प्रभावी तारीख: 4 जानेवारी, 2021 (संग्रहित आवृत्त्या)
अनुक्रमणिका
तुम्ही युरोपियन प्रदेशामध्ये राहत असल्यास, WhatsApp Ireland Limited तुम्हाला या सेवा या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत प्रदान करते.
तुम्ही युके मध्ये राहत असल्यास, WhatsApp LLC या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण याअंतर्गत तुम्हाला सर्व्हिस प्रदान करते.
आमच्या अॅप्स, सर्व्हिस, फीचर, सॉफ्टवेअर किंवा वेबसाईटद्वारे आमच्या सर्व्हिस (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) प्रदान करण्यासाठी आम्हाला आमच्या सेवाशर्तींसाठी ("अटी") तुमचा करार प्राप्त करण्याची गरज आहे.
WhatsApp LLC ("WhatsApp," "आमचे," "आम्ही," किंवा "आम्हाला") तुम्ही युरोपियन आर्थिक क्षेत्र असलेल्या (ज्यामध्ये युरोपियन युनियनचा समावेश आहे) देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये आणि इतर समाविष्ट कोणत्याही देश किंवा प्रदेशामध्ये (एकत्रितपणे "युरोपियन प्रदेश" म्हणून संदर्भित) राहत नसल्यास तुम्हाला खाली वर्णन केलेल्या सेवा ("सर्व्हिस") प्रदान करते.
कोणत्याही आपत्कालीन सेवांचा ॲक्सेस नाहीः आमच्या सेवा आणि तुमचा मोबाईल फोन आणि फिक्स्ड लाइन- टेलिफोन व एसएमएस सेवांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. आमच्या सेवा आपत्कालीन सेवा किंवा पोलीस, अग्निशमन विभाग किंवा हॉस्पिटल्स किंवा आपत्कालीन सेवा प्रदात्यांना ॲक्सेस देत नाही किंवा सार्वजनिक सुरक्षासंबंधी उत्तर देणाऱ्या केंद्रांना कनेक्ट करत नाही. तुम्ही मोबाइल फोन, फिक्स्ड-लाइन टेलिफोन किंवा इतर सर्व्हिसद्वारे तुमच्या संबंधित आपत्कालीन सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधू शकता हे सुनिश्चित केले पाहिजे.
तुम्ही जर युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडा येथे स्थित WHATSAPP वापरकर्ता असाल तर, आमच्या अटींमध्ये एक बंधनकारक लवाद तरतूद आहे, ज्यात नमूद केले आहे की, तुम्ही पर्याय सोडून दिल्याचा अपवाद वगळून आणि काही प्रकारचे विवाद वगळून, WHATSAPP आणि तुम्ही सर्व विवादांचे (खाली परिभाषित) निराकरण बंधनकारक स्वतंत्र लवाद मार्फत करण्यास सहमती देता, ज्याचा अर्थ या विवादांचा निर्णय न्यायाधीश किंवा ज्यूरीमार्फत करण्याचा कोणताही अधिकार तुम्ही सोडून देता, आणि तसेच तुम्ही क्लास ॲक्शन, क्लास लवाद किंवा प्रातिनिधिक कृती यामध्ये सहभागी होण्याचा तुमचा अधिकार सोडून देता. अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया खालील "युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी विशेष लवाद तरतूद" विभाग वाचा.
नोंदणी. अचूक माहिती वापरून, तुमचा सध्याचा मोबाईल नंबर देऊन आणि तुम्ही तो बदललेला असल्यास, तुमचा मोबाईल नंबर आमचे इन-अॅप नंबर बदलण्याचे फीचर वापरून अपडेट केलेला असल्यास तुम्ही आमच्या सेवांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. आमच्या सेवांसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही कोडसह मजकूर संदेश आणि फोन कॉल्स (आमच्याकडून किंवा आमच्या तृतीय-पक्ष प्रदात्यांकडून) प्राप्त करण्यास सहमती दर्शवता.
पत्ता पुस्तिका. आमच्या सर्व्हिसचे वापरकर्ते आणि तुमच्या इतर संपर्कांसह, नियमितपणे तुमच्या मोबाईल ॲड्रेस बुकमधील फोन नंबर्ससह लागू असलेल्या कायद्यांद्वारे परवानगी दिली असल्यास, तुम्ही संपर्क अपलोड फीचर वापरू शकता आणि आम्हाला ते प्रदान करू शकता. येथे आमच्या संपर्क अपलोड फीचरबद्दल अधिक जाणून घ्या.
वय. आमच्या सेवांसाठी नोंदणी करण्यासाठी व त्या वापरण्यासाठी तुमचे वय किमान १३ वर्षांचे असणे आवश्यक आहे (किंवा पालकांच्या मंजुरीशिवाय तुमच्या देश किंवा प्रदेशामध्ये आमच्या सेवा वापरण्यासाठी किंवा त्यावर नोंदणी करण्यासाठी तितक्याच जास्त वयाचे असणे आवश्यक आहे. लागू होणाऱ्या कायद्यांतर्गत, आमच्या सेवा वापरण्यासाठी किमान आवश्यक वयाचे असल्याच्या व्यतिरिक्त, तुमच्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये आमच्या सेवांशी सहमत होण्याचा अधिकार असण्यासाठी तुम्ही पुरेशा वयाचे नसल्यास, तुमच्या वतीने तुमच्या पालकांनी किंवा गार्डियननी आमच्या अटींना सहमती देणे आवश्यक आहे. कृपया तुमचे पालक किंवा गार्डियनना तुमच्यासोबत या अटी वाचण्यास सांगा.
