"आमची अॅडमिन कम्युनिटी आणि सदस्य कम्युनिटी विभक्त केल्याने आम्हाला संकटाच्या वेळी अधिक चांगले समन्वय साधण्यात मदत झाली."
- Nina, Langsung Enak
WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.
रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी तुमच्या ॲडमिन आणि सदस्यांना सक्षम करा आणि सहयोग करा.
विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.
संघर्ष हा आयुष्याचा नैसर्गिक आणि अपरिहार्य भाग आहे आणि जेव्हा भिन्न लोक, ऑनलाइन किंवा ऑफलाइन, संवाद साधण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा संघर्ष उद्भवण्याची शक्यता असते. संघर्षांची सर्वसामान्य कारणे कोणती आहेत आणि जेव्हा मतभेद होतात तेव्हा त्यांचे निराकरण करण्यासाठी तुमच्या ॲडमिन कार्यसंघ आणि सदस्यांसह कसे कार्य करावे ते जाणून घ्या.
"आमची अॅडमिन कम्युनिटी आणि सदस्य कम्युनिटी विभक्त केल्याने आम्हाला संकटाच्या वेळी अधिक चांगले समन्वय साधण्यात मदत झाली."
- Nina, Langsung Enak
लोक कनेक्ट होण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्यासाठी कम्युनिटीमध्ये सामील होतात. सदस्यांच्या स्वीकारार्ह आणि अस्वीकारार्ह वर्तनांविषयी स्पष्ट नियम बनवणे, त्याबद्दल नियमितपणे संवाद साधणे तसेच सातत्याने आणि पारदर्शकपणे नियमांची अंमलबजावणी करणे इत्यादी मार्गांनी कम्युनिटी ॲडमिन्स संघर्ष टाळू शकतात.
संघर्ष गुंतागुंतीचे असतात. जेव्हा व्यक्तिमत्त्वांमध्ये संघर्ष होतो, किंवा विश्वास आणि मतांना आव्हान दिले जाते तेव्हा ते उद्भवू शकतात. हा चुकीचा संवाद, गैरसमज किंवा गोंधळ असू शकतो किंवा सध्याच्या किंवा विवादास्पद मुद्द्यांवर नैसर्गिकरित्या भिन्न दृष्टिकोन असू शकतो. संघर्ष सातत्याने आणि रचनात्मक पद्धतीने कमी करणे, व्यवस्थापित करणे आणि सोडवण्यासाठी संघर्ष मध्यस्थी धोरण विकसित करण्यासाठी तुमच्या अॅडमिन कार्यसंघासह कार्य करणे ही चांगली कल्पना आहे. संभाव्य संघर्षाच्या परिस्थितींचा विचार करा, मध्यस्थी प्रक्रियेला मान्यता द्या आणि तुमच्या टीमला मदत म्हणून जेव्हा विवाद निर्माण होतील त्याआधीच त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्पष्ट प्रतिसाद तयार करा.
आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमच्या सदस्यांना एकमेकांना जबाबदार धरण्यासाठी प्रोत्साहित करा आणि शक्य तितक्या लवकर अॅडमिन कार्यसंघाला कोणत्याही समस्यांची तक्रार करा, जेणेकरून तुम्ही संघर्षाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करू शकता.
जेव्हा संघर्ष निर्माण होतात, तणाव कमी करण्यासाठी त्वरित पाऊल उचला आणि या गोष्टींची खात्री करा:
विशिष्ट ग्रुप थ्रेड नियंत्रणाबाहेर गेला असल्यास मेसेज पाठवण्यासाठी फक्त अॅडमिन त्तापुरती अनुमती देण्यासाठी ग्रुप सेटिंग्ज समायोजित करणे ही देखील एक चांगली कल्पना असू शकते. हे तुम्हाला संभाषणाला विराम देण्यास अनुमती देईल आणि सदस्यांना तुमची पुढील स्टेप विचारात घेताना शांत राहता येईल.
एक साधा गैरसमज त्वरीत पूर्ण वाढलेला युक्तिवाद बनू शकतो जेव्हा सदस्यांना धोका किंवा एकटेपणा वाटतो. सदस्यांना खाजगीमध्ये संपर्क साधण्याने तुम्ही दर्शवता की तुम्हाला काळजी वाटते आणि तुम्ही मदतीसाठी तेथे आहात. हे दर्शविते की तुम्हाला त्यांचा हेतू आणि दृष्टिकोन समजतो आणि ते सकारात्मकरित्या योगदान कसे देऊ शकतात आणि संघर्षातून कसे सावरता येतील हे त्यांना समजण्यास मदत करते. काहीवेळा लोकांना जे झाले आणि त्यांना काय वाटते आहे याबद्दल बोलण्यापूर्वी शांत होण्यासाठी वेळ आवश्यक असतो हे लक्षात ठेवा. सदस्यांना एक पाऊल मागे येण्यासाठी आणि पुढील चर्चेपूर्वी शांत होण्यासाठी वेळ द्या.
