"आम्ही नेहमी आमच्या कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देऊन आणि संघर्ष निराकरणासाठी अॅड-हॉक ग्रुप सेट करून समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला. संवेदनशील समस्या हाताळताना या गोष्टी खूप उपयुक्त आहेत."
- Yohana, इंडेनेशियन बेबीवेअरर
WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.
रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी तुमच्या ॲडमिन आणि सदस्यांना सक्षम करा आणि सहयोग करा.
विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.
सुरक्षित कम्युनिटी तयार करणे स्पष्ट, विशिष्ट आणि लागू करण्यायोग्य नियम लिहिण्यापासून सुरू होते. समस्यात्मक कंटेन्ट आणि लोकांना सामोरे जाताना काय करावे हे सदस्यांना माहीत असल्याची खात्री तुम्ही कशी करू शकता आणि तुमच्या कम्युनिटीच्या नियमांची पारदर्शकपणे आणि नियमितपणे अंमलबजावणी कशी करू शकता ते जाणून घ्या.
"आम्ही नेहमी आमच्या कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देऊन आणि संघर्ष निराकरणासाठी अॅड-हॉक ग्रुप सेट करून समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला. संवेदनशील समस्या हाताळताना या गोष्टी खूप उपयुक्त आहेत."
- Yohana, इंडेनेशियन बेबीवेअरर
चांगले नियम कम्युनिटीची मूल्ये प्रतिबिंबित करतात. या नियमांतून कोणत्या वर्तनाला प्रोत्साहन दिले जाते आणि कोणते वर्तन सहन केले जात नाही ते स्पष्ट होते. ते देखील स्पष्टपणे सांगतात की कोणत्या कृतींमुळे चेतावणी दिली जाईल, काढून टाकली जाईल किंवा WhatsApp वर तक्रार केली जाईल.
सदस्यांना ते अभिप्राय कसे देऊ शकतात, सदस्याने नियम मोडल्यास काय करावे आणि त्यांना काही समस्या असल्यास ते अॅडमिनशी कसे संपर्क साधू शकतात हे जाणून घेण्याचा फायदा होईल. तुमच्या कम्युनिटी नियमांमध्ये WhatsApp च्या सेवाशर्तीची लिंक समाविष्ट करणे चांगली कल्पना आहे.
अॅडमिन म्हणून तुम्ही तुमची कम्युनिटी सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार आहात. जेव्हा कम्युनिटीच्या नियमांचा आदर केला जात नाही तेव्हा सदस्य तुमच्या नेतृत्वाकडे पाहतात. त्यांची अपेक्षा असते की नियमितपणे तुमच्याकडून नियमांचे पालन झाले पाहिजे आणि या नियमांचे पालन न करणारा कंटेन्ट आणि सदस्यांना काढावे.
सदस्यांना समस्यात्मक कंटेन्ट आणि/ किंवा लोकांना सामोरे जावे लागले तर कारवाई करण्यासाठी प्रोत्साहित करा:
शक्य असल्यास, कम्युनिटी अॅडमिननी ग्रुप ॲडमिनसोबत आणि सदस्यांसोबत ग्रुप पातळीवर समस्या व्यवस्थापित करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी कार्य केले पाहिजे. जर तुम्ही WhatsApp कडे समस्यात्मक वर्तणूक किंवा कंटेन्टची तक्रार करायचे निवडल्यास, तुम्ही मेसेजवर दीर्घकाळ दाबून विशिष्ट मेसेज आणि खाते रिपोर्ट करू शकता. मेसेजची तक्रार करण्याचा अर्थ इतर खाती किंवा तुमच्या कम्युनिटीचा कंटेन्टशी संबंध आहे असा नसतो.
द्वेषपूर्ण भाषण, उल्लंघन, पोर्नोग्राफी, किंवा इतर अनैच्छिक किंवा हानीकारक मेसेज जे कम्युनिटीच्या नियमांचे उल्लंघन करतात ते इतर सदस्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पाहिले जाण्यापासून थांबवण्यासाठी तात्काळ हटवले पाहिजे. स्रोताशी संपर्क साधून त्यांचा हेतू निर्धारीत करण्यासाठी त्वरित संपर्क करणे आणि तपासणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यास ग्रुप किंवा कम्युनिटी मधून सदस्याला काढून टाकण्यात संकोच करू नका. जर तुम्ही चांगल्या परिचित सदस्याला काढले, तर व्यक्ती यापुढे कम्युनिटीचा भाग नाही हे स्पष्ट करणारा एक छोटा मेसेज पाठवण्याचा विचार करा. संबंधित प्रसंगाशी आणि सदस्यांशी निगडित कोणतेही संवेदनशील वैयक्तिक तपशील उघड होणार नाहीत याची काळजी घ्या.
