WhatsApp कायदेशीर माहिती
तुम्ही युरोपियन प्रांत किंवा युके बाहेर राहत असल्यास, WhatsApp LLC ("WhatsApp," "आमचे," "आम्ही," किंवा "आम्हाला") तुम्हाला या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण अंतर्गत आमच्या सर्व्हिस प्रदान करते.
आमचे गोपनीयता धोरण ("गोपनीयता धोरण") आमच्या सर्व्हिस प्रदान करण्यासाठी आम्ही प्रक्रिया करतो त्या माहितीसह आमच्या डेटा पद्धतींचे स्पष्टीकरण देण्यात मदत करते.
उदाहरणार्थ, आमच्या गोपनीयता धोरणामध्ये आम्ही कोणती माहिती संकलित करतो आणि त्याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो याबद्दल सांगितले जाते. तसेच हे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही घेतो त्या स्टेपचे स्पष्टीकरण देते, जसे की आमच्या सर्व्हिस तयार करणे त्यामुळे पोहचवलेले मेसेज आम्ही संचयित करत नाहीत आणि आमच्या सर्व्हिसवर तुम्ही कोणासोबत संभाषण करता याचे नियंत्रण तुम्हाला देते.
आम्ही Meta कंपन्यांपैकी एक आहोत. आम्ही कंपन्यांच्या या ग्रुपवर माहिती कशा प्रकारे शेअर करतो याबद्दल तुम्ही खाली या गोपनीयता धोरणामध्ये अधिक जाणून घेऊ शकता.
निर्दिष्ट केले जात नाही तोपर्यंत हे गोपनीयता धोरण आमच्या सर्व सेवांकरता लागू होते.
कृपया WhatsApp च्या सेवाशर्ती ("अटी") देखील वाचा, ज्यामध्ये तुम्ही ज्या अटींच्या अंतर्गत आमच्या सेवा वापरता आणि आम्ही त्या सेवा प्रदान करतो अशा अटींचे वर्णन केले आहे.
पेजच्या शीर्षस्थानी जा
मुख्य अपडेट्स
तुमच्या गोपनीयतेचा आदर करणे आमच्यामध्ये उपजत आहे. आम्ही WhatsApp ची सूरूवात केल्यापासून, आमच्या सर्व्हिस या कणखर गोपनीयता तत्त्वे लक्षात घेऊनच तयार केल्या आहेत. आमच्या अपडेट केलेल्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणामंध्ये तुम्हाला पुढील गोष्टी आढळतील:
- आम्ही तुमचा डेटा कसा हाताळतो यावरील अतिरिक्त माहिती. आमच्या अपडेट केलेल्या अटी आणि गोपनीयता धोरण आम्ही तुमच्या डेटावर कशी प्रक्रिया करतो आणि गोपनीयतेशी आमची कटिबद्धता यावरील अधिक माहिती प्रदान करतात. उदाहरहणार्थ आम्ही अगदी अलीकडील प्रॉडक्ट फीचरबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल, तसेच सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडतेसाठी आम्ही तुमच्या डेटावर कशी प्रक्रिया करतो याबाबत अधिक माहिती दिली आहे आणि वापरकर्ता सेटिंग्ज, मदत केंद्र लेख आणि तुम्ही तुमची माहिती कशी व्यवस्थापित करू शकता याबद्दलच्या थेट लिंक्स दिल्या आहेत.
- बिझनेसेससह अधिक चांगले संभाषण. पुष्कळ बिझनेसेस त्यांच्या ग्राहक आणि क्लायंटसह संभाषण करण्यासाठी WhatsApp वर अवलंबून आहेत. आम्ही अशा बिझनेससोबत कार्य करतो जे तुमच्यासोबत त्यांचे संभाषण WhatsApp वर चांगल्या प्रकारे संचयित करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी Meta किंवा तृतीय पक्षांचा वापर करतात.
- कनेक्ट करणे सोपे करणे. Meta कंपन्यांचा चा एक भाग म्हणून, WhatsApp ने Meta सह Meta च्या ॲप आणि प्रॉडक्टच्या फॅमिलीवर अनुभव आणि एकीकरणे ऑफर करण्यासाठी भागीदारी केली आहे.
पेजच्या शीर्षस्थानी जा
आम्ही संकलित करतो ती माहिती
तुम्ही जेव्हा आमच्या सेवा इंस्टॉल करता, ॲक्सेस करता किंवा वापरता तेव्हा, आमच्या सर्व्हिस ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारित करणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, समर्थन देणे आणि विपणन करण्यासाठी WhatsApp ला काही माहिती प्राप्त करणे किंवा संकलित करणे आवश्यक आहे.
आम्ही प्राप्त आणि संकलित करतो अशा प्रकारची माहिती तुम्ही आमच्या सेवा कशा वापरता यावर अवलंबून असते. आमच्या सेवा डिलिव्हर करण्यासाठी आम्हाला विशिष्ट माहितीची आवश्यकता आहे आणि त्याशिवाय आम्ही तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करू शकणार नाही. उदाहरणार्थ, आमच्या सेवा वापरण्यासाठी एक खाते तयार करण्याकरता तुम्ही तुमचा मोबाईल फोन नंबर देणे आवश्यक आहे.
आमच्या सेवांना तुम्ही वापरत असल्यास पर्यायी फीचर्स आहेत, तशी फीचर्स प्रदान करण्यासाठी आम्हाला अतिरिक्त माहिती संकालित करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला योग्य अशा संकलनांबद्दल सूचित केले जाईल. तुम्ही एखादे फीचर वापरण्यासाठी आवश्यक माहिती प्रदान न करणे निवडले असल्यास, तुम्ही हे फीचर वापण्यासाठी असमर्थ असाल. उदाहरणार्थ, तुम्ही आम्हाला तुमच्या डिव्हाइसवरून तुमचा लोकेशन डेटा संकलित करण्याची परवानगी देत नसल्यास, तुम्ही तुमच्या संपर्कासह तुमचे लोकेशन शेअर करू शकत नाही. परवानग्या दोन्ही Android आणि iOS डिव्हाइसवरून तुमच्या सेटिंग्ज मेनूद्वारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात.