डिव्हाइसेस आणि सॉफ्टवेअर. आमच्या सेवा वापरण्यासाठी तुम्ही विशिष्ट डिव्हाइसेस, सॉफ्टवेअर आणि डेटा कनेक्शन प्रदान करणे आवश्यक आहे, ज्यांचा पुरवठा अन्यथा आम्ही करत नाही. तुम्ही व्यक्तिचलितपणे किंवा स्वयंचलितपणे आमच्या सेवांमध्ये अपडेट डाउनलोड करण्यासाठी आणि स्थापित करण्यासाठी सहमती देता. तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी गरज म्हणून वेळोवेळी आमच्या सेवांद्वारे आमच्या तुम्हाला सूचना पाठवण्यासाठी देखील सहमती देता.
शुल्क आणि कर. तुम्ही आमच्या सेवा वापरण्याशी संबंधित सर्व कॅरियर डेटा प्लॅन, इंटरनेट शुल्क आणि इतर शुल्क व कर यासाठी तुम्ही जबाबदार आहात.
WhatsApp ला तुमच्या गोपनीयतेबद्दल काळजी आहे. WhatsApp चे गोपनीयता धोरण आमच्या डेटा पद्धतींमध्ये आम्हाला मिळणाऱ्या आणि तुमच्याकडून संकलित केलेल्या माहितीचे प्रकार, ही माहिती आम्ही कशी वापरतो व शेअर करतो आणि तुमच्याबद्दलच्या माहितीच्या प्रक्रियेसंदर्भात तुमचे अधिकार याचे वर्णन करते.
आमच्या अटी व धोरणे. तुम्ही आमच्या सेवा आमच्या अटी आणि धोरणांनुसार वापरणे आवश्यक आहे. आमच्या अटी व धोरणांचे तुम्ही उल्लंघन केल्यास आम्ही तुमचे खाते अक्षम किंवा निलंबित करण्यासह त्यावर कारवाई करू शकतो आणि तसे केल्यास तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दुसरे खाते तयार करणार नसल्याची सहमती देता. अशाप्रकारे खाते अक्षम करणे किंवा निलंबित करणे "समाप्ती" विभागानुसार असेल.
कायदेशीर आणि स्वीकार्य वापर. तुम्ही केवळ कायदेशीर, अधिकृत आणि स्वीकार्य हेतूंसाठी आमच्या सेवा अॅक्सेस करू शकता किंवा वापरू शकता. तुम्ही या प्रकारे आमच्या सेवा वापरू (किंवा इतरांना वापरण्यामध्ये सहकार्य) शकणार नाही: (a) गोपनीयता, प्रसिद्धी, बौद्धिक संपदा किंवा इतर मालकी हक्कांसह WhatsApp, आमच्या वापरकर्त्यांचे किंवा इतरांच्या हक्कांचे उल्लंघन, अयोग्य किंवा उल्लंघन करणे; (b) बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणे, धमकावणे, त्रास देणे, द्वेषपूर्ण, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह किंवा हिंसक गुन्ह्यांना चालना देण्यासह बेकायदेशीर किंवा अन्यथा अयोग्य असल्याचे आचरण करण्यास उद्युक्त करणे किंवा प्रोत्साहित करणे; (c) खोटे बोलणे, चुकीचे विधान करणे किंवा दिशाभूल करणारी विधाने प्रकाशित करणे; (d) एखाद्याची तोतयागिरी करणे; (e) एकगठ्ठा संदेश पाठवणे, ऑटो-संदेश पाठवणे, ऑटो-डायलिंग आणि यासारख्या बेकायदेशीर किंवा अनुमती नसलेले कम्युनिकेशन्स पाठविणे; किंवा (f) अन्यथा आमच्याद्वारे अधिकृत केल्याशिवाय आमच्या सेवांचा कोणताही अ-वैयक्तिक वापर करणे.
WhatsApp किंवा आमच्या वापरकर्त्यांना हानी पोहोचवणे. तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, स्वयंचलित किंवा इतर मार्गांनी, परवानगी नसलेल्या किंवा अवैध पद्धतीने आमच्या सर्व्हिस ॲक्सेस करणे, वापर करणे, कॉपी करणे, स्वीकारणे, सुधारणे, आधारित व्युत्पन्न कार्ये तयार करणे, वितरित करणे, परवाना देणे, उपपरवाना देणे, ट्रान्सफर करणे, प्रदर्शित करणे, कार्यप्रदर्शन करणे, किंवा अन्यथा गैरवापर करणे, किंवा आम्ही, आमच्या सर्व्हिस, सिस्टिम्स, आमचे वापरकर्ते किंवा इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या, अपाय करणाऱ्या किंवा नुकसान करणाऱ्या मार्गांनी हे करू नये (किंवा इतरांना सहाय्य करू नये), यामध्ये समावेश होतो की तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा स्वयंचलित मार्गांनी असे करणार नाही: (a) आमच्या सेवा उलटपुलट करणे, त्यात बदल करणे, सुधारणा करणे, त्यातून व्युत्पन्न कार्ये तयार करणे, डिकंपाइल करणे किंवा त्यातून कोड काढून घेणे; (b) आमच्या सेवांमार्फत किंवा त्यावर व्हायरस किंवा इतर हानीकारक