तुमची कम्युनिटी स्थापन करण्यापूर्वी, तुमचे उद्दिष्ट विचारात घ्या - ते उद्दिष्ट, शाळेतील उपक्रमांबद्दलचे अपडेट्स शेअर करणे, विद्यार्थी आणि कर्मचार्यांच्या कल्याणासाठी साहाय्य करणे, अध्यापनाच्या सर्वोत्तम पद्धती आणि नवीन शैक्षणिक साहित्य शेअर करणे किंवा इतर काही आहे का? तुमचे उद्दिष्ट कम्युनिटीत कोणते सदस्य समाविष्ट करायचे आणि ते कोणत्या ग्रुप्समध्ये असावेत हे ठरवण्यात तुम्हाला मदत करेल. तुम्ही खालीलप्रमाणे ग्रुप्स तयार करू शकता किंवा जोडू शकता:
- इयत्ता किंवा विषयानुसार शिक्षकांचा ग्रुप;
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ग्रुप;
- वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या व्यक्तींचा ग्रुप;
- वर्ग किंवा इयत्तेनुसार पालकांचा ग्रुप;
- शिक्षक ग्रुप ॲडमिन असलेला विद्यार्थ्यांचा वर्ग ग्रुप;
- स्पोर्ट्स टीमच्या किंवा शाळेतील इतर उपक्रमांच्या सदस्यांचा ग्रुप.
कम्युनिटीचे स्पष्ट उद्दिष्ट तुमच्या ॲडमिन टीम्सना आणि सदस्यांना, काही ग्रुप्स का जोडले जातात तर काही ग्रुप्स का जोडले जात नाहीत हे समजून घेण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या उद्दिष्टचा एक भाग शाळेशी संबंधित अपडेट्स शेअर करणे हा असेल, तर तुम्ही शाळेतील फुटबॉल खेळाडूंच्या पालकांचा एक ग्रुप जोडण्याचा निर्णय घेऊ शकता, जे साधनसामग्री आणि प्रशिक्षण वेळापत्रकांबद्दल माहिती शेअर करत असतात. तर दुसरीकडे, सामायिक सामाजिक स्वारस्य असलेल्या पालकांच्या ग्रुपचा समावेश केला जाणार नाही.
काही ग्रुप्सचे सदस्य - उदाहरणार्थ वर्ग ग्रुप्स - दरवर्षी लक्षणीयरीत्या बदलू शकतात. अशावेळी तो ग्रुप काढून टाकणे आणि त्या ठिकाणी नवीन ग्रुप जोडणे सोपे होईल. इतर ग्रुप्स, जसे की स्पोर्ट्स टीम्स, अभ्यास किंवा प्रोजेक्ट वर आधारित ग्रुप्समध्ये अधिक नियमितपणे जोडणे आणि काढणे आवश्यक असू शकते. पालक संघटना किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांसारखे ग्रुप्स स्थिर राहण्याची शक्यता अधिक असते, वेळोवेळी काही सदस्य जोडले जातात आणि काही काढून टाकले जातात. जर बहुतेक ग्रुप्स दरवर्षी काढून टाकावे लागणार असतील, तर कम्युनिटी निष्क्रिय करणे आणि नवीन कम्युनिटी सुरू करणे सोपे असू शकते.