तुम्ही प्रदान केलेली माहिती
- तुमच्या खात्याची माहिती. WhatsApp खाते तयार करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल फोन नंबर आणि मूलभूत माहिती (तुमच्या आवडीच्या प्रोफाइल नावासह) प्रदान करणे आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला ही माहिती प्रदान न केल्यास, तुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी एखादे खाते तयार करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या खात्यावर इतर माहिती जोडू शकता जसे की प्रोफाइल फोटो आणि "याबद्दल" माहिती.
- तुमचे संदेश. आम्ही तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्याच्या सामान्य कालावधीमध्ये तुमचे संदेश राखून ठेवत नाही. त्याऐवजी, तुमचे संदेश तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केले जातात आणि सामान्यत: आमच्या सर्व्हरवर संग्रहित केले जात नाहीत. एकदा तुमचे संदेश पोहोचल्यावर, ते आमच्या सर्व्हर्सवरून हटविले जातात. खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये आम्ही अशा स्थितींचे वर्णन करतो की आम्ही त्यांना पोहोचवण्याच्या कालावधीत तुमचे मेसेजेस संग्रहित करू शकतो:
- न पोहोचलेले मेसेजेस. मेसेज त्वरित पोहोचवला जाऊ शकत नसल्यास, (उदाहरणार्थ, प्राप्तकर्ता ऑफलाइन असल्यास), आम्ही तो पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही तो आमच्या सर्व्हरवर एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात 30 दिवसांपर्यंत राखून ठेवतो. 30 दिवसानंतरही मेसेज पोहोचला नसल्यास, आम्ही तो हटवतो.
- मीडिया फॉरवर्ड करणे. वापरकर्ता मेसेजमध्ये मीडिया फॉरवर्ड करतो तेव्हा, आम्ही अतिरिक्त फॉरवर्डच्या अधिक कार्यक्षम पोहोचवण्याला मदत करण्यासाठी आमच्या सर्व्हरवर त्या मीडियाला तात्पुरते एन्क्रिप्शनने सुरक्षित स्वरूपात स्टोअर करतो.
आम्ही आमच्या सर्व्हिससाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन ऑफर करतो. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे तुमचे मेसेजेस आमच्यापासून आणि तृतीय पक्षाकडून वाचले जाण्यापासून संरक्षित करण्यासाठी त्यांना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जाते. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि WhatsApp वर बिझनेसेस तुमच्याशी कसा संवाद साधतात याबद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमचे कनेक्शन्स. आमच्या सेवांचे वापरकर्ते आणि तुमच्या इतर संपर्कांसह, नियमितपणे तुमच्या ॲड्रेस बुकमधील फोन नंबर्ससह लागू असलेल्या कायद्यांद्वारे परवानगी दिली असल्यास, तुम्ही संपर्क अपलोड फीचर वापरू शकता आणि आम्हाला ते प्रदान करू शकता. तुमचे कोणतेही संपर्क अद्याप आमच्या सेवा वापरत नसल्यास, आम्ही तुमच्यासाठी ही माहिती अशा प्रकारे व्यवस्थापित करू की ते संपर्क आमच्याद्वारे ओळखले जाऊ शकणार नाहीत. येथे आमच्या संपर्क अपलोड फीचरबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करू शकता, सामील होऊ शकता किंवा जोडले जाऊ शकता आणि असे ग्रुप आणि याद्यांचा तुमच्या खाते माहितीशी संबद्ध असू शकतो. तुम्ही तुमच्या ग्रुपला एक नाव देता. तुम्ही ग्रुप प्रोफाइल फोटो किंवा वर्णन प्रदान करू शकता.
- स्टेटस माहिती. तुम्ही तुमच्या खात्यावर एखादे स्टेटस समाविष्ट करणे निवडल्यास, तुम्ही आम्हाला ते देऊ शकता. Android, iPhone, किंवा KaiOS वर स्टेटस कसे वापरायचे याबद्दल जाणून घ्या.
- व्यवहार आणि पेमेंट्स डेटा. तुम्ही आमची पेमेंट्स सेवा वापरल्यास किंवा खरेदी किंवा इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली असल्यास, आम्ही पेमेंट खाते आणि व्यवहाराच्या माहितीसह, तुमच्याबद्दलच्या अतिरिक्त माहितीवर प्रक्रिया करतो. व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीच्या समावेशासह पेमेंट खाते आणि व्यवहाराची माहिती (उदाहरणार्थ, तुमच्या पेमेंट पद्धतीबद्दलची माहिती, शिपिंगचे तपशील आणि व्यवहाराची रक्कम) तुम्ही तुमच्या देश किंवा प्रदेशामध्ये उपलब्ध असलेल्या आमच्या पेमेंट सेवांचा वापर केलेला असल्यास, आमच्या गोपनीयता पद्धती लागू पेमेंट्स गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केल्या आहेत.
- कस्टमर सपोर्ट आणि इतर संभाषणे. तुम्ही कस्टमर सपोर्टच्या संदर्भात आमच्याशी संपर्क साधता किंवा अन्य कारणाने आमच्याशी संभाषण करता तेव्हा, तुमच्या मेसेजच्या प्रती, तुम्हाला उपयुक्त वाटणारी अन्य कोणतीही माहिती आणि तुमच्याशी कसा संपर्क साधावा यासह आमच्या सर्व्हिसच्या तुमच्या वापरासंबंधित माहिती तुम्ही आम्हाला प्रदान करता. (उदा: ईमेल ॲड्रेस). उदाहरणार्थ, तुम्ही आमच्या ॲपची कामगिरी किंवा अन्य समस्यांशी संबंधित असलेल्या माहितीसह आम्हाला ईमेल पाठवू शकता.