कॉम्प्यूटर कोड पाठवणे, संग्रहित करणे, किंवा ट्रान्समिट करणे; (c) आमच्या सर्व्हिस किंवा सिस्टिम्सवर अनधिकृत ॲक्सेस मिळवणे किंवा तो मिळवण्याचा प्रयत्न करणे; (d) आमच्या सर्व्हिसची सुरक्षा, सुरक्षितता, गोपनीयता, अखंडता, उपलब्धता किंवा कार्यप्रदर्शन यामध्ये अडथळा आणणे किंवा खंडित करणे; (e) अनधिकृत किंवा स्वयंचलित मार्गांनी आमच्या सेवांसाठी खाती तयार करणे; (f) कोणत्याही परवानगी नसलेल्या किंवा अनधिकृत पद्धतीने आमच्या वापरकर्त्यांची किंवा त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करणे; (g) कोणत्याही अनधिकृत पद्धतीने आमच्या सेवा किंवा आमच्याकडून किंवा आमच्या सर्व्हिसकडून प्राप्त केलेला डेटा विकणे, पुनर्विक्री करणे, भाडेतत्त्वावर देणे किंवा त्यासाठी शुल्क आकारणे; (h) नेटवर्कवरून आमच्या सर्व्हिस वितरित करणे किंवा उपलब्ध करून देणे, जेथे त्या एकाच वेळी अनेक डिव्हाइसेसवर वापरल्या जाऊ शकतात, आमच्या सर्व्हिसमार्फत आम्ही स्पष्टपणे प्रदान केलेल्या टूल्सद्वारे अधिकृत केल्यानुसार तो अपवाद वगळता; (i) लक्षणीयरित्या आमच्या सर्व्हिसच्या समान कार्य करणारे सॉफ्टवेअर किंवा APIs तयार करणे आणि ते अनधिकृत पद्धतीने तृतीय पक्षांना वापरण्यासाठी ऑफर करणे; किंवा (j) कोणत्याही रिपोर्टिंग चॅनेल्सचा दुरुपयोग करणे, जसे की फसवे किंवा विनाआधार रिपोर्ट किंवा अपील सबमिट करून.
तुमचे खाते सुरक्षित ठेवणे. तुमचे डिव्हाइस आणि तुमचे WhatsApp खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही कोणत्याही अनधिकृत वापराबाबत किंवा तुमच्या खात्याची सुरक्षा किंवा आमच्या सेवांचे उल्लंघन झाल्याबद्दल आम्हाला तात्काळ सूचित करणे आवश्यक आहे.
आमच्या सर्व्हिस तुम्हाला तृतीय-पक्ष वेबसाइट, अॅप, सामग्री, इतर प्रॉडक्ट्स व सर्व्हिस आणि Meta कंपनी प्रॉडक्ट्स ॲक्सेस करण्याची, वापरण्याची किंवा इंटरिएक्ट करण्याची अनुमती देऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही आमच्या सर्व्हिसशी एकीकृत केलेल्या तृतीय-पक्ष डेटा बॅकअप सर्व्हिस वापरण्याचा पर्याय निवडू शकता (जसे की iCloud किंवा Google ड्राइव्ह) किंवा तुम्हाला तुमच्या WhatsApp संपर्कांना माहिती पाठवण्यास सक्षम करतात अशा तृतीय-पक्षाच्या वेबसाइटवरून शेअर करा बटण वापरुन इंटरिॲक्ट करू शकता. कृपया लक्ष्यात घ्या या अटी आणि आमचे गोपनीयता धोरण केवळ आमच्या सर्व्हिसच्या वापरावर लागू होते. जेव्हा तुम्ही तृतीय-पक्षाचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिस किंवा Meta कंपनी प्रॉडक्ट्स वापरता तेव्हा त्यांच्या अटी आणि गोपनीयता धोरणे त्या प्रॉडक्ट्स किंवा सेवांच्या वापरावर नियंत्रण ठेवतील.
तुमचे अधिकार. तुम्ही तुमच्या WhatsApp खात्यासाठी किंवा आमच्या सेवांद्वारे जी माहिती सबमिट करता त्याच्या मालकी हक्काचा दावा WhatsApp करत नाही. तुमच्याकडे तुमच्या WhatsApp खात्यासाठी किंवा आमच्या सेवांद्वारे सबमिट केलेल्या माहितीचे आवश्यक ते सर्व अधिकार असणे आणि आमच्या अटींमध्ये हक्क मंजूर करण्याचा अधिकार आणि परवाने असणे आवश्यक आहे.
WhatsApp अधिकार. आमच्या सेवेशी संबंधित सर्व कॉपीराइट्स, ट्रेडमार्क्स, डोमेन, लोगो, ट्रेड ड्रेस, ट्रेड गुपिते, पेटंट आणि इतर बौद्धिक संपदा अधिकारांची मालकी आमच्याकडे आहे. तुमच्याकडे आमची व्यक्त परवानगी असल्याशिवाय आणि आमच्या ब्रँड गाईडलाइन्सचा अपवाद वगळता तुम्ही आमचे कॉपीराइट्स, ट्रेडमार्क (किंवा इतर कोणतेही समान मार्क्स). डोमेन्स, लोगो, ट्रेड ड्रेस, ट्रेड गुपिते, पेटंट आणि इतर बैद्धिक संपदा अधिकार वापरू शकत नाही. तुम्ही आमच्या संलग्न कंपन्यांचे ट्रेडमार्क्स तुम्हाला कोणत्याही प्रकाशित ब्रँड मार्गदर्शकतत्त्वांमध्ये अधिकृत केल्यानुसार, केवळ त्यांच्या परवानगीने वापरता येतात.
