तुमची कम्युनिटी स्थापन करण्यापूर्वी, तुमचे उद्दिष्ट विचारात घ्या - ते उद्दीष्ट कम्युनिटी हेल्थ कार्यक्रमांचा समन्वय आणि पर्यवेक्षण करणे, कम्युनिटी हेल्थ वर्कर्सना प्रशिक्षण देणे आणि मार्गदर्शन करणे, आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे किंवा इतर काही आहे का? तुमचे उद्दिष्ट कम्युनिटीत कोणते सदस्य समाविष्ट करायचे आणि ते कोणत्या ग्रुप्समध्ये असावेत हे ठरवण्यात तुम्हाला मदत करेल. तुम्ही यासाठी ग्रुप्स तयार करू शकता किंवा जोडू शकता :
- भौगोलिक क्षेत्रानुसार कम्युनिटी हेल्थ वर्कर्स;
- कौशल्य संचानुसार कम्युनिटी हेल्थ वर्कर्स;
- आरोग्याशी निगडित परिस्थिती किंवा कार्यक्रमांनुसार कम्युनिटी हेल्थ वर्कर्स;
- प्राथमिक प्रशिक्षणानुसार नवीन कम्युनिटी हेल्थ वर्कर्स;
- कम्युनिटी हेल्थ वर्कर्ससाठी चालू असलेले प्रशिक्षण;
- मॅनेजर्स किंवा कार्यक्रम समन्वयक;
- रुग्णालय व्यवस्थापन टीम;
- हेल्थ केअर टीम्स - डॉक्टर्स, सल्लागार परिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते;
- वैद्यकीय साहित्य आणि फार्मास्युटिकल टीम;
- कम्युनिटी लीडर्स.
कम्युनिटीचे स्पष्ट उद्दिष्ट तुमच्या ॲडमिन टीम्सना आणि सदस्यांना, काही ग्रुप्स का जोडले जातात तर काही ग्रुप्स का जोडले जात नाहीत हे समजून घेण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, जर कम्युनिटीचे उद्दिष्ट कुटुंबांसाठी आरोग्य शिक्षण आणि प्राथमिक उपचार सेवा देणे असेल, तर तुम्ही माता आणि नवजात बालकांचे आरोग्य किंवा मानसिक आरोग्य समुपदेशनात तज्ञ असलेल्या कम्युनिटी हेल्थ वर्कर्सचे ग्रुप्स तयार करण्याचा किंवा जोडण्याचा निर्णय घेऊ शकता. यशोगाथा शेअर करण्यासाठी किंवा कम्युनिटीमध्ये आलेल्या आव्हानांचे कसे निवारण करावे यावर चर्चा करण्यासाठी देखील तुम्ही ग्रुपचा समावेश करू शकता. परंतु या परिस्थितीत सामाजिक ग्रुप्सना आपल्या कम्युनिटीशी जोडणे योग्य होणार नाही.