स्वयंचलितपणे संकलित केलेली माहिती
- वापर आणि लॉग माहिती. आम्ही आमच्या सेवांवरील सेवेशी-संबंधित, निदान आणि कार्यप्रदर्शन माहिती यासारखी तुमच्या कृतींविषयीची माहिती संकलित करतो. यामध्ये तुमच्या लॉग फाइल्स आणि निदान, क्रॅश, यामध्ये तुमच्या लॉग फायली आणि निदान, क्रॅश, वेबसाईट आणि कार्यप्रदर्शन लॉग आणि अहवाल (तुम्ही आमच्या सेवा कशा वापराल, तुमच्या सेवा सेटिंग्ज, तुम्ही आमच्या सेवांचा वापर करुन इतरांशी कसा संवाद साधता यासह (तुम्ही एखाद्या व्यवसायाशी संवाद साधता त्याच्या समावेशासह) आणि तुमच्या कृतींची आणि संवादाची वेळ, वारंवारता आणि कालावधी यांसह) यासारख्या कृतीविषयी माहिती समाविष्ट आहे. यामध्ये तुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी कधी नोंदणी केली; आमचे मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस, ग्रुप्स (ग्रुपचे नाव, ग्रुप फोटो, ग्रुपविषयी माहिती), पेमेंट्स किंवा व्यवसाय फीचर्स यासारखे तुम्ही वापरत असलेले फीचर्स; प्रोफाईल फोटो; "माझ्याबद्दल" माहिती; तुम्ही ऑनलाईन आहात किंवा नाही; तुम्ही आमची सेवा अंतिम वेळी केव्हा वापरली (तुमचे "अखेरचे पाहिलेले"); आणि तुम्ही "माझ्याबद्दल" ची माहिती अखेरची केव्हा अपडेट केली याबद्दलची माहिती देखील समाविष्ट असते.
- डिव्हाइस आणि कनेक्शन माहिती. तुम्ही आमच्या सर्व्हिस इंस्टॉल करता, ॲक्सेस करता किंवा वापरता तेव्हा, आम्ही डिव्हाइस आणि कनेक्शनची-विशिष्ट माहिती संकलित करतो. यामध्ये हार्डवेअर मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टमची माहिती, बॅटरी पातळी, सिग्नल सामर्थ्य, ॲपची आवृत्ती, ब्राउझर माहिती, मोबाइल नेटवर्क, (फोन नंबर, मोबाइल ऑपरेटर किंवा आयएसपीसह) कनेक्शन माहिती, भाषा आणि वेळ क्षेत्र, आयपी पत्ता, डिव्हाइस ऑपरेशन माहिती, आणि अभिज्ञापक (समान डिव्हाइस किंवा खात्याशी संबंधित असलेल्या Meta कंपनी प्रॉडक्ट च्या युनिक अभिज्ञापकांसह) अभिज्ञापक यांचा समावेश असतो.
- लोकेशन माहिती. तुम्ही लोकेशन संबंधित फीचर्स वापरणे निवडता तेव्हा, जसे की तुम्ही तुमच्या संपर्कांना तुमचे स्थान शेअर करण्याचा निर्णय घेता किंवा जवळपासचे लोकेशन्स किंवा इतरांनी तुमच्यासबत शेअर केलेले लोकेशन पाहता तेव्हा, आम्ही तुमच्या परवानगीने तुमच्या डिव्हाइसवरून अचूक लोकेशन माहिती संकलित करतो आणि वापरतो. स्थान शेअर करणे यासारख्या स्थान-संबंधित माहितीशी संबंधित असलेल्या काही सेटिंग्ज येथे आहेत, ज्या तुम्ही तुमच्या डिव्हाइस सेटिंग्ज किंवा इन-अॅप सेटिंग्जमध्ये शोधू शकता. तुम्ही आमचे लोकेशन-संबंधित फीचर वापरले नाही तरीदेखील, तुमच्या सामान्य लोकेशन (उदा. शहर आणि देश) चा अंदाज लावण्यासाठी आम्ही IP पत्ता आणि इतर माहिती वापरतो जसे की फोन नंबर क्षेत्र कोड. आम्ही तुमची लोकेशन माहिती निदान आणि समस्यानिवारणाच्या उद्देश्यांसाठी देखील वापरतो.
- कुकीज. वेब-आधारित आमच्या सेवा प्रदान करणे, तुमचे अनुभव सुधारित करणे, आमच्या सेवा कशा वापरल्या जात आहेत हे समजून घेणे आणि त्या सानुकूलित करणे यांच्या समावेशासह, आम्ही आमच्या सेवा संचालित आणि प्रदान करण्यासाठी कुकीजचा वापर करतो. उदाहरणार्थ, वेब आणि डेस्कटॉप तसेच इतर वेब-आधारित सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आमच्या मदत केंद्र लेखांमधील कोणते लेख सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत हे समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार आमच्या सेवांशी निगडित संबंधित माहिती तुम्हाला दाखविण्यासाठी देखील आम्ही कुकीज वापरू शकतो. त्याव्यतिरिक्त, आम्ही तुमची भाषा प्राधान्ये यासारख्या तुमच्या निवडी लक्षात ठेवण्यासाठी, सुरक्षित अनुभव प्रदान करण्यासाठी आणि अन्यथा तुमच्यासाठी आमच्या सेवा सानुकूलित करण्यासाठी देखील कुकीज वापरू शकतो. आमच्या सेवा वापरण्यासाठी आम्ही कुकीज कशा वापरतो याबद्दल अधिक जाणून घ्या.
पेजच्या शीर्षस्थानी जा
तृतीय पक्ष माहिती
- तुमच्याबद्दल इतरांनी प्रदान केलेली माहिती. आम्ही इतर वापरकर्त्यांकडून तुमच्याबद्दल माहिती प्राप्त करतो. उदाहरणार्थ, तुम्ही ओळखत असलेले इतर वापरकर्ते आमच्या सेवा वापरतात तेव्हा ते तुमचा फोन नंबर, नाव आणि इतर माहिती (जसे की त्यांच्या मोबाइल ॲड्रेस बुकवरील माहिती) यासारखी माहिती जशी तुम्ही त्यांना प्रदान केली असेल त्याप्रमाणे आम्हाला प्रदान करतात. ते तुम्हाला मेसेज देखील पाठवू शकतात, तुमच्याशी संबधित असलेल्या ग्रुप्सवर मेसेज पाठवू शकतात किंवा तुम्हाला कॉल करू शकतात. या वापरकर्त्यांपैकी प्रत्येकाकडे आम्हाला कोणतीही माहिती देण्यापूर्वी तुमची माहिती संकलित करण्याचे, वापरण्याचे आणि शेअर करण्याचे कायदेशीर अधिकार असणे आमच्यासाठी गरजेचे आहे.
