WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.
रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी तुमच्या ॲडमिन आणि सदस्यांना सक्षम करा आणि सहयोग करा.
विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.
डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केल्याने आपले जीवन सुधारण्यासाठी अनेक संधी प्रदान करते, पण धोक्यापासून जागरूकता बाळगणे महत्त्वाचे आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कम्युनिटीला सुरक्षित ठेऊ शकता. तुमच्या सदस्यांना सुरक्षित कसे ठेवावे आणि त्यांच्या गोनीयतेस संरक्षित कसे करावे ते त्यांचे ग्रुप्स आणि संभाषणे व्यवस्थापित करून आणि त्यांना WhatsApp चे सुरक्षा आणि गोपनीयता फीचर वापरण्यासाठी प्रेरित करून जाणून घ्या.
"कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडितांना समर्थन देण्याच्या बाबतीत, ज्याला अतिशय खाजगीरित्या हाताळावे लागले त्याबाबतीत, ग्रुपच्या अॅडमिनने पाहिले की WhatsApp एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड होते आणि अॅपवर त्या चर्चा केल्यामुळे अधिक आत्मविश्वास वाटला. गोपनीयता सर्वात टॉपवर असणे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही जी काही चर्चा करता ती अनपेक्षित प्रेक्षकांसह शेअर केली जात नाही."
- गिव्हर्स अरेना, नायजेरिया
जेव्हा लोकांना कम्युनिटीमध्ये सुरक्षित वाटते, तेव्हा त्यांनी कम्युनिटीमध्ये सहभागी होण्याची शक्यता अधिक असते, तसेच त्यांना कम्युनिटी आपली स्वतःची असल्यासारखी वाटते. सदस्यांना हानीकारक कंटेन्ट किंवा वर्तन आढळल्यास, जेव्हा एखादा ग्रुप खाजगी वाटत नाही किंवा जेव्हा वैयक्तिक माहिती संमतीशिवाय शेअर केली जाते तेव्हा ही भावना खूप लवकर अदृश्य होते.
सुरक्षितता हा WhatsApp कडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा गाभा आहे. तुमचे वैयक्तिक मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, व्हॉइस मेसेजेस, डॉक्युमेंट्स आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शननेसुरक्षित केलेले आहेत. स्वतःला आणि तुमच्या सदस्यांना संरक्षित करण्यासाठी WhatsApp वर सुरक्षा आणि गोपनीयता फीचर वापरा. कम्युनिटी अॅडमिन म्हणून, सदस्यांना सुरक्षित वाटत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रुप ॲडमिनसोबत जवळून काम करणे महत्त्वाचे आहे.
WhatsApp कम्युनिटीज सदस्य त्यांच्या ग्रुप ॲडमिन्ससाठीचे संपर्क तपशील सहज शोधू शकतात आणि त्यांना आवश्यक असल्यास ते त्यांच्या कम्युनिटी ॲडमिन्सना थेट ॲक्सेस करू शकतात.
पुढील गोष्टी करणाऱ्या WhatsApp कम्युनिटीज सेट करू नका:
कम्युनिटी अॅडमिन म्हणून, आमच्या सेवाशर्ती नुसार आमच्या सर्व्हिस वापरण्यासाठी सहमती दर्शवता. उल्लंघनाच्या बाबतीत, ग्रुप अक्षम करणे किंवा प्रतिबंधित करणे यासह तुमच्या खात्याच्या संदर्भात कारवाई केली जाऊ शकते.
वापरकर्त्यांना वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून वाचवण्यासाठी WhatsApp प्रदान करत असलेली सुरक्षा आणि गोपनीयता वैशिष्ट्ये प्रत्येकाला माहित असल्याची खात्री करा. कम्युनिटी आणि ग्रुप ॲडमिननी तुमचे खाते ताब्यात घेण्याचा, चुकीची माहिती शेअर करण्याचा किंवा सदस्य जोडण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही तुमच्या सदस्यांना त्यांचे खाते सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, आणि कम्युनिटीची हीनी होऊ नये म्हणून बाहेरील व्यक्तिसोबत कम्युनिटीची माहिती शेअर न करण्याबद्दल रिमाइंड केले पाहिजे. कम्युनिटी अॅडमिन म्हणून, तुम्ही कम्युनिटी सुरक्षित ठेवण्यासाठी सदस्यांना काढू शकता, अनावश्यक मेसेजेस (पाठवल्यानंतर जवळपास २.५ दिवसांनी) हटवू शकता.
याच्या महत्त्वाबद्दल संवाद साधून स्वतःला आणि तुमच्या सदस्यांना सुरक्षित ठेवा:
तुमच्या सदस्यांना जे्हा कधी ते ग्रुप्समध्ये वैयक्तिक माहिती शेअर करतात तेव्हा ते एक्स्पायर होणारे मेसेजेस आणि एकदाच पहा मीडिया यांसारखे अतिरिक्त गोपनीयता फीचर वापरू शकतात हे रिमाइंड करून द्या. तुमची सुरक्षितता आणि गोपनीयतेची खात्री करण्यासाठी तुमच्या सदस्यांना आम्ही डिझाईन केलेले टूल आणि फीचर वापरण्यासाठी प्रोत्साहित करा.
कम्युनिटी ॲडमिनसाठी, घोषणा ग्रुपमध्ये मेसेज पाठवताना साविधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. घोषणा ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा @mention करू नका, कारण असे केल्याने त्या संपर्काचा फोन नंबर संपूर्ण कम्युनिटी समोर येईल.