तुमचा WhatsApp चा परवाना. आमच्या सेवा ऑपरेट करण्यासाठी आणि प्रदान करण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवरील किंवा त्याद्वारे अपलोड, सबमिट, स्टोअर, पाठवली किंवा प्राप्त केलेली माहिती तुम्ही WhatsApp ला जगभर, नॉन-एक्सक्लुझिव्ह, रॉयल्टी-फ्री, उपपरवानायोग्य आणि वापरासाठी हस्तांतणीय परवाना, पुनरूत्पादन, वितरीत, डेरिवेटिव्ह कार्य तयार करणे, प्रदर्शित करणे आणि सादर करण्याची सहमती देता. या परवान्यामध्ये तुम्ही मंजूर केलेले अधिकार आमच्या सेवा संचालित करण्याच्या आणि प्रदान करण्याच्या मर्यादित हेतूंसाठी असतात (जसे की आम्हाला तुमचे प्रोफाइल फोटो आणि स्टेटस संदेश प्रदर्शित करण्याची, तुमचे संदेश ट्रान्समिट करण्याची आणि तुमचे न पोहोचवलेले संदेश आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेपर्यंत सुमारे ३० दिवस आमच्या सर्व्हरवर स्टोअर करण्याची अनुमती देणे).
तुमच्यासाठी WhatsApp चा परवाना. आम्ही तुम्हाला आमच्या अटींच्या अधीन राहून व त्या अनुषंगाने आमच्या सेवा वापरण्यासाठी मर्यादित, परत घेता येण्यासारखा, नॉन-एक्सक्लुझिव्ह, उपपरवानायोग्य नसलेला, आणि अ-हस्तांतरणीय परवाना देतो. आमच्या अटींमधील अनुमतीनुसार हा परवाना केवळ आमच्या सेवा वापरण्याची क्षमता तुम्हाला देणे या उद्देशाने आहे. तुम्हाला स्पष्टपणे देण्यात आलेले परवाने आणि अधिकार वगळता तुम्हाला कोणतेही निहित किंवा अन्यथा परवाना किंवा अधिकार मंजूर केलेले नाही.
तृतीय-पक्ष कॉपीराइट, ट्रेडमार्क किंवा इतर बौद्धिक संपदा उल्लंघनाच्या दाव्यांच्या तक्रारींसाठी कृपया आमचे बौद्धिक संपदा धोरण पहा. तुम्ही स्पष्टपणे, गांभीर्याने किंवा सातत्याने इतरांच्या बौद्धिक मालमत्ता हक्काचे उल्लंंघन केल्यास किंवा कायदेशीर कारणांसाठी आम्हाला तसे करावे लागल्यास आम्ही तुमच्या खात्यावर कारवाई करू शकतो. अशाप्रकारे खाते अक्षम करणे किंवा निलंबित करणे "समाप्ती" विभागानुसार असेल.
तुम्ही आमच्या सर्व्हिस तुमच्या स्वतःच्या जोखमीवर आणि पुढील अस्वीकरणाच्या अधीन राहून वापरता. आम्ही आमच्या सेवा "जशा आहेत" आधारावर व कोणत्याही स्पष्ट किंवा निहीत वॉरंटींशिवाय, यात याचा समावेश होतो, परंतु यापुरते मर्यादित नाही, व्यापारीकरण, विशिष्ट उद्देशासाठी फीटनेस, शीर्षक, भंग न करणे आणि कॉम्प्यूटर व्हायरस किंवा इतर हानीकारक कोडपासून मुक्त, प्रदान करतो. आम्ही वॉरंटी देत नाही की आमच्याद्वारे देण्यात आलेली कोणतीही माहिती अचूक, पूर्ण किंवा उपयुक्त आहे, की आमच्या सेवा त्रुटी मुक्त, सुरक्षित किंवा रक्षित कार्यन्वित होतात, किंवा आमच्या सेवा विना व्यत्यय, विलंब किंवा दोषविरहित कार्य करतील. आम्ही नियंत्रित करत नाही किंवा आमचे वापरकर्ते कसे आणि कधी आमच्या सेवा वापरतात याचे, किंवा आमच्या सेवा पुरवत असलेली वैशिष्ट्ये, सेवा आणि इंटरफेसेस यांचे नियंत्रण करण्यासाठी जबाबदार नाही. आमचे वापरकर्ते किंवा इतर तृतीय पक्षांच्या कृती किंवा माहिती (सामग्रीसह) नियंत्रित करण्यासाठी आम्ही जबाबदार नाही आणि ते बंधनकारक नाही. तुम्ही आम्हाला, आमच्या सहाय्यक, संलग्न कंपन्या, आणि आमचे आणि त्यांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, भागीदार आणि एजंट (एकत्रितपणे "WHATSAPP पक्ष") यांना कोणत्याही तृतीय पक्षाच्या विरुद्ध असलेल्या ज्ञात किंवा अज्ञात, त्याच्याशी संबंधित, त्यातून उत्पन्न होणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे अशा कोणत्याही दाव्याशी संबंधित, कोणत्याही दावे, तक्रार, कृतीचे कारण, मतभेद, विवाद किंवा हानी (एकत्रितपणे, "दावा"), यापासून मुक्त करता. WHATSAPP पक्षांशी संबंधित तुमचे अधिकार, जर तुमच्या देशातील किंवा निवासी प्रदेशातील कायदे, तुमच्या सेवेच्या वापराच्या परिणामी लागू होणारे, त्याची अनुमती देत नसल्यास, मागील अस्वीकरणाद्वारे सुधारित केले जात नाहीत. तुम्ही जर युनायटेड स्टेट्सचे रहिवासी असाल तर, कॅलिफोर्निया सिव्हिल कोड §१५४२, किंवा इतर कोणताही समान लागू होणारा कायदा किंवा इतर कोणत्याही न्यायाधिकार क्षेत्राचा कायदा याअंतर्गत तुम्हाला असू शकेल असा कोणताही अधिकार तुम्ही सोडून देता, जो असे नमूद करतो की: क्रेडिटर किंवा रिलीजिंग पक्षास माहित नसलेल्या दाव्यापर्यंत सामान्य रिलीज विस्तारित होत नाही किंवा रिलीज कार्यन्वित होण्याच्या वेळी त्याच्या किंवा तिच्या बाजूने अस्तित्वात असल्याचा संशय आहे, आणि जर त्याला किंवा तिला ज्ञात असेल तर कर्जदार किंवा रिलिजिंग पक्षासोबतच्या तिच्या किंवा त्याच्या समझोत्यावर लक्षणीयरित्या प्रभाव टाकला असेल.