तुम्ही हे लक्षात ठेवावे की सर्वसाधारणपणे कोणताही वापरकर्ता तुमच्या चॅट किंवा मेसेजचे स्क्रीनशॉट कॅप्चर करू शकतो किंवा त्यांच्यासोबत तुमच्या कॉलचे रेकॉर्डिंग करू शकतो आणि ते WhatsApp किंवा इतर कोणालाही पाठवू शकतो किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करू शकतो.
- वापरकर्ता रिपोर्ट. ज्याप्रमाणे तुम्ही इतर वापरकर्त्यांची तक्रार नोंदवू शकता, त्याचप्रमाणे इतर वापरकर्ते किंवा तृतीय पक्ष देखील त्याच्यासह किंवा आमच्या सेवांवरील इतरांसह तुमच्या परस्पर संवादांबद्दल आणि तुमच्या संदेशाबद्दल आमच्याकडे तक्रार नोंदवणे निवडू शकतात; उदाहरणार्थ, आमच्या अटी किंवा धोरणांच्या संभाव्य उल्लंघनाची तक्रार नोंदवणे. जेव्हा तक्रार नोंदवली जाते, तेव्हा आम्ही तक्रार नोदवणारा वापरकर्ता आणि तक्रार नोंदवलेल्या वापरकर्ता दोघांची माहिती संकलित करतो. वापरकर्ता तक्रार नोंदवतो तेव्हा काय घडते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया प्रगत सुरक्षा आणि सुरक्षा फीचर्स पहा.
- WhatsApp वरील बिझनेस. आमच्या सर्व्हिस वापरुन तुम्ही ज्या बिझनेसेसशी परस्पर संवाद साधता ते आम्हाला तुम्ही त्यांच्याशी केलेल्या परस्परसंवादाविषयी माहिती प्रदान करू शकतात. आम्हाला कोणतीही माहिती प्रदान करताना यापैकी प्रत्येक बिझनेसने लागू कायद्यानुसार कार्य करणे आमच्यासाठी आवश्यक आहे.
तुम्ही WhatsApp वर एखाद्या बिझनेसला मेसेज करता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही शेअर केलेला कंटेन्ट त्या बिझनेसमधील अनेक लोकांना दिसत असेल. याव्यतिरिक्त, काही बिझनेस तृतीय-पक्ष सर्व्हिस प्रोवायडरसह (ज्यात Meta समाविष्ट असू शकते) त्यांच्या ग्राहकांशी त्यांचे संभाषण व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी कार्य करत असतील. उदाहरणार्थ, एखादा बिझनेस अशा तृतीय-पक्षाच्या सर्व्हिस प्रोवाइडरला त्याच्या बिझनेसकरिता पाठविण्यासाठी, संचयित करण्यासाठी, वाचण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याच्या संभाषणाचा ॲक्सेस देऊ शकतो. बिझनेस तुमची माहिती तृतीय-पक्ष किंवा Meta सोबत कशी शेअर करू शकतो यासहित तुमच्या माहितीवर कशी प्रक्रिया करायची हे समजण्यासाठी तुम्ही त्या बिझनेसच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन केले पाहिजे किंवा थेट बिझनेसशी संपर्क केला पाहिजे.
- तृतीय-पक्ष सर्व्हिस प्रोव्हायडर. आम्ही आमच्या सर्व्हिस ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, समर्थन करणे आणि त्यांचे विपणन करण्यात मदत करण्यासाठी तृतीय-पक्ष सर्व्हिस प्रोव्हायडर आणि अन्य Meta कंपन्यांसह कार्य करतो. उदाहरणार्थ, आम्ही त्यांच्यासह आमच्या ॲपचे वितरण करणे; आमच्या तांत्रिक आणि भौतिक पायाभूत सुविधा प्रदान करणे, पोहोचवणे आणि इतर सिस्टीम प्रदान करणे; अभियांत्रिकी सपोर्ट, सायबर सुरक्षा सपोर्ट आणि ऑपरेशनल सपोर्ट प्रदान करणे; लोकेशन, नकाशा आणि ठिकाणांची माहिती पुरवणे; पेमेंट्सवर प्रक्रिया करणे; लोक आमच्या सर्व्हिसेस कशा वापरतात हे समजून घेण्यासाठी आमची मदत करणे; आमच्या सर्व्हिस बाजारात आणणे; आमच्या सर्व्हिस वापरुन बिझनेसेसशी संपर्क साधण्यात तुमची मदत करणे; आमच्यासाठी सर्वेक्षण आणि संशोधन करणे; सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडता याची खात्री करणे; आणि ग्राहक सर्व्हिससाठी मदत करणे यासाठी कार्य करतो. या कंपन्या काही विशिष्ट परिस्थितीत आम्हाला तुमच्याबद्दल माहिती देऊ शकतात; उदाहरणार्थ, सेवा समस्यांचे निदान आणि निराकरण करण्यात मदत करण्यासाठी App Store आम्हाला रिपोर्ट देऊ शकतात.
खालील “आम्ही इतर Meta कंपन्यांसोबत कसे कार्य करतो” विभाग WhatsApp इतर Meta कंपन्यांशी माहिती कशी संकलित करते आणि शेअर करते याबद्दल अधिक माहिती प्रदान करते.