WhatsApp कम्युनिटीज गोपनीयतेचा अतिरिक्त स्तर प्रदान करते ज्यामध्ये वापरकर्ता सार्वजनिकरित्या तुमची कम्युनिटी ऑनलाइन शोध घेऊ शकत नाही, पण सामील होण्यासाठी आमंत्रित करणे आवश्यक आहे. योग्य कारणांसाठी तुमच्या कम्युनिटीवर सदस्य जोडले गेले आहेत याची खात्री करण्यासाठी तुमच्या कम्युनिटी आणि ग्रुप ॲडमिनसह समन्वय साधा. जे लोक कम्युनिटीच्या उद्दिष्टाशी सहमत नाहीत किंवा जे वाईट हेतूने कम्युनिटीत सामील झाले आहेत, ते तुमच्या सदस्यांसाठी कम्युनिटीचे मूल्य कमी करू शकतात किंवा कम्युनिटीला छळवणूक, घोटाळे यासारख्या किंवा इतर मार्गांनी हानी पोहोचवू शकतात.
तुमच्या कम्युनिटीमध्ये इतर ग्रुप आणि सदस्य कसे सामील होऊ शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात हे सक्रियपणे व्यवस्थापित करणे आणि नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कम्युनिटी कमाल पन्नास ग्रुप्स अधिक घोषणा ग्रुप समाविष्ट करू शकतात, त्यामुळे तुमच्या कम्युनिटीवर केवळ समर्पक ग्रुप लिंक केलेले आहेत याची खात्री करण्यासाठी नवीन ग्रुप निर्मितीकडे लक्ष ठेवा.
तुमचे ग्रुप ॲडमिन नवीन सदस्यांवर लक्ष ठेऊन आहेत याची आणि त्यामध्ये नसावे असे सदस्य काढत आहेत याची खात्री करा. तुम्ही ग्रुप सहभागी सदस्यांच्या लिस्टमध्ये जाऊन आणि सदस्याच्या नावावर क्लिक करून तुम्ही सदस्य काढू शकता.
तुम्ही ग्रुप आणि सदस्यांना आमंत्रण लिंक वापरून किंवा वापरकर्त्यांना वैयक्तिकरित्या तुमच्या संपर्कांमध्ये जोडून कम्युनिटीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करता. तुम्ही आमंत्रण लिंक कुठे शेअर करता याबद्दल सावध रहा. या लिंक्स कधीही सार्वजनिक वेब पेजवर पोस्ट करू नका. तुमच्या ओळखीच्या लोकांना नेहमी खाजगी संप्रेषण चॅनेलद्वारे आमंत्रण लिंक पाठवा. तुम्ही ग्रुपसाठी ग्रुप विनंती सेटिंग देखील चालू करू शकता ज्यांना ग्रुपमध्ये सामील होण्यापूर्वी अॅडमिनला कोणत्याही नवीन सहभागींचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता असेल. तुम्ही एखाद्या व्यक्तीला कम्युनिटीमध्ये जोडले आणि त्या व्यक्तीने स्वतःला काढून टाकले, तर त्यांच्या निर्णयाचा मान राखा.
सर्व अॅडमिन्सना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव असल्याची आणि त्यांचे ग्रुप्स सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केेले आहे याची खात्री करा. संभाव्य संघर्ष, छळ, दादागिरी आणि हानिकारक आशय इत्यादींची चिन्हे दिसत आहेत का हे पहा आणि तुमच्या कम्युनिटीच्या नियमांची सातत्याने अंमलबजावणी करा. अनुचित किंवा अविश्वासार्ह मेसेजेस हटवण्यासाठी त्या मेसेजेसवर जास्त वेळ दाबून ठेवून ते त्वरीत हटवण्याची कारवाई करा आणि आवश्यकता भासल्यास उपद्रवी ग्रुप्स आणि सदस्यांना ब्लॉक आणि रिपोर्ट करा आणि काढून टाका.
तुमच्या कम्युनिटीचे नियम आणि सदस्यांच्या अपेक्षांच्या संदर्भात, नकारात्मक कंटेन्ट ओळखण्यासाठी ॲडमिन्स आणि सदस्यांना मदत करा. पुढील प्रकारचा कंटेन्ट तुमच्या कम्युनिटीमध्ये समस्या निर्माण करू शकतो:
तुमच्या सदस्यांना रिमाइंड करून द्या की कंटेन्टकडे दुर्लक्ष करा किंवा संशयास्पद वाटणाऱ्या वर्तनाची तक्रार करा आणि मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी दोनदा विचार करा.
चुकीच्या माहितीचा प्रसार कमी करण्यासाठी WhatsApp मेसेज फॉरवर्ड करणे मर्यादित करते. तुम्ही एका वेळी पाच चॅटमध्ये मेसेज फॉरवर्ड करू शकता. एखादा मेसेज आधीच फॉरवर्ड केला गेला असेल, तर तुम्ही तो कमाल एका ग्रुप चॅटला आणि कमाल पाच चॅट्सना फॉरवर्ड करू शकता.
तुम्हाला चिंता वाटत असणारा कंटेन्ट किंवा वर्तन दिसल्यास किंवा तुमच्या कम्युनिटीतील कोणालाही तात्काळ धोका असल्यास, ताबडतोब सपोर्टसाठी आमच्या पर्यंत पोहोचा. तुमच्या स्थानिक आपात्कालीन सेवांना, कायदा अंमलबजावणी किंवा आत्महत्या प्रतिबंधक हॉटलाईन वर संपर्क करा.
स्पॅम आणि अनैच्छिक मेसेजेसबद्दल
फॉरवर्ड करण्याच्या मर्यादांबद्दल
WhatsApp कम्युनिटीज व्यवस्थापित करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी कम्युनिटी अॅडमिन आवश्यक आहेत. एक चांगला कम्युनिटी ॲडमिन होण्यासाठी काय आवश्यक आहे ते जाणून घ्या.