कोणताही गमावलेला नफा किंवा आमच्या अटी, आम्ही, किंवा आमच्या सर्व्हिसशी संबंधित, त्यामधून उत्पन्न होणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे संबंधित असलेल्या परिणामी, विशेष, दंडात्मक, अप्रत्यक्ष, किंवा प्रासंगिक हानीसाठी, (निष्काळजीपणासह, कसाही झालेला असला आणि दायित्वाच्या कोणत्याही सिद्धांतावर), जरी WhatsApp पक्षास अशा हानीच्या शक्यतेविषयी सल्ला दिला गेलेला असला तरीही, WHATSAPP पक्ष तुम्हाला उत्तरदायी नसेल. आमच्या अटीं, आम्ही किंवा आमच्या सेवांशी संबंधित, त्यामुळे उत्पन्न होणारे, किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संबंधित एकत्रित दायित्व शंभर डॉलर्स ($१००) किंवा मागील बारा महिन्यात तुम्ही आम्हाला देय दिलेल्या रकमेपेक्षा जास्त होणार नाही. लागू होणाऱ्या कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल व्याप्तीपर्यंत काही हानी आणि दायित्वाच्या मर्यादेचे मागील अस्वीकरण लागू होईल. काही राज्ये किंवा न्यायाधिकार क्षेत्रांचे कायदे अपवर्जन किंवा काही हानीची मर्यादा याची अनुमती देणार नाही, त्यामुळे वर नमूद केलेले काही किंवा सर्व अपवर्जन आणि मर्यादा कदाचित तुम्हाला लागू होणार नाहीत. तथापि, आमच्या अटींमध्ये नमूद केल्याच्या विरोधात, अशा बाबतीत, WHATSAPP पक्षांचे दायित्व लागू होणाऱ्या कायद्याने परवानगी दिलेल्या संपूर्ण व्याप्तीपर्यंत मर्यादित असेल.
तुमच्या कृती, माहिती, किंवा WhatsApp वरील सामग्री, किंवा तुम्ही आमच्या सर्व्हिसचा केलेला कोणताही वापर याच्या संबंधाने एखाद्या व्यक्तीने आमच्याकडे एखादा दावा ("तृतीय पक्ष दावा") आणल्यास, लागू होणाऱ्या कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत तुम्ही क्षतीपूर्ती कराल आणि WhatsApp पक्षांना सर्व दायित्वे, नुकसान, हानी आणि खालीलपैकी कशाशीही संबंधित, त्यातून निर्माण होणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे खालीलपैकी कशाशीही संबंधित कोणत्याही प्रकारचे खर्च (वाजवी कायदेशीर शुल्क आणि किमतींसह) यापासून आणि त्याविरुद्ध निरुपद्रवी धराल: (a) त्यासंबंधात प्रदान केलेल्या माहिती आणि सामग्री यासह आमच्या सर्व्हिसवरील तुमचा ॲक्सेस किंवा वापर; (b) आमच्या अटींचा किंवा लागू होणाऱ्या कायद्याचा तुम्ही केलेला भंग; किंवा (c) तुम्ही केलेले कोणतेही चुकीचे भाष्य. कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्याच्या बचावासाठी किंवा समझोत्यासाठी आम्हाला आवश्यक असल्यानुसार शक्य तितक्या पूर्णपणे तुम्ही आम्हाला सहकार्य कराल. आमच्या सेवांच्या तुमच्या वापराच्या परिणामी, तुमच्या देशातील किंवा निवासी प्रदेशातील कायदे त्यास अनुमती देत नसल्यास WhatsApp च्या संबंधाने तुमचे अधिकार मागील क्षतिपूर्तीद्वारे सुधारित केले जात नाहीत.
फोरम आणि स्थळ. तुम्ही जर युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडा येथील WhatsApp वापरकर्ता असाल तर, तुम्हाला खालील "युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी विशेष लवाद तरतूद" विभाग लागू होतो. कृपया हा विभाग काळजीपूर्वक आणि पूर्णपणे वाचा. तुम्ही जर खालील “युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी विशेष लवाद तरतूद” विभागाच्या अधीन विषय नसाल तर, तुम्हाला WhatsApp च्या विरुद्ध असलेला कोणताही दावा किंवा कृतीचे कारण, जे आमच्या अटी आणि सर्व्हिसेशी संबंधित असेल, त्यातून उत्पन्न होत असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संबंधित असेल त्यासाठी, आणि WhatsApp तुमच्या विरोधात जो कोणताही दावा किंवा कृतीचे कारण फाइल करेल त्यासाठी, तुम्ही आणि WhatsApp सहमती देता की अशा कोणत्याही दाव्याचे किंवा कृतीच्या कारणाचे (प्रत्येकी, “विवाद,” आणि एकत्रितपणे, “विवाद”) निराकरण नॉर्दन डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियासाठी युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा कॅलिफोर्नियाच्या सॅन मॅटिओ काउंटीमध्ये स्थित स्टेट कोर्टात केले जाईल, आणि अशा कोणत्याही दाव्याच्या किंवा कारवाईच्या कारणाचा खटला चालवण्याच्या उद्देशाने अशा न्यायालयांच्या वैयक्तिक न्यायाधिकार क्षेत्रात सबमिट करण्यास, आणि असा कोणताही दावा किंवा कारवाईचे कारण कॅलिफोर्निया राज्याच्या कायद्यांद्वारे शासित होईल, कायद्यातील तरतुदींच्या संघर्षाचा विचार न करता, यास सहमती देता. मागील बाबतीत कोणताही पूर्वग्रह न ठेवता, तुम्ही सहमती देता की संपूर्णपणे आमच्या विवेकबुद्धीनुसार, तुमच्याशी असलेल्या आमच्या कोणत्याही विवादाचे, जो तुम्ही निवास करत असलेल्या देशातील कोणत्याही समतुल्य न्यायालयात लवाद कार्यवाहीच्या अधीन विषय नाही, जो विवादावरील न्यायाधिकार क्षेत्रात येतो, निराकरण करण्याच्या पर्यायाची आम्ही निवड करू शकतो.