- तृतीय-पक्ष सर्व्हिस. आम्ही तुम्हाला आमच्या सर्व्हिस तृतीय-पक्ष सर्व्हिस आणि Meta कंपनी प्रॉडक्ट्सयांच्या संबंधात वापरण्याची अनुमती देतो. तुम्ही आमच्या सर्व्हिस अशा तृतीय-पक्षाच्या सर्व्हिस किंवा Meta कंपनी प्रॉडक्ट्ससह वापरल्या असल्यास, आम्ही त्यांच्याकडून तुमच्याबद्दल माहिती प्राप्त करू शकतो; उदाहरणार्थ, तुम्ही आमच्या सर्व्हिसवरील तुमच्या WhatsApp संपर्क, ग्रुप किंवा ब्रॉडकास्ट लिस्टसह एखादा बातमी लेख शेअर करण्यासाठी एखाद्या बातमी सेवेवरील WhatsApp शेअर बटण वापरले असल्यास किंवा तुम्ही मोबाईल कॅरीयरच्या किंवा डिव्हाइस प्रोवाइडरच्या आमच्या सर्व्हिसच्या जाहिरातीद्वारे आमच्या सर्व्हिसमध्ये ॲक्सेस करणे निवडले असल्यास. कृपया हे लक्षात घ्या, की तुम्ही तृतीय-पक्ष सर्व्हिस किंवा इतर Meta कंपनी प्रॉडक्ट्स वापरता, तेव्हा त्यांच्या स्वत: च्या अटी आणि गोपनीयता धोरणे तुमच्या त्या सर्व्हिसच्या आणि प्रॉडक्ट्सच्या वापराला नियंत्रित करतील.
पेजच्या शीर्षस्थानी जा
आम्ही माहिती कशी वापरतो
आमच्या सर्व्हिस ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारित करणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, समर्थन करणे आणि त्यांचे विपणन करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली (तुमच्या निवडींच्या आणि लागू असलेल्या कायद्याच्या अधीन) माहिती वापरतो. कसे ते येथे दिले आहेः
- आमच्या सर्व्हिस. आम्ही आमच्याकडे असलेली माहिती आमच्या सर्व्हिस ऑपरेट करण्यासाठी आणि प्रदान करण्यासाठी वापरतो, ज्यामध्ये कस्टमर सपोर्ट प्रदान करणे, खरेदी किंवा व्यवहार पूर्ण करणे; आणि आमच्या सर्व्हिस सुधारणे, निराकरण करणे आणि सानुकूलित करणे समाविष्ट आहे आणि तुम्ही वापरू शकता त्या आमच्या सर्व्हिस Meta कंपनी प्रॉडक्ट्सशी कनेक्ट करण्यासाठी वापरतो. लोक आमच्या सर्व्हिस कशा वापरतात हे समजून घेण्यासाठी; आमच्या सर्व्हिसचे मूल्यांकन आणि सुधारित करण्यासाठी; नवीन सर्व्हिस आणि फीचर्सचे संशोधन, विकास आणि चाचणी घेण्यासाठी; आणि समस्या निवारण क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली माहिती वापरतो. तुम्ही जेव्हा आमच्याशी संपर्क साधता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी देखील आम्ही तुमची माहिती वापरतो.
- सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडता. सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडता हे आमच्या सर्व्हिसेसचे अविभाज्य भाग आहेत. आम्ही खाते आणि कृतींची पडताळणी करण्यासाठी; हानिकारक आचरणाचा सामना करण्यासाठी, वापरकर्त्यांना वाईट अनुभवांपासून आणि स्पॅमपासून संरक्षण देण्यासाठी; आणि संशयास्पद कृती किंवा आमच्या अटी आणि धोरणांचे उल्लंघन तपासून आमच्या सर्व्हिसेसवरील किंवा बाहेरील सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडतेचा प्रचार करण्यासाठी आणि आमच्या सर्व्हिसेस कायदेशीररित्या वापरल्या जात आहेत हे निश्चित करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली माहिती वापरतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील कायदा, आमचे हक्क आणि संरक्षण विभाग पहा.
- आमच्या सर्व्हिसबद्दलचे संभाषण आणि Meta कंपन्या बद्दलचे संभाषण. आमच्या सर्व्हिसबद्दल तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि आमच्या अटी, धोरणे आणि इतर महत्त्वपूर्ण अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती करून देण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेली माहिती वापरतो. आम्ही आमच्या सर्व्हिस आणि Meta कंपन्यांच्या सर्व्हिससाठी तुम्हाला विपणन प्रदान करू शकतो.
- कोणत्याही तृतीय-पक्षांच्या जाहिरातींचे बॅनर नाहीत. आम्ही अद्याप तृतीय पक्षाच्या जाहिरातींच्या बॅनरला आमच्या सेवांवर अनुमती दिलेली नाही. त्यांचा परिचय करून देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, परंतु जर आम्ही तसे केल्यास, आम्ही हे गोपनीयता धोरण अपडेट करू.
- बिझनेसमधील परस्परसंवाद. आम्ही तुम्हाला आणि बिझनेसेस सारख्या तृतीय पक्षांना WhatsApp वरील बिझनेसेससाठी कॅटलॉग सारख्या आमच्या सर्व्हिसेसचा वापर करुन एकमेकांशी संवाद करणे आणि परस्परसंवाद साधण्यासाठी सक्षम करतो, ज्याच्या द्वारे तुम्ही प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ब्राऊझ करू शकता आणि ऑर्डर्स देऊ शकता. बिझनेसेस तुम्हाला व्यवहार, अपॉइंटमेंट आणि शिपिंग सूचना; प्रॉडक्ट आणि सेवा अपडेट्स; आणि मार्केटिंग पाठवू शकतात. उदाहरणार्थ, आगामी प्रवासासाठी तुम्हाला फ्लाईट स्टेटस बद्दलची माहिती, तुमच्या एखाद्या खरेदीची पावती किंवा डिलिव्हरी कधी पूर्ण होईल याची सूचना प्राप्त होऊ शकेल. तुम्हाला बिझनेसमधून प्राप्त होणार्या संदेशामध्ये तुम्हाला स्वारस्य असलेल्या एखाद्या गोष्टीची ऑफर समाविष्ट असू शकते. तुम्हाला स्पॅमचा अनुभव मिळावा अशी आमची इच्छा नाही; तुमच्या सर्व संदेशांसह तुम्ही या संभाषणांना व्यवस्थापित करू शकता आणि आम्ही तुमच्या निवडींचा आदर करू.