ट्रोल्स आणि व्हॅन्डल्स यांपासून सावध राहण्यासाठी तुमच्या अॅडमिन आणि सदस्यांसह कार्य करा. एक ट्रोल वाद निर्माण करण्यासाठी सेट केला जातो आणि सहसा बनावट ओळखी बनवतो आणि व्यत्यय आणतो. वॅन्डल्स हे असे लोक आहेत जे उदाहरणार्थ तुमचे ग्रुप पिक्चर बदलून तुमचा ग्रुप ताब्यात घेतात. ट्रोल्स आणि वॅन्डल्स किंवा कम्युनिटी नियमांचे उल्लंघन करणारे सदस्य त्वरित काढून टाका.
तुम्ही कोणतीही कार्यवाही केलीत तरी, घोषणा ग्रुपमध्ये पुन्हा नियम सांगा आणि या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय कृती केली हे सर्व कम्युनिटी सदस्यांना कळू द्या.
कम्युनिटी सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचे सदस्य तुमच्यावर विसंबून असतात. लोकांना चुकीचे वागू देऊ नका, तुम्हाला धमकावू देऊ नका किंवा तुम्हाला योग्य गोष्टी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू देऊ नका. जो सदस्य काढून टाकल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधतो अथवा ग्रुप किंवा कम्युनिटीतून त्याला काढून टाकण्यापासून तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतो, अशा सदस्याला तुम्ही ब्लॉक करू शकता.
ब्लॉक केल्यानंतर, माजी सदस्याकडून पाठवण्यात आलेले मेसेज, कॉल्स, आणि स्टेटस अपडेट तुमच्या फोनमध्ये दाखवले जाणार नाहीत आणि तुम्हाला डिलिव्हर केले जाणार नाहीत. तुमचे अखेरचे पाहिलेले, ऑनलाइन, स्टेटस अपडेट, आणि तुमच्या प्रोफाईल फोटोवर केलेले कोणतेही बदल ब्लॉक केलेल्या संपर्कांसाठी दृश्यमान राहणार नाहीत.
जेव्हा तुम्ही सदस्याची तक्रारकरता, तेव्हा त्यांनी आमच्या सेवाअटींचे उल्लंघन केले आहे असे आम्हाला वाटत असल्यास WhatsApp त्यांचे खाते बॅन करू शकते. WhatsApp चा सुयोग्य वापर कसा करावा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि कोणकोणत्या कृतींनी आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होऊन त्याचा परिणाम खात्यावर बॅन येण्यात होऊ शकतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, तुमच्या सदस्यांना आमच्या सेवाशर्तींमधील "आमच्या सेवांचा अधिकृत वापर" या विभागाचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करण्यास उत्तेजन द्या.
जर खाते बॅन केले गेले, तर WhatsApp ॲक्सेस करताना वापरकर्त्याला खालील मेसेज दिसेल: "तुमच्या फोन नंबरला WhatsApp वापरण्यापासून बॅन करण्यात आले आहे. मदतीसाठी सपोर्ट टीमशी संपर्क साधा." जर एखाद्या वापरकर्त्याला वाटत असेल की त्यांचे खाते चुकून बॅन केले गेले आहे, तर ते WhatsApp शी संपर्क साधू शकतात आणि ती केस उघडण्यात येईल.
आपात्कालीन परिस्थिती असल्यास, किंवा एखाद्या सदस्याला स्वतःसाठी किंवा इतरांसाठी धोका असल्यास, आपल्या स्थानिक आपत्कालीन सेवांशी किंवा <a आत्महत्या प्रतिबंध हॉटलाइन शी त्वरित संपर्क साधा. तुम्हाला एखाद्या मुलाचा छळ किंवा शोषण होत असल्याचे सूचित करणारा कंटेन्ट प्राप्त झाल्यास किंवा आढळल्यास, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) किंवा इंटरनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन (ICMEC) शी संपर्क साधा आणि वापरकर्त्याबद्दल तक्रार नोंदवा आणि त्याला ब्लॉक करा. अपमानास्पद कंटेन्ट इतरांना कधीही फॉरवर्ड करू नका, अगदी निंदनीय पद्धतीने, घटनेबद्दल मेसेज पाठवताना.
कम्युनिटी अॅडमिन्सवर कम्युनिटीचे सुरक्षितपणे व्यवस्थापन करण्याची आणि ती वाढवण्याची मोठी जबाबदारी असते. तुमची कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी एक प्रभावी अॅडमिन टीम कशी तयार करावी, कामाचा भार कसा वाटून घ्यावा आणि प्रक्रिया कशी विकसित करावी ते जाणून घ्या.