शासित करणारा कायदा. आमच्या अटी तसेच कोणताही विवाद, न्यायालयातील असो किंवा लवादातील, जो तुम्ही आणि WhatsApp यांच्या दरम्यान उत्पन्न होऊ शकतो, कायद्यातील तरतुदींच्या संघर्षाचा विचार न करता, स्टेट ऑफ कॅलिफोर्नियाचे कायदे शासित करतात .
दावा किंवा विवाद सादर करण्यासाठी वेळ मर्यादा. या अटी दावा किंवा विवाद दाखल करण्यासाठी तुमच्याकडे असलेली वेळ देखील मर्यादित करतात, यामध्ये लवाद कार्यवाही सुरू करण्याची वेळ, किंवा परवानगी असल्यास, लागू होणाऱ्या कायद्याने अनुमती दिल्याच्या संपूर्ण मर्यादेपर्यंत, न्यायालयीन कारवाई किंवा छोट्या दाव्यांवरील कार्यवाहीचा समावेश आहे. आम्ही आणि तुम्ही यास सहमती देता की कोणत्याही विवादासाठी (खाली परिभाषित वगळलेल्या विवादांचा अपवाद सोडून) आम्ही आणि तुम्ही दावा सर्वप्रथम उभा राहिल्यानंतर एक वर्षाच्या आत (लवाद कार्यवाही आंरभ होण्यासह) विवाद दाखल करणे आवश्यक आहे; अन्यथा, असा विवाद कायमस्वरूपी अवरुद्ध होतो. याचा अर्थ, विवाद प्रथम झाल्यानंतर जर तुम्ही किंवा आम्ही दावा एक वर्षाच्या आत (लवाद कार्यवाही आंरभ होण्यासह) दाखल केला नाही तर, लवाद उशीरा सुरू झाला होता या कारणाने तो डिसमिस केला जाईल.
खालील भाग पहा: युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी विशेष लवाद तरतूद
आमच्या सर्व्हिसची उपलब्धता. आम्ही नेहमीच आमच्या सेवा सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. याचा अर्थ आम्ही आमच्या सेवा, वैशिष्ट्ये, कार्यक्षमता आणि काही डिव्हाइसेस आणि प्लॅटफॉर्म्सना सहाय्य करणे विस्तारीत करू, जोडू किंवा काढू शकतो असा होतो. आमच्या सेवांमध्ये देखभाल, दुरुस्ती, अपग्रेड करणे किंवा नेटवर्क किंवा उपकरणे अयशस्वी होणे यामुळे व्यत्यय येऊ शकतो. काही वैशिष्ट्ये आणि काही डिव्हाइसेस व प्लॅटफॉर्म्सचे सहाय्य यांसह, कोणत्याही वेळी आम्ही आमच्या काही किंवा सर्व सेवा खंडित करू शकतो. आमच्या नियंत्रणाबाहेरील घटनांमुळे आमच्या सर्व्हिसेस प्रभावित होऊ शकतात, जसे की नैसर्गिक घटना आणि इतर प्रमुख घटना.
आम्ही आमच्या सर्व्हिसेसवरील तुमचा ॲक्सेस किंवा वापर कधीही कोणत्याही कारणास्तव सुधारित, निलंबित किंवा समाप्त करू शकतो, जसे की तुम्ही आमच्या अटींच्या पत्राचे किंवा खऱ्या हेतुचे उल्लंघन केले तर किंवा आमच्यासाठी, आमच्या वापरकर्त्यांसाठी किंवा इतरांसाठी हानी, धोका किंवा कायदेशीर असुरक्षितता निर्माण करण्याची शक्यता असल्यास. तुमचे खाते नोंदणीनंतर सक्रिय न झाल्यास किंवा ते दीर्घ काळासाठी निष्क्रिय राहिल्यास आम्ही ते अक्षम करू किंवा हटवू देखील शकतो. WhatsApp सोबतचा तुमचा संबंध समाप्त होण्याच्या बाबतीत खालील तरतुदी कायम राहतील: "परवाना," "अस्वीकरणे आणि मुक्तता," "दायित्वाची मर्यादा," "क्षतिपूर्ती," "विवाद निराकरण," "आमच्या सर्व्हिसेसची उपलब्धता," "इतर," आणि "युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी विशेष लवाद तरतूद."