पेजच्या शीर्षस्थानी जा
तुम्ही आणि आम्ही शेअर करत असलेली माहिती
तुमच्या वापरानुसार तुम्ही तुमची माहिती शेअर करता आणि आमच्या सर्व्हिसद्वारे संभाषण करता, आणि आम्ही तुमची माहिती ऑपरेट करण्यासाठी, सुधारण्यासाठी, समजण्यासाठी, सानुकूल करण्यासाठी, समर्थन देण्यासाठी आणि आमच्या सर्व्हिसचे विपणन करण्यात मदतीसाठी शेअर करतो.
- ज्यांच्याशी तुम्ही संभाषण करणे निवडले आहे त्यांना तुमची माहिती पाठवा. तुम्ही आमच्या सेवांचा वापर करता आणि त्याद्वारे संवाद साधता तेव्हा तुम्ही तुमची माहिती (संदेशासह) शेअर करता.
- तुमच्या खात्याशी संबंधित असलेली माहिती. तुमचा फोन नंबर, प्रोफाइल नाव आणि फोटो, "माझ्याबद्दल" माहिती, अखेरचे पाहिलेले माहिती आणि संदेशाच्या पावत्या आमच्या सेवा वापरणार्या कोणाकरताही उपलब्ध आहेत, तरीही बिझनेस, तुम्ही कोणाशी संवाद साधता यासह, इतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेली विशिष्ट माहिती व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या सेवा सेटिंग्ज कॉन्फिगर करू शकता.
- तुमचे संपर्क आणि इतर. वापरकर्ते, बिझनेस, ज्यांच्याशी तुम्ही संवाद साधता ते आमच्या सर्व्हिसवरील किंवा बाहेरील इतरांसह तुमची माहिती (तुमचा फोन नंबर किंवा मेसेजसह) संचयित किंवा पुन्हा शेअर देखील करू शकतात. आमच्या सर्व्हिसवर तुम्ही कोणाशी संभाषण करता आणि विशिष्ट माहिती शेअर करता हे व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही आमच्या सर्व्हिसमधील तुमच्या सर्व्हिस सेटिंग्ज आणि "ब्लॉक करा" फीचरचा वापर करू शकता.
- WhatsApp वरील बिझनेस. आम्ही बिझनेसेसना विशिष्ट सर्व्हिसेस ऑफर करतो जसे की आमच्या सर्व्हिसेसचे त्यांच्या वापराशी संबंधित असलेले मेट्रिक्स त्यांना प्रदान करणे.
- तृतीय-पक्ष सर्व्हिस प्रोव्हायडर. आम्ही आमच्या सर्व्हिस ऑपरेट करणे, प्रदान करणे, सुधारणे, समजून घेणे, सानुकूलित करणे, समर्थन करणे आणि त्यांचे विपणन करण्यात मदत करण्यासाठी तृतीय-पक्ष सर्व्हिस प्रोव्हायडर आणि अन्य Meta कंपन्यांसह कार्य करतो. आम्ही आमच्या सर्व्हिससेना सपोर्ट देण्यासाठी या कंपन्यांसोबत कार्य करतो, जसे की तांत्रिक पायाभूत सुविधा प्रदान करणे, पोहोचवणे आणि इतर सिस्टीम प्रदान करणे; आमच्या सर्व्हिसेस बाजारात आणणे; आमच्यासाठी सर्वेक्षण आणि संशोधन करणे; वापरकर्त्यांची आणि इतरांची सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडता यांचे रक्षण करणे; आणि ग्राहक सर्व्हिसला सहाय्य करणे. जेव्हा आम्ही या क्षमतेमध्ये तृतीय-पक्ष सर्व्हिस प्रोव्हायडर आणि इतर Meta कंपन्यांसह माहिती शेअर करतो तेव्हा आम्हाला सूचना आणि अटींनुसार आमच्या वतीने त्यांनी तुमच्या माहितीचा वापर करणे आमच्यासाठी आवश्यक असते.
- तृतीय-पक्ष सर्व्हिस. तुम्ही किंवा इतर कोणीही आमच्या सर्व्हिसमध्ये एकत्रित असलेल्या तृतीय-पक्ष सर्व्हिस किंवा इतर Meta कंपनी प्रॉडक्ट्स वापरतात तेव्हा, त्या तृतीय-पक्ष सर्व्हिस तुम्ही किंवा इतर कोणीही त्यांच्यासह काय शेअर करता याबद्दल माहिती प्राप्त करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही आमच्या सर्व्हिससह एकत्रित केलेली डेटा बॅकअप सर्व्हिस वापरली असल्यास (जसे की iCloud किंवा Google खाते), ते तुमच्या WhatsApp मेसेज सारखी तुम्ही त्यांच्यासह शेअर केलेली माहिती प्राप्त करतील. तुम्ही तृतीय-पक्षाच्या सर्व्हिससह किंवा आमच्या सर्व्हिसद्वारे लिंक केलेल्या इतर Meta कंपनी प्रॉडक्टसह संवाद साधत असल्यास, जसे की तुम्ही तृतीय-पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरुन कंटेन्ट प्ले करण्यासाठी ॲप प्लेअर वापरता तेव्हा, तुमचा IP पत्ता आणि तुम्ही WhatsApp वापरकर्ते आहात हे तथ्य आणि तुमच्याबद्दलची माहिती, तृतीय-पक्षाला किंवा Meta कंपनी प्रॉडक्ट ला प्रदान केली जाऊ शकते. कृपया हे लक्षात घ्या, की तुम्ही तृतीय-पक्ष सर्व्हिस किंवा इतर Meta कंपनी प्रॉडक्ट्स वापरता, तेव्हा त्यांच्या स्वत: च्या अटी आणि गोपनीयता धोरणे तुमच्या त्या सर्व्हिसच्या आणि प्रॉडक्ट्सच्या वापराला नियंत्रित करतात.