त्यांनी जे नियम मोडले ते त्यांना समजावून सांगा आणि काळजीपूर्वक ऐका म्हणजे त्यांंचे एकले जात आहे आणि त्यांचा आदर केला गेला आहे असे त्यांना वाटेल. समस्येच्या गाभ्याशी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही त्यांच्या भावना आणि समस्या का आली होती हे समजू शकता. लक्षात घ्या बरेचदा आक्रमक लोकांना देखील दुर्लक्षित केले गेल्याचे किंवा कमी लेखल्याचे समजते त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करताना खुल्या मनाचे आणि सहानुभूतीशील रहा.
तथापि, मध्यस्थीचा उपयोग होत नसेल आणि सदस्यांचा संताप तसाच राहिला असेल, तर तुम्ही त्यांना तुमच्या ग्रुपमधून किंवा कम्युनिटीतून काढून टाकण्याचा विचार करू शकता.
सक्षम आणि थ्रायव्हिंग कम्युनिटी विविध व्हॉइस आणि भिन्न दृष्टीकोनांना सपोर्ट करते. तुमच्या सदस्यांनी इतरांशी कशाप्रकारे संवाद साधणे अपेक्षित आहे याची माहिती देण्यासाठी तुमच्या कम्युनिटीच्या नियमांचा वापर करा. हे एका आदरणीय, सर्वसमावेशक कम्युनिटीसाठी स्टेज सेट करू शकते जे भिन्नतेचे स्वागत करते आणि ते साजरे करतात.
तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये पाहू इच्छित असलेले वर्तन मॉडेल करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या अॅडमिन कार्यसंधामध्ये वेगवेगळ्या क्षमता, कल्पना आणि दृष्टिकोन घेऊन येतील असे वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले सदस्य असतील याची खात्री करून, तुम्ही विविधता आणि अंतर्भावासाठी मजबूत पाया तयार करू शकता.
भिन्न पार्श्वभूमी आणि विचारांच्या सदस्यांना समजून घेण्यास आणि आदर देण्यास प्रोत्साहित करून आदरयुक्त असहमती आणि चर्चा वाढवण्याचा प्रयत्न करा. सदस्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल बोलण्यासाठी आणि त्यांच्या स्टोरीज शेअर करण्यासाठी त्यांच्याकरीता संधी तयार करा. तुमच्या कम्युनिटीबद्दल अधिक जाणून घेणे हा बाँड तयार करण्याचा आणि सदस्यांना ते ओळखू शकतील असे लोक शोधण्यात मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
संघर्षाचे व्यवस्थापन करणे ताण देणारे असते तसेच ते मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकवणारे असू शकते. तुमच्या स्वतःच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवणे आणि नकारात्मकतेपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही शांत आहात आणि स्पष्टपणे विचार करत आहात याची खात्री करा जेणेकरून तुम्हाला शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समस्या सोडवण्यात मदत होईल. आवश्यक असल्यास, एक पाऊल मागे जा आणि आपल्या सहकारी ॲडमिन्सना मदत करण्यास सांगा.
एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी आणि कम्युनिटीमधील निरीक्षकाची भूमिका शेअर करण्यासाठी आणि संघर्ष व्यवस्थापित करण्यासाठी अॅडमिन कार्यसंघासोबत जवळून कार्य करण्याची कल्पना चांगली आहे. तुम्ही आव्हानात्मक आणि कठिण सदस्यांची हाताळणी करताना तुमच्या कार्यसंघाला अलर्ट करा आणि त्यांच्यासोबत इतरांची मते ऐकण्यासाठी, संभाव्य उपायांवर चर्चा करण्यासाठी आणि योग्य कारवाई करण्यावर सहमती दर्शवण्यासाठीच्या परिस्थितींवर चर्चा करा. तुम्हाला गरज वाटल्यास, सामील असलेल्या सदस्यांपर्यंत पोहचण्यासाठी संबंधित अॅडमिनला सांगा.
ज्यांनी अशाप्रकारच्या संघर्षातून यशस्वीपणे मार्ग काढला आहे, त्यांच्याकडून शिकण्यासाठी वापरण्यात आलेली धोरणे आणि केस स्टडीचे संदर्भ वापरण्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.
तुमची कम्युनिटी व्यवस्थापित करण्यासाठी सु-लिखित नियम प्रस्थापित करणे ही पहिली महत्त्वाची पायरी आहे. तुमच्या कम्युनिटीची मूल्ये, सदस्यांना सुरक्षित ठेवणे आणि सकारात्मक संस्कृती राखण्यासाठी नियमांची अंमलबजावणी कशी करायची ते जाणून घ्या.