माहिती
- काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, आमच्या सेवांची सुरक्षितता राखण्यासाठी, एखाद्या सुरक्षा घटनेची किंवा असुरक्षिततेचे विश्लेषण/ तपासणी करण्यासाठी आम्हाला मागील सामान्य धाराणा कालावधीचे पुनरावलोकन करत आहोत असे काही विशिष्ट लॉग राखून ठेवणे आवश्यक आहे.
- आमच्या डेटाबेसमध्ये विशिष्ट लॉग रेकॉर्ड यांसारख्या काही सामग्रीच्या प्रती तशाच ठेवल्या जातात परंतु त्या वैयक्तिक अभिज्ञापकांकडून वेगळ्या केल्या जातात आणि तुमच्या खात्यावर यापुढे लिंक केल्या जाणार नाहीत. हा डेटा तुमच्या खात्यामधून काढून टाकण्यासाठी, आम्ही वापरकर्ता अभिज्ञापक यादृच्छिकपणे व्युत्पन्न केलेल्या पुनर्स्थापनेसह बदलतो जेणेकरून तो तुमच्या खात्याशी पुन्हा लिंक केला जाऊ शकणार नाही.
- विशिष्ट माहितीच्या काही प्रतीदेखील राखून ठेवल्या जाऊ शकतात जसे की आमच्याकडे डेटा राखून ठेवणे, अंमलबजावणी करणे आणि आमच्या अटींचे उल्लंघन करण्याला प्रतिबंध करणे किंवा आवश्यक असल्यास अधिकार, मालमत्ता आणि वापरकर्त्यांचे संरक्षण करण्याची कायदेशीर कर्तव्ये असतात. आमचा "कायदा, आमचे अधिकार आणि संरक्षण" विभाग यावरील अधिक माहिती प्रदान करतो.
लक्षात असू द्या तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून आमच्या अॅप-मधील माझे खाते हटवा फीचर न वापरता WhatsApp ॲप केवळ हटवल्यास, तुमची माहिती प्रदीर्घ कालावधीसाठी आमच्याकडे संग्रहित केली जाईल. कृपया लक्ष्यात घ्या की जेव्हा तुम्ही तुमचे खाते हटवता तेव्हा तुम्ही तयार केलेल्या ग्रुपशी संबंधित तुमची कोणतीही माहिती किंवा तुमच्याशी संबंधित इतर वापरकर्त्यांकडे असलेली माहिती जसे की तुम्ही त्यांना पाठवलेल्या संदेशांच्या प्रती प्रभावित होत नाही.
तुम्ही आमच्या डेटा हटविणे आणि धारणा पद्धतींबद्दल आणि आमच्या Android, iPhone, किंवा KaiOS मदत केंद्र लेखामधे तुमचे खाते कसे हटवायचे याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
कायदा, आमचे अधिकार आणि संरक्षण
खालील गोष्टी करण्यासाठी हे गरजेचे आहे असा आम्हाला विश्वास असतो तेव्हा आम्ही नियामक, कायद्याची अंमलबजावणी, इतर सरकारी संस्था, उद्योग भागीदार आणि इतरांसह "डेटा प्रक्रियेसाठी असलेला आमचा कायदेशीर आधार" विभागानुसार शेअर करण्यासह "आम्ही संकलित केलेली माहिती" विभागामध्ये वर्णन केलेली तुमची माहिती ॲक्सेस करतो, जतन करतो आणि शेअर करतो, : (a) लागू कायदा किंवा नियमन, कायदेशीर प्रक्रिया किंवा सरकारच्या विनंत्यांनुसार प्रतिसाद देणे; (b) संभाव्य उल्लंघनाच्या तपासासह आमच्या अटी आणि इतर लागू अटी आणि धोरणांची अंमलबजावणी करणे (c) फसवणूक आणि इतर बेकायदेशीर क्रियाकलाप किंवा सुरक्षितता आणि तांत्रिक समस्या शोधणे, त्याची तपासणी करणे, त्यावर प्रतिबंध लावणे; किंवा (d) मृत्यू किंवा निकटची शारीरिक हानी टाळण्यासाठी WhatsApp, Facebook Companies किंवा इतर वापरकर्त्यांचे अधिकार, मालमत्ता आणि सुरक्षिततेला संरक्षित करणे.