पेजच्या शीर्षस्थानी जा
आम्ही इतर Meta कंपन्यांसह कसे कार्य करतो
Meta कंपन्यांचा भाग म्हणून, WhatsApp इतर Meta कंपन्यांकडून माहिती प्राप्त करते आणि त्यासोबत माहिती (येथे पहा) शेअर करते. आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली माहिती आम्ही वापरू शकतो आणि ते ऑपरेट करण्यात मदतीसाठी, प्रदान करण्यासाठी, सुधारण्यासाठी, समजण्यासाठी, सानुकूल करण्यासाठी, समर्थन करण्यासाठी आणि Meta कंपनी प्रॉडक्ट्स सहित आमच्या सर्व्हिस आणि त्यांच्या ऑफर मार्केट करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत शेअर केलेली माहिती वापरू शकतात. यामध्ये हे समाविष्ट आहेः
- पायाभूत सुविधा आणि डिलिव्हरी सिस्टीम सुधारण्यात मदत करणे;
- आमच्या किंवा त्यांच्या सर्व्हिस कशा वापरल्या जातात हे समजणे;
- Meta कंपनी प्रॉडक्ट्स वर सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडता प्रमोट करणे उदा. सिस्टिम्स सुरक्षित करणे आणि स्पॅम, धोके, गैरवर्तन किंवा उल्लंघनाच्या कृती यांचा सामना करणे;
- त्यांच्या सर्व्हिस आणि त्यांचा वापर करण्याचा तुमचा अनुभव सुधारणे जसे की तुमच्यासाठी सूचना तयार करणे (उदाहरणार्थ, मित्र किंवा ग्रुप कनेक्शन किंवा स्वारस्यपूर्ण सामग्री), फीचर आणि सामग्री वैयक्तिकृत करणे, तुमच्या खरेद्या आणि व्यवहार पूर्ण करण्यात मदत करणे, आणि Meta कंपनी प्रॉडक्ट्सवर समर्पक जाहिराती आणि ऑफर दर्शवणे; आणि
- अखंडता प्रदान करणे जी तुम्हाला तुमचे WhatsApp अनुभव इतर Meta कंपनी प्रॉडक्ट्स सह कनेक्ट करू देते. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचे Facebook Pay खाते WhatsApp वरील गोष्टींसाठी देय देण्यासाठी कनेक्ट करण्याची अनुमती देणे किंवा पोर्टल सारख्या इतर Meta कंपनी प्रॉडक्ट्स वर तुमचे WhatsApp खाते कनेक्ट करून तुमच्या मित्रांसह तुम्हाला चॅट करू देणे.
इतर Meta कंपन्यांबद्दल च्या गोपनीयता धोरणांचे पुनरावलोकन करून त्या कंपन्याबंद्दल आणि त्यांच्या गोपनीयता पद्धतींबद्दल अधिक जाणून घ्या.
पेजच्या शीर्षस्थानी जा
असाइनमेंट, नियंत्रण बदल आणि ट्रान्सफर
आम्ही विलीनीकरण, अधिग्रहण, पुनर्रचना, दिवाळखोरी किंवा आमच्या सर्व मालमत्ता किंवा काही भाग विक्रीत सामील झाल्यास आम्ही लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यानुसार व्यवहारासंदर्भात उत्तराधिकारी संस्था किंवा नवीन मालकांसह तुमची माहिती शेअर करू.
पेजच्या शीर्षस्थानी जा
तुमची माहिती व्यवस्थापित करणे आणि राखून ठेवणे
आमचे इन-अॅप विनंती खाते फीचर (सेटिंग्ज अंतर्गत उपलब्ध > खाते) वापरून तुम्ही तुमची माहिती अॅक्सेस किंवा पोर्ट करू शकता. iPhone वापरकर्त्यांसाठी, आमच्या iPhone मदत केंद्र लेखांद्वारे तुम्ही तुमची माहिती कशी अॅक्सेस करू शकता, व्यवस्थापित करू शकता आणि हटवू शकता हे जाणून घेऊ शकता. Android वापरकर्त्यांसाठी, आमच्या Android मदत केंद्र लेखांद्वारे तुम्ही तुमची माहिती कशी अॅक्सेस करू शकता, व्यवस्थापित करू शकता आणि हटवू शकता हे जाणून घेऊ शकता.
आम्ही या गोपनीयता धोरणात निर्धारित केल्या गेलेल्या उद्दिष्टांसाठी आवश्यक असते त्या कालावधीपर्यंत माहिती स्टोअर करतो, ज्यामध्ये आमच्या सर्व्हिसेस प्रदान करणे किंवा इतर कायदेशीर उद्दिष्टांसाठी, जसे की कायदेशीर बंधनांचे पालन करणे, आमच्या अटींची अंमलबजावणी करणे आणि त्यांचे उल्लंघन करणे प्रतिबंधित करणे, किंवा आमच्या अधिकारांचे, मालमत्ता आणि वापरकर्ते यांचे संरक्षण करणे किंवा संरक्षण देणे, यांचा समावेश आहे. माहितीचे स्वरूप, ती का संकलित केली आणि त्यावर प्रक्रिया का केली, समर्पक कायदेशीर किंवा ऑपरेशनल धारणा गरजा आणि कायदेशीर बंधनासारख्या घटकांवर आधारित स्टोरेज कालावधी केस-बाय-केस आधारावर निश्चित होतो.
पुढे तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थापित करायची, बदलायची, मर्यादित करायची असल्यास किंवा हटवायची असल्यास तुम्ही पुढील साधनांनी तसे करू शकता:
- सर्व्हिस सेटिंग्ज. इतर वापरकर्त्यांना उपलब्ध असलेली विशिष्ट माहिती व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या सेवा सेटिंग्ज बदलू शकतात. तुम्ही तुमचे संपर्क, ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट व्यवस्थापित करू शकता किंवा तुम्ही ज्यांच्याशी संप्रेषण करू इच्छिता त्या वापरकर्त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी आमचे “ब्लॉक करा” फीचर वापरा.
- तुमचा मोबाईल फोन नंबर, प्रोफाइल नाव आणि फोटो आणि “याबद्दल” माहिती बदलणे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलल्यास, तुम्ही तो आमचा इन-अॅप नंबर बदला फीचर वापरून अपडेट करणे आणि तुमचे खाते तुमच्या नवीन मोबाईल फोन नंबरवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे प्रोफाईल नाव, प्रोफाइल फोटो आणि "याबद्दल" माहिती देखील कधीही बदलू शकता.