कृपया हा विभाग लक्षपूर्वक वाचा कारण त्यामध्ये केवळ आमच्या युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या वापरकर्त्यांना लागू होणाऱ्या विशेष तरतुदी आहेत. तुम्ही जर युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडा येथे स्थित WHATSAPP वापरकर्ता असाल तर, तुम्ही आणि आम्ही सर्व विवाद बंधनकारक स्वतंत्र लवादकडे सुपूर्त करण्यास सहमती देता, केवळ ज्यामध्ये बौद्धिक संपदा विवादांचा समावेश होतो आणि जे छोटे दावे न्यायालयात दाखल करता येतात त्यांचा अपवाद वगळून. याचा अर्थ, या विवादांचे निराकरण न्यायाधीश किंवा ज्यूरीमार्फत करण्याचा कोणताही अधिकार तुम्ही सोडून देता. अंततः, तुम्ही तुमचा दावा केवळ तुमच्या स्वतःच्या वतीने दाखल करता, कोणत्याही अधिकारी किंवा इतर व्यक्तीच्या, किंवा कोणत्याही वर्गातील लोकांच्या वतीने नाही. तुमच्या विवादात सहभागी होण्याचा किंवा त्याची सुनावणी क्लास अॅक्शन म्हणून, क्लास लवाद म्हणून किंवा प्रातिनिधिक कृती म्हणून निराकरण करण्याचा तुमचा अधिकार तुम्ही सोडून देता.
“वगळलेला विवाद” याचा अर्थ तुमच्या किंवा आमच्या बौद्धिक संपदा अधिकारांची (जसे की कॉपीराइट्स, डोमेन्स, लोगो, ट्रेड ड्रेस, ट्रेड गुपीते आणि पेटंट्स) अंमलबजावणी करण्याशी किंवा त्यांचा भंग करण्याशी संबंधित किंवा आमच्या सर्व्हिसेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्याशी किंवा आमच्या सर्व्हिसेसशी अनधिकृत मार्गांनी एंगेज होण्याशी संबंधित विवाद असा होतो (उदाहरणार्थ, स्वयंचलित मार्गांनी). स्पष्टतेसाठी आणि तथापि पुढील गोष्टींबरोबरच, तुमच्या गोपनीयतेशी आणि प्रसिद्धीशी जोडलेल्या अधिकारांशी संबंधित, त्यातून उत्पन्न होत असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संबंधित असलेले विवाद हे वगळलेले विवाद नाहीत.
फेडरल आर्बिट्रेशन ॲक्ट. फेडरल आर्बिट्रेशन ॲक्ट या "युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी विशेष लवाद तरतूद" विभागाचे स्पष्टीकरण आणि अंमलबजावणी शासित करतो, यामध्ये WhatsApp आणि तुम्ही यांच्यामधील कोणताही विवाद लवादच्या अधीन विषय आहे की नाही याचाही समावेश होतो.
युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडाच्या येथे स्थित WhatsApp वापरकर्त्यांसाठी लवाद कार्यवाहीस सहमती. युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडा येथे स्थित WhatsApp वापरकर्त्यांसाठी, वगळलेल्या विवादांचा अपवाद सोडून, WhatsApp आणि तुम्ही प्रत्येकी सर्व विवादांसाठी न्यायालयीन खटल्याचा अधिकार सोडून देण्यास सहमती देता. WhatsApp आणि तुम्ही सहमती देता की, तुमच्या गोपनीयतेशी आणि प्रसिद्धीशी कोणत्याही प्रकारे जोडलेल्या अधिकारांशी संबंधित, त्यातून उत्पन्न होत असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संबंधित असलेले विवाद यासह सर्व विवादांचे (वगळलेले विवादांव्यतिरिक्त) निराकरण अंतिम आणि बंधनकारक लवाद मार्फत केले जाईल. WhatsApp आणि तुम्ही सहमती देता की आमच्या अटींच्या अंतर्गत लवादासाठी पात्र नसलेल्या विवादासह विवाद एकत्रित करणार नाही जो आमच्या अटींच्या अंतर्गत लवादाच्या अधीन आहे.
तुम्ही विवादाच्या लवादास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही आम्हाला विवादाची लेखी सूचना सादर करणे आवश्यक आहे ज्यामध्ये (a) तुमचे नाव; (b) निवासी पत्ता; (c) वापरकर्तानाव; (d) तुम्ही तुमच्या WhatsApp खात्यासाठी वापरत असलेला ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर; (e) विवादाचे विस्तृत विवरण; आणि (f) तुम्हाला हवी असलेली सवलत याचा समावेश होतो. तुम्ही आम्हाला पाठवता त्या विवादाची कोणतीही सूचना Meta Platforms, Inc., ATTN: WhatsApp Arbitration Filing, 1601 Willow Rd वर मेल केली पाहिजे. Menlo Park, CA 94025. आम्ही लवाद सुरू करण्यापूर्वी, तुम्ही दिलेल्या ईमेल पत्त्यावर किंवा इतर योग्य मार्गाने आम्ही तुम्हाला विवादाची नोटीस पाठवू. विवादाची सूचना प्राप्त झाल्यानंतर साठ (६०) दिवसांच्या आत आम्ही विवादाचे निराकरण करण्यात असमर्थ ठसल्यास, तुम्ही किंवा आम्ही लवाद आरंभ करू शकू.
