WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.
रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी तुमच्या ॲडमिन आणि सदस्यांना सक्षम करा आणि सहयोग करा.
विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.
तुमच्या ॲडमिन टीमच्या तीव्र इच्छेचा आणि वचनबद्धतेचा स्तर तुमच्या कम्युनिटीच्या यशास प्रभावित करेल. एक चांगला ॲडमिन सक्रिय, उत्तम व्यवस्थापन करणारा आणि ऑनलाईन सुरक्षा आणि गोपनीयता यांचे ज्ञान असलेला असून तो आदरणीय, धैर्यवान आणि उत्तम श्रोता असतो. आत्यंतिक थकवा टाळण्यासाठी एक सकारात्मक संस्कृती कशी निर्माण करावी, सहानुभूती आणि दयेने कसे वागावे आणि एकजुटीने कार्यसंघ या रूपात कसे काम करावे हे जाणून घ्या.
"पूर्वी कम्युनिटी व्यवस्थापित करण्यासाठी आमच्याकडे असमान ग्रुप्स वेगळे करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. कम्युनिटीज फीचर व्यवस्थापक/ॲडमिन यांच्याकडे सर्व ग्रुप्सची दृश्यमानता आहे आणि ते त्यांची ॲक्टिव्हीटी व प्रगती ट्रॅक करू शकतात याची खात्री करते आणि कोणीही मागे पडत नाही याची खात्री करतात."
- Maame, आफ्रिकन मम्स डोइशलॅंड
कम्युनिटी अॅडमिनची भूमिका तुमच्या कम्युनिटीचे उद्देश्य आणि परिपक्वता, ग्रुप्स आणि सदस्यांची संख्या, आणि ते किती सक्रिय आहेत यांवर अवलंबून असते. अॅडमिन्स कम्युनिटीमधील अनुभव घडवतात आणि सदस्यांना गुंतलेले रहावेसे वाटावे असे उत्तम वातावरण निर्माण करतात.
तुमच्या कम्युनिटीसाठी नियम स्थापित करण्यासाठी आणि सदस्य ॲडमिनना फॉलो करतात तसेच एकमेकांचा आदर करतात याची खात्री करण्याकरिता ग्रुप ॲडमिनसोबत कार्य करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. ही एक अत्यंत मोठी जबाबदारी आहे, पण तुम्ही हे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहात आणि उत्तम कामगिरी बजावाल याची आम्हाला खात्री आहे!
ॲडमिननी अनुचित वर्तणूक आणि कंटेन्ट हाताळताना त्यांच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तत्परतेने आणि काटेकोरपणे कार्य करणे आवश्यक आहे. एंगेज असलेला ॲडमिन असे वातारवरण तयार करू शकतो जिथे सदस्यांना सुरक्षित आणि स्वत: व्यक्त करण्यासाठी मोकळेपणा वाटतो. सकारात्मक वर्तन ठेवून कम्युनिटीच्या नियमांचे पालन करणार्या सदस्यांचे कौतुक करणे, यांसारख्या सकारात्मक इंटरॅक्शन ओळखणे ही नेहमीच चांगली पद्धत आहे. तुमचे सदस्य काय शेअर करत आहेत किंवा कशाला पाठिंबा देत आहेत यांबद्दल त्यांना शिक्षित करून जागरूक आणि जबाबदार बनवण्यासाठी नियमितपणे संसाधने शेअर करा.
जर कोणताही आक्षेपार्ह मजकूर मेसेज किंवा शेअर केला गेला असेल, तर त्वरितपणे तो हटवा आणि गरज भासल्यास, तो पोस्ट करणार्या सदस्याची तक्रार नोंदवून त्यांना काढून टाका. ग्रुपची क्षमा मागा आणि सर्वांना याची आठवण करून द्या की ते देखील आपल्या डिव्हाइसवरून कोणताही अयोग्य मजकूर हटवू शकतात. ही ग्रुपला अशा वर्तनाविषयीच्या नियमांची आठवण करून देण्याची एक चांगली संधी आहे. चांगले नियम एक सुरक्षित जागा तयार करतात आणि सदस्यांनी काय करावे आणि काय करू नये याविषयीच्या अपेक्षा स्पष्टपणे नमूद करतात.
सदस्यांना सकारात्मकपणे संवाद साधण्यासाठी आणि तुमच्या कम्युनिटीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या कोणत्याही वर्तनाची सूचना तुम्हाला देण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना प्रश्न किंवा समस्या असल्यास ते तुमच्याशी किंवा तुमच्या अॅडमिन टीमशी संपर्क साधू शकतात हे त्यांना सांगा.