- तुमचे WhatsApp खाते हटवणे. तुम्ही आमचे इन-अॅप माझे खाते हटवा फीचर वापरून (तुम्ही लागू कायद्यानुसार आम्ही तुमची माहिती वापरण्यासाठी तुम्ही दिलेली तुमची संमती मागे घेऊ इच्छित असल्यास त्यासह) तुमचे WhatsApp खाते कधीही हटवू शकता. जेव्हा तुम्ही तुमचे WhatsApp खाते हटवता तेव्हा तुमचे डिलिव्हर न झालेले संदेश तसेच तुमची इतर कोणतीही माहिती जी ऑपरेट करण्यासाठी आणि आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी आम्हाला गरज असणार नाही ती आमच्या सर्व्हरवरून हटवली जाते. तुमचे खाते हटवण्याने तुमच्या खात्याची माहिती आणि प्रोफाइल फोटो हटवला जातो, तुम्हाला सर्व WhatsApp ग्रुप्समधून हटवले जाते आणि तुमचा WhatsApp संदेश इतिहास हटवला जातो. लक्ष्यात असू द्या तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून आमचे इन-अॅप माझे खाते हटवा फीचर न वापरता WhatsApp हटवल्यास तुमची माहिती प्रदीर्घ कालावधीसाठी आमच्याकडे स्टोअर केली जाईल. कृपया लक्ष्यात घ्या जेव्हा तुम्ही तुमचे खाते हटवता तेव्हा तुम्ही तयार केलेल्या ग्रुपशी संबंधित तुमची कोणतीही माहिती किंवा तुमच्याशी संबंधित इतर वापरकर्त्यांकडे असलेली माहिती जसे की तुम्ही त्यांना पाठवलेल्या संदेशांची कॉपी प्रभावित होत नाही.
आमचा डेटा हटवण्याबद्दल आणि धारणा पद्धतींबद्दल आणि तुमचे खाते कसे हटवायचे याबद्दल तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.
पेजच्या शीर्षस्थानी जा
कायदा, आमचे हक्क आणि संरक्षण
वरील गोपनीयता धोरणानुसार "आम्ही संकलित करतो ती माहिती" विभागात वर्णन केलेली तुमची माहिती अॅक्सेस करतो, जतन करतो आणि शेअर करतो, जर यासाठी ते आवश्यक आहे असे आम्हाला पूर्ण विश्वासाने वाटत असेल तर: (a) लागू कायदा किंवा नियमन, कायदेशीर प्रक्रिया किंवा सरकारच्या विनंत्यांनुसार प्रतिसाद देणे; (b) संभाव्य उल्लंघनाच्या तपासासहित आमच्या अटी आणि इतर लागू अटी आणि धोरणांची अंमलबजावणी करणे (c) फसवणूक आणि इतर बेकायदेशीर कृती किंवा सुरक्षितता आणि तांत्रिक समस्या शोधणे, तपासणी करणे, प्रतिबंधित करणे किंवा त्यांचे निराकरण करणे किंवा (d) आमचे वापरकर्ते, WhatsApp, इतर Meta कंपन्या किंवा इतरांच्या अधिकारांचे, मालमत्तेचे आणि सुरक्षेचे संरक्षण करणे, यामध्ये मृत्यू प्रतिबंधित करणे किंवा तात्काळ होणार्या सुस्पष्ट शारीरिक इजेचाही समावेश होतो.
पेजच्या शीर्षस्थानी जा
आमची ग्लोबल ऑपरेशन्स
WhatsApp, आंतरिकदृष्ट्या Meta कंपन्यांच्या अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या आमचे भागीदार आणि सर्व्हिस प्रोव्हायडरसह आणि या गोपनीयता धोरणानुसार जगभरात तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधता त्यांच्यासोबत जागतिक स्वरूपात माहिती शेअर करते. तुमची माहिती उदाहरणार्थ, ट्रान्सफर किंवा ट्रान्समिट किंवा स्टोअर केली जाऊ शकते आणि त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते; युनायटेड स्टेट्स, असे देश किंवा प्रांत जेथे Meta कंपन्यांचे संबद्ध आणि भागीदार किंवा आमचे सर्व्हिस प्रोव्हायडर स्थित आहेत; किंवा जागतिक स्तरावरील इतर कोणतेही देश किंवा प्रदेश जेथे आमच्या सर्व्हिस या गोपनीयता धोरणात वर्णन केलेल्या हेतूंसाठी तुम्ही जिथे राहता त्याशिवाय इतर ठिकाणी प्रदान केल्या जातात. WhatsApp युनायटेड स्टेट्ससहित Meta च्या जागतिक पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटरचा वापर करते. हे ट्रान्सफर करणे आमच्या अटींमध्ये नमूद केलेल्या जागतिक सर्व्हिस प्रदान करण्यासाठी गरजेच्या आहेत. कृपया लक्ष्यात घ्या तुमची माहिती ट्रान्सफर केली जाते त्या देशात किंवा प्रदेशामध्ये तुमच्या मूळ देश किंवा प्रदेशामध्ये असतात त्यापेक्षा गोपनीयतेचे भिन्न कायदे आणि संरक्षणे असू शकतात.
पेजच्या शीर्षस्थानी जा
आमच्या धोरणामधील अपडेट
आम्ही आमच्या गोपनीयता धोरणात सुधारणा किंवा अपडेट करू शकतो. आम्ही तुम्हाला या गोपनीयता धोरणामधील सुधारणांची सूचना, योग्य असेल त्यानुसार, देऊ आणि या गोपनीयता धोरणाच्या शीर्षस्थानी "प्रभावी तारीख" अपडेट करू. कृपया वेळोवेळी आमच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करा.
पेजच्या शीर्षस्थानी जा
आम्हाला संपर्क करा
आमच्या गोपनीयता धोरणाबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, कृपया आम्हाला संपर्क करा.
WhatsApp LLC
गोपनीयता धोरण
1601 Willow Road
Menlo Park, California 94025
United States of America
पेजच्या शीर्षस्थानी जा