लवाद American Arbitration Association ("AAA") द्वारे लवाद सुरू झाल्याच्या वेळी प्रभावी असलेल्या त्यांच्या कमर्शियल आर्बिट्रेशन रुल्सच्या अंतर्गत दाखल केला जाईल, यामध्ये इमर्जन्सी मेजर्स ऑफ प्रोटेक्शन अँड द सप्लीमेंटरी प्रोसिजर्स फॉर कंझ्यूमर रिलेटेड डिस्प्युट्स (एकत्रितपणे "AAA Rules") साठी पर्यायी नियमांचाही समावेश होतो. लवादचे अध्यक्ष AAA रुलच्या अनुषंगाने निवडलेला एकल पंच असेल. AAA रुल्स, विवाद आरंभ करण्यासंबंधी माहिती, आणि लवाद प्रक्रियचे वर्णन www.adr.org येथे उपलब्ध आहे. लवादाच्या तरतुदीची व्याप्ती आणि अंमलबजावणीशी संबंधित समस्यांचा निर्णय न्यायालय करेल. लवादचे लोकेशन आणि अशा लवादसाठी शुल्क आणि किमतींचे वाटप AAA रुल्सच्या अनुषंगाने निर्धारित केले जाईल.
पर्याय सोडून देण्याची प्रक्रिया. तुम्ही लवाद करण्याच्या कराराचा पर्याय सोडून देऊ शकता. तुम्ही असे केल्यास, आम्ही किंवा तुम्ही दुसऱ्यास लवाद कार्यवाहीमध्ये सहभागी होणे आवश्यक करू शकत नाही. पर्याय सोडून देण्यासाठी, तुम्ही आम्हाला ३० दिवसांच्या आत पोस्टमार्क केलेल्या व लिखित स्वरूपात हे सूचित करणे आवश्यक आहे: (i) तुम्ही सर्वप्रथम आमच्या अटी स्वीकारल्याची तारीख; आणि (ii) या लवाद प्रक्रियेसाठी तुम्ही विषय बनल्याची तारीख. पर्याय सोडून देण्यासाठी तुम्ही हा पत्ता वापरणे आवश्यक आहे:
WhatsApp LLC
Arbitration Opt-Out
1601 Willow Road
Menlo Park, California 94025
United States of America
तुम्ही हे समाविष्ट करणे आवश्यक आहे: (i) तुमचे नाव आणि निवासी पत्ता; (ii) तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाइल फोन नंबर; आणि (iii) आणि तुम्ही लवाद कार्यवाहीच्या आमच्या अटींच्या सहमतीचा पर्याय सोडून देऊ इच्छिता याचे स्पष्ट स्टेटमेंट.
छोटे दावे न्यायालय. लवादाचा पर्याय म्हणून, तुमच्या स्थानिक “छोटे दावे” न्यायालयाच्या नियमांनुसार अनुमत असल्यास, जोपर्यंत ते प्रकरण वैयक्तिक (नॉन-क्लास) आधारावर पुढे जात असेल तोपर्यंत, तुम्ही तुमचे विवाद तुमच्या स्थानिक छोटे दावे” न्यायालयात दाखल करू शकता.
युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडा येथे स्थित वापरकर्त्यांसाठी कोणतीही क्लास अॅक्शन, क्लास लवाद किंवा प्रातिनिधिक कृती नाही. तुम्ही आणि आम्ही सहमती देतो की तुम्ही जर युनायटेड स्टेट्स किंवा कॅनडा येथे स्थित WhatsApp वापरकर्ते असाल तर, तुम्ही आणि आम्ही प्रत्येकी एकमेकांविरुद्धचे विवाद केवळ त्यांच्या किंवा तुमच्या स्वतःच्या वतीने दाखल कराल, कोणत्याही इतर व्यक्तीच्या किंवा घटकाच्या, किंवा कोणत्याही वर्गातील लोकांच्या वतीने नाही. आम्ही आणि तुम्ही प्रत्येकी सहमती देतो की, खाजगी अटॉर्नी जनरल किंवा प्रतिनिधीच्या अखत्यारीत, किंवा कोणत्याही विवादाच्या संबंधाने इतर कोणतीही व्यक्ती किंवा घटकाचा समावेश असलेल्या एकत्रित विवादांसाठी दाखल केलेल्या क्लास ॲक्शन, क्लास-वाइड लवाद, विवाद यात सहभागी होणार नाही. जर असा काही निर्णायक न्यायालयीन निश्चय असेल की कोणत्याही विशिष्ट विवादावर (किंवा विशेष सवलतीच्या विनंतीवर) या तरतूदीच्या मर्यादांनुसार मध्यस्थी करता येणार नाही, तरच केवळ तो विवाद (किंवा सवलतीची केवळ तीच विनंती) न्यायालयात आणली जाऊ शकते. इतर सर्व विवाद (किंवा सवलतीच्या विनंत्या) या तरतूदीच्या अधीन विषय राहतील.
अनुमत न्यायालयीन कारवाया फाईल करण्याचे स्थान. तुम्ही जर लवाद कार्यवाहीच्या कराराचा पर्याय सोडून दिला, तुमचा विवाद वगळलेला विवाद असेल, किंवा लवाद करार अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याचे आढळल्यास, वर नमूद केलेल्या "विवाद निराकरण" विभागातील लागू होणाऱ्या तरतुदीच्या अधीन विषय होण्यास सहमती देता.
इतर काही भाषांमध्ये अटी अॅक्सेस करण्यासाठी तुमच्या WhatsApp सत्रासाठीचे भाषा सेटिंग बदला. तुम्ही निवडता त्या भाषेमध्ये आमच्या अटी उपलब्ध नसल्यास, आम्ही इंग्रजी आवृत्ती डीफॉल्ट करू.
कृपया खालील डॉक्युमेंटचे पुनरावलोकन करा, जे आमच्या सर्व्हिसच्या तुमच्या वापराबद्दल अतिरिक्त माहिती प्रदान करतात:
WhatsApp गोपनीयता धोरण
WhatsApp बौद्धिक मालमत्ता धोरण
WhatsApp ब्रँड गाईडलाईन्स