सदस्यांना जबाबदारीने WhatsApp वापरण्याची आणि एकमेकांचा आदर करण्याची आठवण करून द्या
अॅडमिन्स म्हणून तुमच्या संप्रेषणामुळे तुमचे ग्रुप्स आणि सदस्य एकमेकांशी कसा संवाद साधतात यास प्रभवित करेल. संघर्ष किंवा समस्या हाताळताना तुम्ही समजणे, मार्गदर्शन देणे आणि समर्थन करणे यांसाठी ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सहानुभूतीने संवाद साधणे म्हणजे इतरांशी बोलत असताना त्यांचा दृष्टीकोण आणि भावना समजून घेण्यासाठी स्वतःला त्यांच्या जागी ठेवणे.
एक आदरणीय कम्युनिटी तयार करण्यासाठी, पुढील गोष्टी करून नेहमी चांगले उदाहरण समोर ठेवा:
सहानुभूती दर्शवल्याने तुम्हाला तुमच्या सदस्यांच्या गरजा आणि प्रोत्साहनांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तो सदस्य तुमच्या ग्रुपचा भाग का आहे आणि तुम्ही त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कशी मदत करू शकता याबद्दल स्वत:स सतत प्रश्न विचार रहा. तुम्ही एक सच्चे व्यक्ती आहात आणि सदस्यांच्या हिताचा विचार करता हे त्यांना पटल्यावर सदस्य तुमच्यापाशी व्यक्त व्हायला आणि संवादाची देवाणघेवाण करायला तयार होतील.
रुपमध्ये एक्स्पायर होणारे मेसेजेस फीचर सुरू किंवा बंद कसे करावे
WhatsApp कम्युनिटीज अॅडमिन्सना संभाषणे अधिक प्रभावीपणे सुव्यवस्थित करण्यास मदत करून एका मोठ्या कम्युनिटीमधील अनेक सदस्य आणि ग्रुप्सचे व्यवस्थापन करताना अॅडमिनवरील भार कमी करते.
वेळेचे आणि कार्यभाराचे नियोजन करण्यासाठी तुमच्या अॅडमिनसोबत कार्य करा. येथे काही टिपा आहेत:
तुमच्या कार्यसंघाचे तुमच्या कम्युनिटीच्या बाहेरदेखील जग आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या वैयक्तिक वेळेचा आदर केल्याने सर्वांनाच काम व इतर गोष्टींमध्ये समतोल राखण्यास मदत होईल.
कदाचित अशी वेळ येऊ शकते, जेव्हा तुम्ही तुमची कम्युनिटी लीडर म्हणून भूमिका निभावू इच्छित नाही किंवा तुमच्या कम्युनिटीचे उद्देश्य साध्य झाले असेल. परिस्थिती बदलल्यावर नवीन अॅडमिन नियुक्त करण्याची किंवा कम्युनिटी निष्क्रिय करण्याची वेळ आली असू शकते.
संपूर्ण अॅडमिन कार्यसंघाशी बोलण्यापूर्वी तुमची भूमिका कोणाला सोपवणे योग्य ठरेल याचा विचार करा.
कम्युनिटी निष्क्रिय करण्यासाठी कोणतीही पावले उचलण्याआधी ती अजूनही सक्रिय आणि निकोप आहे का याचा विचार करा. स्वतःला या गोष्टी विचारा:
कम्युनिटीमध्ये संभाषणे कमी होत असतील, त्याचा वापर होत नसेल, किंवा त्याचे उद्देश्य साध्य झाले असेल तर कम्युनिटी निष्क्रिय करणे योग्य ठरू शकते.
कम्युनिटी निष्क्रिय केल्याने घोषणा ग्रुप वापरता येणार नाही आणि कम्युनिटी होमवरून ग्रुप्सना काढून टाकले जाईल. पण, ग्रुप्स तरीही कार्यशील राहतील आणि त्यातील सदस्य एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मेसेजेस पाठवू शकतील. कम्युनिटी निष्क्रिय करण्याआधी ब्रॉडकास्ट मेसेजद्वारे तुमच्या योजना सर्वांना नक्की सांगा.
नवीन आणि विद्यमान सदस्यांकरिता सकारात्मक आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करून व कम्युनिटीला गुंतवून ठेवून कम्युनिटीची वृद्धी कशी करावी हे जाणून घ्या.