परिस्थितीनुसार आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही ज्या वेगवेगळ्या कायदेशीर आधारांवर अवलंबून आहोत त्याबद्दल अधिक माहिती " प्रक्रियेमध्ये असलेल्या डेटासाठी आमचे कायदेशीर आधार" विभागात दिली आहे, त्यामध्ये ही माहिती "अटींनुसार सेवांच्या तरतूदी", "कायदेशीर हिते" आणि "महत्वपूर्ण हिते" शीर्षकांतर्गत समाविष्ट आहे.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
आमची ग्लोबल ऑपरेशन्स
WhatsApp, अंतर्गतपणे Facebook Companies सह आणि बाह्यदृष्ट्या आमचे भागीदार आणि सेवा प्रदात्यांसह आणि या गोपनीयता धोरण आणि अटींनुसार जगभरात तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधता त्यांच्यासोबत जागतिक स्वरूपात माहिती शेअर करते.
WhatsApp द्वारे नियंत्रित माहिती, या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केलेल्या उद्देश्यांसाठी युनायटेड स्टेट्स किंवा तुम्ही जिथे राहता त्या बाहेरील तृतीय देशांसह ट्रान्सफर किंवा प्रसारित किंवा संग्रहित केली जाऊ शकते आणि तिच्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. WhatsApp युनायटेड स्टेट्ससहित, सर्व ठिकाणी Facebook च्या जागतिक पायाभूत सुविधा आणि डेटा केंद्रांचा वापर करते.
आमच्या अटी मध्ये सेट केलेल्या सर्व्हिसेस तुम्हाला आणि जागतिक पातळीवर प्रदान करण्यासाठी व त्या संचालित करण्यासाठी आम्हाला सक्षम करण्याकरता या ट्रान्सफर्स आवश्यक आणि महत्त्वाच्या आहेत. तृतीय देशांतील ट्रान्सफर्ससाठी, आम्ही युरोपियन कमिशनने मंजूर केलेल्या मानक करारात्मक कलमाचा उपयोग करतो (ते काय आहेत याचे स्पष्टीकरण येथे पहा), किंवा युरोपियन कमिशनच्या पर्याप्त निर्णय यावर अवलंबून रहा, जेथे युरोपियन कमिशन ओळखते की ते तृतीय देश, प्रदेश किंवा त्या तृतीय देशातील एक किंवा अधिक निर्दिष्ट केलेली क्षेत्रे संरक्षणाची पुरेशी पातळी सुनिश्चित करतात किंवा लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यानुसार प्रदान केलेल्या समतुल्य यंत्रणेचा वापर करतात. युरोपियन इकॉनॉमिक एरियापासून अमेरिकेत डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आम्ही प्रमाणित करारात्मक कलमांवर अवलंबून आहोत.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
आमच्या गोपनीयतेमधील अपडेट
आम्ही आमच्या गोपनीयता धोरणात सुधारणा किंवा अपडेट करू शकतो. आम्ही तुम्हाला या गोपनीयता धोरणात केलेल्या योग्य त्या सुधारणांची सूचना देऊ आणि या गोपनीयता धोरणाच्या शीर्षस्थानी असलेली ''अंतिम सुधारित'' तारीख अपडेट करू. कृपया वेळोवेळी आमच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करा.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
आमच्याशी संपर्क साधा
WhatsApp च्या डेटा संरक्षण अधिकार्याशी येथे संपर्क साधता येईल.
आमच्या गोपनीयता धोरणाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास कृपया आम्हाला संपर्क करा किंवा आम्हाला येथे लिहा.
WhatsApp आयर्लंड लिमिटेड
जोडले : गोपनीयता धोरण
४ ग्रँड कॅनल स्क्वेअर
ग्रँड कॅनल हार्बर
डब्लिन २
आयर्लंड
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा